सालाबादप्रमाणे यावर्षीही बकरी ईदचा सण पारंपरिक पद्धतीने साजरा करण्यात येणार आहे. यासाठी समाजबांधवांची तयारी पूर्ण झाली आहे. शासन, प्रशासनाच्या आदेशाचे पालन करत कोरोनाचा प्रादुर्भाव लक्षात घेता बकरी ईद साधेपणाने साजरी करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. यावर्षी ईदच्या पार्श्वभूमीवर पार पडणारी पवित्र हज यात्राही सौदी अरेबिया सरकारकडून कोरोनाचा प्रादुर्भाव लक्षात घेता रद्द करण्यात आली. हजयात्रा रद्द होण्याचे हे सलग दुसरे वर्ष आहे. बकरी ईद आणि हजयात्रा हे पारंपरिक धार्मिक समीकरण आहे. यंदा हज यात्रा रद्द झाल्याने समाजबांधवांचा हिरमोड झाला आहे.
नमाजपठण सार्वजनिकरीत्या कोठेही करू नये, असे आवाहन पोलीस प्रशासनाच्या वतीने करण्यात आले आहे.
यंदा कोरोनामुळे बोकडांचा बाजारातही तेजी आलेली पहावयास मिळत आहे. बोकडांचा भावही वाढला आहे.
---इन्फो--
दाऊदी बोहरा बांधवांकडून ईद साजरी
शहरातील दाऊदी बोहरा समाजबांधवांकडून नुकतीच बकरी ईद साजरी करण्यात आली. यावेळी टाकळीफाटा येथील कुतुबी मशिदीतून धर्मगुरू मुस्तुफा रशीद शेख यांचे प्रवचन यू-ट्युबवरून लाइव्ह करण्यात आले. मशिदीमध्ये मोजक्याच प्रमुख विश्वस्तांकडून नमाजपठण करण्यात आले. नागरिकांनी आपापल्या घरांमध्ये ईदची नमाज अदा केली. दरम्यान, एकमेकांना फोनवरून तसेच सोशल मीडियाद्वारे संदेश पाठवून शुभेच्छा दिल्या.