लढवय्यी कार्यकर्ती, व्याख्याता आणि सामाजिक जाणिवेतून लेखन करणारी लेखिका आता काळाने हिरावून नेली. कुसूमताई पटवर्धन, मेधा पाटकर, प्रतिभा शिंदे यांचय्ा सामाजिक आंदोलनातही पगारे या आघाडीवर होत्या. अभ्यासू आणि स्वतंत्र विचारांची असल्यामुळे स्त्रीवादी चळवळीत तिचा सक्रिय सहभाग राहिला. -प्रा. गंगाधर अहिरे.
पुरोगामी चळवळीच्या अग्रणी नेत्या, तडफदार व्यक्तिमत्व आपल्यातून निघून गेले. त्यांच्या आठवणी कायम स्मरणात राहतील. समाजातील कष्टकरी आणि महिलांच्या प्रश्नावर आवाज उठविण्याबरोबर त्यांना न्याय देण्यासाठी त्यांचा सतत संघर्ष सुरू होता. सामाजिक न्यायाच्या प्रश्नावरील आंदोलनात त्यांचा सक्रिय सहभाग राहिला. लढवय्या व्यक्तिमत्व म्हणून त्या कायम स्मरणात राहतील.
- कॉ. राजू देसले.
महिलांच्या प्रश्नासाठी तिने अविरत संघर्ष केला. तिचे वाचन, अनुभव यामुळे विश्व विस्तारत गेलं. आयुष्यभर ती जनआंदोलनाच्या केंद्रस्थानी राहिली. राष्ट्रसेवा दल, छात्रभारतीतून तिचे नेतृत्व व्यापक होत गेले. अनिता ही समाज परिवर्तनाच्या चळवळीतील आंदोलनजीवी कार्यकर्तीे होती. रस्त्यावरील संघर्षात ती कायम उभी राहिली. दलित, शोषित, वंचित, आणि महिलांचे प्रश्न यासाठी ती अविरत लढत होती.
- प्रा. डॉ. शंकर बोऱ्हाडे.
सामाजिक चळवळीत स्वता:ला झोकून देऊन काम करणारी कार्यकर्ती. बोलण्यातील स्पष्टवक्तेपणा, अभ्यासू व्यक्तिमत्व आणि सामाजिक प्रश्नांची जाण असलेली संवेदनशील कार्यकर्ती. आयुष्यातील अनेक चढउतारांना धीराने सामाेरी जातांना संवेदनशील स्वभावामुळे इतरांच्या मदतीसाठी ती नेहमीच तत्पर होती. याच सामाजिक जाणिवेतून तीने पिडीत, शोषितांसाठी काम केले. माणूस आणि माणुसकी जपणारी अनिता हुरहुर लावून गेली.
- किरण मोहिते.
समाजवादी चळवळीतील धडाडीची कार्यकर्ती.समता आंदोलनापासून गरीब, वंचितांच्या प्रश्नावर, महिला हिंसा-आत्याचार विरोधात अतिशय ताकदीने काम केले. सर्व प्रश्नांच्या मुळाशी जाऊन अभ्यासपुर्ण मांडणी ही अनिताच्या कामाची पद्धत होती. तिचे अकाली जाणे दुख:द आहे. अनिताच्या मृत्येने चळवळीचे मोठे नुकसान झाले आहे.
- श्यामला चव्हाण