शहरं
Join us  
Trending Stories
1
IPL Auction 2025: 'नाही नाही' म्हणत शेवटी Mumbai Indians ने Arjun Tendulkar ला संघात घेतलंच, किती लावली बोली?
2
महायुतीत नाराजीनाट्य? एकनाथ शिंदेंच्या भूमिकेकडे लक्ष; अजित दादा भाजपच्या बाजूने...
3
IPL Auction 2025 : KKR सह RCB अन् GT ची मेहरबानी! अनसोल्ड अजिंक्य रहाणेसह या तिघांवर लागली बोली
4
सत्ता स्थापनेच्या हालचालींना वेग; एकनाथ शिंदे उद्या महाराष्ट्राच्या मुख्यमंत्रिपदाचा राजीनामा देणार
5
IPL Auction 2025: काव्या मारनची 'स्मार्ट' खेळी! जयदेव उनाडकटने रचला मोठा इतिहास; केला अनोखा विक्रम
6
विरोधी पक्षनेतेपदासाठी ठाकरे गट आग्रही, पण मविआ एकत्रित दावा करू शकते का? कायदा काय सांगतो?
7
IPL Auction 2025: अर्जुन तेंडुलकर UNSOLD! Mumbai Indiansसह साऱ्यांनीच फिरवली सचिनच्या मुलाकडे पाठ
8
IPL Auction 2025: १३ वर्षांचा वैभव सूर्यवंशी झाला 'करोडपती'! राजस्थानने केलं 'रॉयल' स्वागत; किती लागली बोली?
9
भाजपचे नियोजन 'King', मायक्रो प्लानिंगच्या जोरावर पक्षाला मिळवून दिला सर्वात मोठा विजय
10
IPL Auction 2025: Rohit Sharma ला 'ओपनिंग पार्टनर' मिळाला! Mumbai Indians ने ५.२५ कोटींना 'याला' संघात घेतला!
11
अमेरिकेतील 'या' शहरातून सूर्य गायब; आता थेट दोन महिन्यांनी होणार दर्शन, कारण...
12
अविमुक्‍तेश्‍वरानंद यांनी उद्धव ठाकरेंना दिला होता CM होण्याचा आशीर्वाद, आता सांगितलं माहायुतीच्या महाविजयाचं कारण 
13
कोण आहे Priyansh Arya? ज्याच्यासाठी प्रिती झिंटानं ३० लाख ऐवजी पर्समधून काढले ३.८० कोटी
14
निकालापूर्वी राजकीय संन्यास जाहीर केला, भाजपाला मोठे यश मिळताच निर्णय बदलला; नेते म्हणाले...
15
ऑफिसात डुलकी घेतली, म्हणून कंपनीनं नोकरीवरून काढलं; 'त्यांनी' असा बदला घेतला की, सर्वांनाच चकित केलं!
16
“मविआत आमचे संख्याबळ जास्त, मला विरोधी पक्षनेता व्हायला नक्कीच आवडेल”: भास्कर जाधव
17
IPL Auction 2025 : एका डावात १० विकेट्स घेणाऱ्या MI च्या गोलंदाजाला CSK नं केलं 'करोडपती'  
18
मतमोजणीच्या आकडेवारीत घोळ? व्हायरल पोस्टचे सत्य समोर, निवडणूक अधिकारी म्हणाले...
19
पुन्हा तेच घडले? पिपाणी चिन्हामुळे घोळ, तुतारीला बसला मोठा फटका; शरद पवारांचे ९ उमेदवार पडले
20
“आमचे आमदार फुटणार नाहीत, ताकदीने लढणार”; ठाकरे गटाला ठाम विश्वास, शिंदे गटाला सुनावले

अवकाळी पावसाचा तडाखा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 25, 2020 11:31 PM

जिल्ह्याला बुधवारी (दि. २५) अवकाळी पावसाने झोडपले. अचानक झालेल्या पावसामुळे शेतकऱ्यांची तारांबळ उडाली. आधीच कोरोनाच्या दहशतीत सापडले असताना त्यात आता अस्मानी संकटाची भर पडल्याने शेतकºयांसह सर्वसामान्य जनताही चिंतित झाली आहे.

ठळक मुद्देअस्मानी संकट : द्राक्षबागांसह पिकांचे नुकसान; शेतकऱ्यांच्या आर्थिक विवंचनेत भर

नाशिक : जिल्ह्याला बुधवारी (दि. २५) अवकाळी पावसाने झोडपले. अचानक झालेल्या पावसामुळे शेतकऱ्यांची तारांबळ उडाली. आधीच कोरोनाच्या दहशतीत सापडले असताना त्यात आता अस्मानी संकटाची भर पडल्याने शेतकºयांसह सर्वसामान्य जनताही चिंतित झाली आहे. अनेक भागात पिके आडवी झाली, तर अनेकांच्या घरांचे नुकसान होत संसारोपयोगी वस्तू पाण्यात गेल्या. सुदैवाने कोणतीही जीवितहानी झाली नसली तरी हजारो रुपयांचे नुकसान झाले आहे. नुकसानीचे संबंधित विभागाने तत्काळ पंचनामे करून तत्काळ भरपाई देण्याची मागणी नुकसानग्रस्तांनी केली आहे.येवला तालुक्यात धावपळयेवला : शहर व तालुका परिसरातील काही गावांमध्ये अवकाळी पावसाच्या सरी कोसळल्या. तालुक्यातील अंदरसूल, नगरसूल, अनकाई, पिंपळगाव जलाल, मानोरी, कातरणी, बोकटे, सायगाव आदी परिसरात शेतकरीवर्गाची धावपळ उडाली. गहू सोंगणी, द्राक्ष, हरभरा, कांदा आदी पिके काढण्याचे काम सुरू असून, काढलेला शेतमाल शेतातच गंजी करून ठेवलेला असल्याने तो झाकण्यासाठी शेतकरी वर्गाची मोठी धावपळ झाली.लासलगावला हलक्या सरीलासलगाव : परिसरात सायंकाळी अवकाळी पावसाच्या हलक्या सरींनी अचानक हजेरी लावली. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर ढगाळ वातावरण आणि पावसामुळे नागरिकांसह प्रशासन आणि आरोग्य विभागाच्या चिंतेत भर घातली आहे.सुरगाण्यातील शेतकरी चिंतितसुरगाणा : हतगड व बोरगाव परिसरात अवकाळी पावसाने हजेरी लावली. तर सुरगाणा शहरात दुपारनंतर ढग दाटून आले. यावेळी जोरदार गार हवा सुटली होती. पाऊस मात्र तुरळक झाला असला तरी शेतकरी चिंतित आहेत.पिंपळगावी फळबागांचे नुकसानपिंपळगाव बसवंत : परिसरात फळबागांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. आधीच कोरोना व्हायरसमुळे निर्यातबंदी असल्याने बाजार समित्यांमध्ये शेतीमाल पडून आहे. अशातच अवकाळी पावसाने फळबागांचे मोठं नुकसान झाल्याने शेतकरी पुन्हा अडचणीत सापडला आहे. याशिवाय डाळींब बागांच्या अडचणीत वाढ निर्माण झाली आहे. पिंपळगाव निफाड, दिंडोरी, पाचोरे वणी, शिरवाडे, लोणवडीसह अन्य काही गावामध्ये गारपीट झाली.द्राक्ष उत्पादक हवालदिल; सिन्नर तालुक्यात वीजपुरवठा खंडितचांदोरी : गोदकाठ भागात अचानक झालेल्या अवकाळी पावसाने द्राक्ष उत्पादक हवालदिल झाले आहेत. वातावरणात बदल होताच अनेक शेतकरी आपल्या शेताकडे धाव घेतली व सोंगणी केलेले पीक झाकण्यासाठी कसरत करत होते. या अवकाळी पावसाने ज्या शेतकºयांचे गहू, कांदा या पिकांना मोठ्या प्रमाणात फटका बसणार आहे तर वाºयामुळे गहू, कांदा झोडपून निघाला आहे. आॅक्टोबर - नोव्हेंबर महिन्यात आलेल्या अवकाळी पावसाने मोठ्या प्रमाणात नुकसान झाले व त्यावर दुबार पेरणी करत रब्बी हंगाम सुरू केला व द्राक्ष उत्पादकांनी जिवाची कसरत द्राक्ष वाचवली. मात्र आता अचानक अवकाळी पावसाने पुन्हा हजेरी लावल्याने शेतकºयांचे वार्षिक आर्थिक चक्र थांबणार आहे. द्राक्ष बागांचे मोठ्या प्रमाणत नुकसान झाले.४ सिन्नर : शहर व तालुक्यात सायंकाळी अवकाळी पावसाने हजेरी लावली. यामुळे अनेक गावातील वीजपुरवठा खंडित झाला होता. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर सर्वत्र शुकशुकाट असताना पावसाने हजेरी लावल्याने आणखीनच शांतता निर्माण झाली होती. सुमारे अर्धा तास पाऊस झाल्यानंतर पावसाने विश्रांती घेतली.४ लोहोणेर : येथे दुपारी अचानक अवकाळी पावसाने हजेरी लावल्याने शेतकºयांची तारांबळ उडाली. एकीकडे कोरोनाने धास्तावलेली जनता त्यात अवकाळी पावसाचा तडाखा यामुळे बळीराजा हतबल झाला आहे. सुमारे पाऊण तास चाललेल्या पावसाने कांदा पिकाचे नुकसान केले. तर काढून ठेवलेला कांदा झाकण्यासाठी शेतकरी वर्गाला धावपळ करावी लागली.त्र्यंबकेश्वर परिसरात मुसळधारत्र्यंबकेश्वर : त्र्यंबकेश्वरसह परिसराला सलग दुसºया दिवशी पावसाने झोडपले. नागरिकांनी घराबाहेर न पडण्याचे आवाहन त्र्यंबकेश्वरचे वैद्यकीय अधीक्षक डॉ. मंदाकिनी बर्वे यांनी केले आहे. तर पावसामुळे वारंवार वीज खंडित होण्याचे प्रकार घडत होते.इगतपुरी तालुक्यात गारपीटसर्वतीर्थ टाकेद : इगतपुरी तालुक्याच्या पूर्व भागात वादळीवाºयासह गारपीट झाल्याने पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. बुधवारी टाकेद, मायदरा, धानोशी, सोनोशी, बारशिंगवे, परदेशवाडी, इंदोरे, खडकेद, आंबेवाडी, बांबलेवाडी, शिरेवाडी, घोडेवाडी, अडसरे या भागात जोरदार पाऊस झाल्याने गव्हासह इतर पिकांचे नुकसान झाले. पूर्व भागातीलच कवडदरा, धामणगाव, निनावी, भंडारदरावाडी, आडसरे या भागतही पावसाने धुमाकूळ घातला.

टॅग्स :Rainपाऊस