मनमाड : शहरात २१ दिवासांनी पाणी येते दुर्दैवी गोष्ट आहे. जनतेला रोज पाणी देण्यासाठी योजना तयार आहे. तुमचे प्रश्न सोडवले जातील अशी ग्वाही मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिली. मनमाड पालिकेच्या निवडणुकीसाठी भाजप उमेदवारांच्या प्रचारार्थ जाहीर सभेमध्ये ते बोलत होते.व्यासपीठावर खासदार हरिश्चंद्र चव्हाण, जिल्हाध्यक्ष दादासाहेब जाधव, अपूर्व हिरे, माजी आमदार संजय पवार, अद्वय हिरे, राजेंद्र पवार, जिल्हा उपाध्यक्ष नितीन पांडे, पंकज खताळ, जय फुलवानी, नारायण पवार, डाँ. आत्माराम कुंभारडे, थेट नगराध्यक्ष पदाचे मनमाड, येवला, नांदगाव येथील उमेदवार कुसुम दराडे, बंडू क्षीरसागर, संजय सानप उपस्थित होते.शहर भाजपच्या वतीने फडणवीस यांचा सत्कार करण्यात आला. खासदार हरिश्चंद्र चव्हाण यांनी मनोगतातून पाणी प्रश्नाकडे मुख्यमंत्र्यांचे लक्ष वेधले. निवडणुकीसाठी रिपाई बरोबर युती कारण्याबाबत प्रतिसाद मिळाला नसल्याची खंत त्यांनी व्यक्त केली.मुख्यमंत्री फडणवीस यांनी आपल्या भाषनातून अनेक मुद्द्यांकडे लक्ष वेधले. ते म्हणाले की २०१९ साला पर्यंत राज्यात एकही व्यक्ती कच्च्या घरात किंवा झोपडीत राहणार नाही. केंद्र व राज्य सरकार गोरगरीब जनतेसाठी सबसीडी देऊन निवाऱ्याचा प्रश्न सोडवत आहे. केवळ खुर्च्या तुडवण्याकरिता किंवा लाल दिव्याच्या गाड्या उडवण्यासाठी मी मुख्यमंत्री झालेलो नाही. जनतेची सेवा करण्याची संधी तुम्ही दिली मला दिली असून मुख्यसेवक म्हणून मी काम करणार असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.५०० व १००० रु पयांच्या नोटबंदी बाबत बोलताना ते म्हणाले की मेहनतीने पैसे कामावणाऱ्यांना चिंता करण्याची गरज नाही. पंतप्रधान मोदी यांनी हा महत्वपूर्ण निर्णय घेऊन एका रात्रीत नकली नोटांचा शिरच्छेद केला आहे. काळ्या पैशाच्या विरोधातील या लढाईमध्ये नागरिकांना ५० दिवसांचा त्रास सहन करावा लागणार आहे, तो सहन करावा असे आवाहन त्यांनी केले. विद्यार्थ्यासाठी राज्य सरकारने योजना सुरु केली असून यातून सुशिक्षीत पिढी तयार होईल असा विश्वास फडणवीस यांनी व्यक्त केला. मराठा समाजाला आरक्षण देण्यासाठी सरकारचे प्रयत्न सुरु असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.
पाणीप्रश्न सोडवण्यास प्राधान्य
By admin | Published: November 18, 2016 12:44 AM