शहरातील सामाजिक कार्यकर्ते, मंडळांचे पदाधिकारी व शांतता समितीच्या बैठकीत मार्गदर्शन करताना खांडवी बोलत होते. कोरोनाची काळजी घेऊन सर्वांनी सणाचा आनंद घ्यावा, मात्र अजिबात गर्दी करू नका. प्रशासनाने गर्दी टाळण्यासाठी ठिकठिकाणी मोबाइल कुंडांची सुविधा उपलब्ध करून द्यावी, अशी सूचनाही त्यांनी या वेळी केली.
कुठल्याही मिरवणुकीला परवानगी नसून दर्शनाची सुविधादेखील ऑनलाइन उपलब्ध करावी, आरतीसाठी गर्दी न करता टप्प्याटप्प्याने कार्यकर्त्यांनी उपस्थित राहून आरती करावी तसेच विसर्जनासाठी गर्दी टाळण्यासाठी पालिकेने ठिकठिकाणी कुंडांची व्यवस्था केल्यास गर्दीवर नियंत्रण येऊ शकणार आहे. महावितरणनेदेखील मंडळांच्या समस्यांप्रश्नी लक्ष घालावे, अशा सूचना खांडवी यांनी केल्या. शहर उत्सवप्रिय असून येथे एकोप्याने सर्व सण साजरे होतात. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर हा गणेशोत्सवही नियमांचे पालन करून साजरा करा, कायदा-सुव्यवस्था बिघडणार नाही याची काळजी सर्वांनी घ्या, असे आवाहन उपविभागीय पोलीस अधिकारी समीरसिंग साळवे यांनी केले. मिरवणुकीत असलेली मानाची परंपरा जपत दरवर्षीप्रमाणेच अगदी शांततेत उत्सव साजरा होईल. शक्यतो कोरोना व्हॅक्सिन घेतलेल्या कार्यकर्त्यांनाच मंडळांनी प्राधान्य द्यावे, आम्ही ही खबरदारी घेणार आहोत, असे माजी नगराध्यक्ष भोलानाथ लोणारी यांनी सांगितले. कोरोनामुळे सर्व काही बंद असून नागरिक त्रस्त झाले आहेत, त्यामुळे उत्सव शांततेत होईल, पण सामाजिक व सांस्कृतिक कार्यक्रमांना निर्बंध घालून किंवा गर्दी न करता ऑनलाइन स्वरूपाने साजरे करण्यास परवानगी मिळावी, असे ज्येष्ठ नेते किशोर सोनवणे यांनी सांगितले. या वेळी धीरज परदेशी, प्रकाश कोल्हे, महेंद्र पगारे आदींनी मनोगत व्यक्त केले. शहर पोलीस निरीक्षक भगवान मथुरे यांनी शासनाच्या पत्रकाचे वाचन करून गणेशोत्सव साजरा करण्याची नियमावली स्पष्ट केली.
सूत्रसंचलन डॉ. प्रसाद कुलकर्णी यांनी केले. तालुका पोलीस निरीक्षक अनिल भवारी यांनी आभार मानले. संयोजन चंद्रकांत निर्मळ व सहकाऱ्यांनी केले. बैठकीस नगराध्यक्ष बंडू क्षीरसागर, शिवसेना शहरप्रमुख नगरसेवक राजेंद्र लोणारी, निसार शेख, अजिज शेख, नगरसेवक रूपेश लोणारी, भूषण शिनकर, भारत वर्मा, अतुल घटे, अविनाश कुक्कर, अल्केश कासलीवाल, संजय सोमासे, मयूर मेघराज, दादाभाई फिटर, सचिन सोनवणे आदींसह शहर परिसरातील गणेश मंडळांचे पदाधिकारी उपस्थित होते.
फोटो- ११ खांडवी येवला
येवला येथे शांतता समितीच्या बैठकीत बोलताना अप्पर पोलीस अधीक्षक चंद्रकांत खांडवी. व्यासपीठावर उपस्थित मान्यवर.
110921\505411nsk_48_11092021_13.jpg
फोटो- ११ खांडवी येवला येवला येथे शांतता समितीच्या बैठकीत बोलताना अप्पर पोलीस अधीक्षक चंद्रकांत खांडवी. व्यासपीठावर उपस्थित मान्यवर.