शहरं
Join us  
Trending Stories
1
'काकींना विचारणार, नातवाचा पुळका का आलाय?'; अजित पवारांना शरद पवारांनी दिले उत्तर
2
महायुतीचे उमेदवार विलास भुमरे गॅलरीतून पडले, हात-पाय फ्रॅक्चर, उपचार सुरु
3
मनसे उमेदवाराला पाहताच कट्टर शिवसैनिकाच्या पत्नीला अश्रू अनावर; वरळीत काय घडलं?
4
भयंकर! नर्सने माचिसची काडी पेटवली अन् आग लागली; वॉर्डमध्ये नेमकं काय घडलं?
5
विधानसभा निवडणूक निकालानंतर सत्तेसोबत जाणार, प्रकाश आंबेडकरांचे मोठे संकेत
6
शाहिद कपूरच्या ५०० कोटींचा सिनेमा 'अश्वत्थामा'ला लागला ब्रेक! मोठं कारण आलं समोर
7
मुंबईतील २६/११ हल्ल्याचा मास्टरमाईंड बिनधास्त फिरतोय; पाकिस्तान जगाची दिशाभूल करतंय
8
काकींना विचारणार, एवढा काय पुळका आलाय त्या नातवाचा?; अजित पवारांचे विधान
9
हृदयद्रावक! ओव्हरटेक करताना क्रेटाची ऑटोला धडक; अपघातात वधू-वरांसह ७ जणांचा मृत्यू
10
"माझं पहिलं बाळ... पूर्ण भाजलं"; वंशाचा दिवा, आगीने हिरावून नेला, आई-वडिलांचा टाहो
11
रवींद्र वायकर यांना मोठा दिलासा, कथित भूखंड घोटाळा प्रकरण अखेर बंद, गैरसमजातून गुन्हा दाखल केला
12
झाशी मेडिकल कॉलेजच्या NICU वॉर्डमध्ये भीषण आग, १० मुलांचा होरपळून मृत्यू
13
Maharashtra Election 2024: "सगळीकडं जायचं, फक्त भुंकायचं"; आनंदराव अडसूळांचं नवनीत राणांवर टीकास्त्र
14
प्रियंका गांधींची आज कोल्हापुरात 'महाराष्ट्र स्वाभिमान' सभा, सभेची जय्यत तयारी
15
Mutual Funds नं 'या' १५ स्टॉक्समध्ये केली सर्वाधिक खरेदी, तुमच्याकडे आहेत का?
16
आजचे राशीभविष्य, १६ नोव्हेंबर २०२४ : कर्कसाठी आनंदाचा अन् कुंभसाठी काळजीचा दिवस
17
शरद पवारांच्या उमेदवारांना धाकधूक; आधीच ‘ट्रम्पेट’ची धास्ती, त्यात १६ ठिकाणी नामसाधर्म्य अपक्षांची भर!
18
अश्नीर गोव्हरची Bigg Boss 18 मध्ये एन्ट्री; सलमान खानने 'दोगलापना'वर केली टीका म्हणाला- "तुम्ही जे चुकीचं..."
19
‘एक्स’वर १.१५ लाख युजर्सची फुली; अमेरिकी निवडणुकीत ट्रम्पना पाठिंबा देणे मस्क यांना महागात
20
प्रवाशांनो लक्ष द्या, रविवारी तिन्ही मार्गांवर मेगाब्लॉक; असे असेल वेळापत्रक

प्रीमियम टूल्स कारखाना लवकरच सुरूहोणार

By admin | Published: August 19, 2014 12:35 AM

प्रीमियम टूल्स कारखाना लवकरच सुरूहोणार

सातपूर : गेल्या आठ महिन्यांपासून बंद पडलेला सातपूर येथील ‘प्रीमियम टूल्स’ कारखाना पूर्ववत सुरू करण्याबाबत कामगार उपआयुक्तांच्या दालनात कंपनी व्यवस्थापन आणि कामगार संघटना यांच्यात यशस्वी बोलणी झाली आहे. कारखाना पूर्ववत सुरू होणार असल्याने कामगारांमध्ये आनंदाचे वातावरण निर्माण झाले आहे.सातपूर औद्योगिक वसाहतीतील ‘स्नायडर’ कंपनी बंद करण्याचा निर्णय व्यवस्थापनाने घेतल्यानंतर औद्योगिक वर्तुळात आश्चर्य व्यक्त केले जात असतानाच गेल्या आठ महिन्यांपासून प्रीमियम टूल्स कंपनी बंद पडलेली होती. कंपनी पूर्ववत सुरू करावी म्हणून नाशिक वर्कर्स युनियनने गेल्या एप्रिल महिन्यापासून कामगार उपआयुक्त कार्यालयासमोर धरणे आंदोलन सुरू केले होते. दरम्यानच्या काळात अनेक वेळा कामगार संघटना आणि कंपनी व्यवस्थापन यांच्यात बोलणी झाली, परंतु अपेक्षित तोडगा निघू शकला नाही. त्यामुळे ही कंपनी पूर्ववत सुरू होईल की नाही? याबाबत साशंकता निर्माण झाली होती.प्रीमियम टूल्स कंपनी सुरू करण्याबाबत कामगार उपआयुक्त आर. एस. जाधव यांनी पुढाकार घेऊन नाशिक वर्कर्स युनियनचे डॉ. डी. एल. कराड, अ‍ॅड. आर. एस. पांडे, कंपनीचे अधिकारी श्याम केळुस्कर, रितेश गुळवे यांची बैठक घेऊन कंपनी पूर्ववत सुरू करण्याचा निर्णय या बैठकीत घेण्यात आला. या बैठकीत ठरल्याप्रमाणे सोमवारपासून कंपनीत साफसफाईचे काम सुरू आहे. १५ दिवसांत यंत्रांची देखभाल आणि दुरुस्तीचे काम पूर्ण करून १ सप्टेंबरपासून पूर्ववत उत्पादन सुरू करण्यात येणार असल्याची माहिती कामगार उपआयुक्त आर. एस. जाधव यांनी दिली. आठ महिन्यांपासून कंपनी बंद असल्याने कंपनीला पूर्वीच्या आॅर्डर्स मिळविण्यासाठी त्रास सहन करावा लागणार आहे. शिवाय विद्युत मंडळाची कंपनीकडे जवळपास ५० लाखांची थकबाकी असल्याने विद्युत मंडळाला पत्र पाठवून थकबाकी भरण्यासाठी दोन-तीन टप्पे करून द्यावे असे सांगितले आहे. शिवाय आगामी तीन महिने कंपनीचे सुरळीत उत्पादन सुरू करावे त्यानंतर वेतनवाढीच्या करारावर चर्चा करण्यात येईल या तीन महिन्यांच्या काळात कामगारांना नियमित काम देण्याचे ठरले असल्याचेही जाधव यांनी सांगितले. (वार्ताहर)