सुरगाणा : मागील भांडणाची कुरापत निघून येथील गांधीनगरमध्ये दोन गटात झालेल्या हाणामारीत दोन जणांना गंभीर तर काहींना किरकोळ दुखापत झाली असून परस्पर विरोधी फिर्याद दाखल केली आहे. दोन्ही फिर्यादी एकमेकांचे जवळचे नातेवाईक आहेत. दोन्ही कडील तेवीस जणांविरोधात याबाबत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार संजय लक्ष्मण पवार यांनी फिर्याद दिली आहे. मंगळवारी सायंकाळी सात वाजेच्या सुमारास भुषण मंगेश वाघमारे व आकाश (पूर्ण नाव माहीत नाही) यांनी फिर्यादीचा भाचा सागर कैलास कोल्हे याचेशी मागील भांडणाची कुरापत काढून झालेल्या वादातून गैरकायद्याची मंडळी जमवून मंगेश काशिनाथ वाघमारे याने संजय पवार यांची गच्ची धरून तू जास्त माजला आहेस का असे बोलून हातातील कुर्हाडीने डोक्यावर मारून दूखापत केली. तर आकाश याने हातातील रॉडने सागर कोल्हे यास मारहाण केली. यावेळी पवार यांची पत्नी पारु ह्या सोडविण्यासाठी गेल्या असता तारा उर्फ बिट्टी यांनी मारहाण केली. यावेळी मंगेश वाघमारे याने चिथावणी दिली. तर साक्षीदारांना वाईट शिवीगाळ केली. संजय पवार यांनी मंगेश वाघमारे, भुषण वाघमारे, काळू वाघमारे, ललित वाघमारे, दिनेश महाले, रामरु द्र भंडारी, अजय पिठे, विजय पिठे, बाळू गवळी, संदिप बारु ट, तारा उर्फ बिट्टी वाघमारे, आकाश, लाला व विशाल (या तिघांची पुर्णनावे माहीत नाही) या चौदा जणांविरोधात फिर्याद दाखल केली आहे.तर तारा वाघमारे यांनीही भास्कर पवार, संजय पवार, सागर कोल्हे, पप्पू लहरे, गणेश पवार, रंजना लहरे, पूजा लहरे, लक्ष्मी पवार, सावित्रा पवार या नऊ जणांविरोधात फिर्याद दिली आहे. सोमवारी (दि.१) भास्कर पवार यांनी जमाव जमवून मागील भांडणाची कुरापत काढली. यातील संजय पवार यांनी गज व इतरांनी लाकडी काठ्यांनी फिर्यादी व साक्षीदार लोकांना शिवीगाळ करत मारहाण केली. व धमकी दिल्याची फिर्याद दिली आहे. पोलिसांनी दोन्ही बाजूकडील तेवीस जणांवर याप्रकरणी गुन्हा दाखल केला असून काही जणांना ताब्यात घेतले.सुरगाणा ग्रामीण रु ग्णालयात प्राथमिक उपचारानंतर जखमींना नाशिक येथे हलविण्यात आले. फिर्यादी संजय पवार यांना डोक्यावर गंभीर जखम झाल्याने त्यांना अतिदक्षता विभागात व सागर यास नाशिक येथील खासगी हॉस्पिटलमध्ये उपचार सुरू आहेत. पुढील तपास उपनिरीक्षक एस.एस.माने हे करीत आहेत.
सुरगाण्यात पूर्व वादातून हाणामारी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 03, 2018 6:49 PM
सुरगाणा : मागील भांडणाची कुरापत निघून येथील गांधीनगरमध्ये दोन गटात झालेल्या हाणामारीत दोन जणांना गंभीर तर काहींना किरकोळ दुखापत झाली असून परस्पर विरोधी फिर्याद दाखल केली आहे. दोन्ही फिर्यादी एकमेकांचे जवळचे नातेवाईक आहेत. दोन्ही कडील तेवीस जणांविरोधात याबाबत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
ठळक मुद्देहाणामारीत कुºहाड, गज, लाठीकाठीचा वापर झाल्याचा आरोप