लखमापूर : ग्रामीण व शहरी भागात कोरोना साथीच्या रोगाने थैमान घातल्याने जवळ जवळ सर्वच नागरिकांना बाहेर पडणे, जिकीरीचे झाले आहे. लॉक डाऊन स्थिती असल्यामुळे नागरिकांना बाहेर जाण्यावर शासनाने काही बंधने घातली आहे. त्यामुळे काही खरेदी करायचे असले तरी बंधने आली आहे. यावर पर्याय म्हणून शहराप्रमाणे ग्रामीण भागात सुध्दा व कोरोना पासून वाचण्यासाठी जनतेने आॅनलाईन खरेदीचा नवीन पवित्रा हातात घेतला आहे.बाजारपेठेत सध्या ग्राहक कमी जास्त प्रमाणात पाहायला मिळतात. त्यामुळे दुकानदार लॉक डाऊनच्या नावाखाली वस्तूच्या किंमती जास्त वाढून देतात . परंतु ग्राहकांना गरज असल्यामुळे ती वस्तू जास्त भावाने खरेदी करावी लागते.परंतु आता मात्र ग्राहक वर्गाने या आर्थिक संकटातून सुटका मिळावी म्हणून आॅनलाईन अॅपव्दारे घरच्या घरी विविध वस्तू खरेदी करण्यास प्रारंभ केला आहे. त्यामुळे जास्त किंमत देऊन वस्तू खरेदी करण्यापेक्षा आता आॅनलाईन खरेदी ने खरेदी केल्यास विशेष सुट व घर पोच वस्तू मिळत असल्यामुळे ग्राहक खुश झालाआहे.आॅनलाईन खरेदीसाठी सध्या बरीच कंपन्यानी आपले चांगले स्थान निर्माण केले आहे. त्यामुळे त्याचा फायदा ग्राहक वर्गाला मिळत असल्यामुळे जवळ जवळ ५० ते ६० टक्के नागरिकांनी आता आॅनलाईन खरेदीलाच पसंती दिली आहे.आॅनलाईन व्दारे ग्राहकांना घरगुती वस्तू, फर्नीचर, वेगवेगळ्या स्वरूपाची कपडे, बूट, घड्याळे, चैनीच्या वस्तू, विविध प्रकारच्या जीवनावश्यक वस्तू, आदी आॅनलाईन खरेदी करता येत असल्यामुळे ग्राहक वर्ग घराच्या बाहेर न पडता व कोरोना पासून दुर राहाण्यासाठी मदत होत आहे.प्रतिक्रि या...विविध कंपन्यानी दिलेल्या आॅनलाईन वस्तू खरेदी मुळे आम्ही आॅनलाईन वस्तू खरेदी करून घेत आहे. आमचा वेळ, पैसा आदीची आर्थिक हानी आमची टळली असून आम्हाला घर बसल्या चांगल्या वस्तू मिळत असल्यामुळे आम्ही खुश आहे.- श्री. डी. शेवरे, ग्राहक, (आॅनलाईन वस्तू खरेदी) (फोटो १० लखमापूर)
ग्रामीण भागात आॅनलाईन खरेदीला पसंती
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 10, 2020 3:52 PM
लखमापूर : ग्रामीण व शहरी भागात कोरोना साथीच्या रोगाने थैमान घातल्याने जवळ जवळ सर्वच नागरिकांना बाहेर पडणे, जिकीरीचे झाले आहे. लॉक डाऊन स्थिती असल्यामुळे नागरिकांना बाहेर जाण्यावर शासनाने काही बंधने घातली आहे. त्यामुळे काही खरेदी करायचे असले तरी बंधने आली आहे.
ठळक मुद्देलखमापूर : कोरोनामुळे नागरिकांचा सावध पवित्रा