मालेगाव : प्रेमविवाह केल्यामुळे बागलाण तालुक्यातील मळगाव येथील वैदू समाजाच्या तरुण व तरुणीला जातपंचायतीने समाजातून बहिष्कृत केल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. पीडित दांपत्याने येथील महिला समुपदेशन केंद्रात जातपंचायतीच्या सहा जणांविरुद्ध तक्रार अर्ज दाखल केला आहे. सदरचा तक्रार अर्ज सटाणा पोलीस ठाण्याकडे वर्ग करण्यात आला असून, संबंधितांविरुद्ध गुन्हा दाखल केला जाणार असल्याचे सूत्रांनी सांगितले.मळगाव येथील दिनेश गोविंद पवार व सुनंदा पवार यांनी २ जानेवारी २०१८ रोजी कुटुंबीयांच्या संमतीने प्रेमविवाह केला. या विवाहाला वैदू जातपंचायतीने विरोध दर्शवित या दांपत्याला समाजातून बहिष्कृत केले. त्यांना सामाजिक कार्यक्रमांपासून वंचित ठेवले जात असल्याने पवार दांपत्याने महिला समुपदेशन केंद्राकडे तक्रार केली आहे. जातपंचायतीचे अशोक मल्लू पवार, पिराजी गोपाळ पवार, शंकर महादू पवार, सोमा रामा हटकर, तायबा महादू हटकर, मारुती मच्छिंद्र हटकर यांनी हा प्रकार केल्याचा आरोप या तक्रार अर्जाद्वारे करण्यात आला आहे.तसेच वारंवार बैठका घेऊन पैशांची मागणी केली आहे. आतापर्यंत एक लाख रुपये देऊनही समाजातून बहिष्कृत ठेवले आहे. नातेवाइकांशी बोलू दिले जात नाही. संबंधितांकडून दमदाटी व शिवीगाळ केली जात असल्याचे तक्रार अर्जात म्हटले आहे. या तक्रार अर्जाची महिला समुपदेशन केंद्राचे समुपदेशक प्रमोद धोंडगे, अपेक्षा पगार, पोलीस उपनिरीक्षक पूनम राऊत, महिला पोलीस कर्मचारी अरुंधती देसले, सुषमा परमारे यांनी गंभीर दखल घेतली आहे. सटाणा पोलीस ठाण्यात सदरचा गुन्हा वर्ग करण्यात आला आहे.वारंवार बैठका घेऊन संशयितांनी पैशांची मागणी केली आहे. आतापर्यंत एक लाख रुपये देऊनही समाजातून बहिष्कृत केले आहे. नातेवाइकांशी बोलू दिले जात नाही. संबंधितांकडून दमदाटी व शिवीगाळ केली जात असल्याचे अर्जात म्हटले आहे.
प्रेमविवाह केलेले जोडपे समाजातून बहिष्कृत
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 14, 2018 1:59 AM
मालेगाव : प्रेमविवाह केल्यामुळे बागलाण तालुक्यातील मळगाव येथील वैदू समाजाच्या तरुण व तरुणीला जातपंचायतीने समाजातून बहिष्कृत केल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. पीडित दांपत्याने येथील महिला समुपदेशन केंद्रात जातपंचायतीच्या सहा जणांविरुद्ध तक्रार अर्ज दाखल केला आहे. सदरचा तक्रार अर्ज सटाणा पोलीस ठाण्याकडे वर्ग करण्यात आला असून, संबंधितांविरुद्ध गुन्हा दाखल केला जाणार असल्याचे सूत्रांनी सांगितले.
ठळक मुद्देमळगाव येथील घटना वैदू जातपंचायतीविरुद्ध तक्रार