ऑनलाइन लोकमत
नाशिक, दि. 29 - एकमेकांशी मैत्री झाली आणि या मैत्रीतूनच फुलले प्रेमाचे कमळ अन् मग ‘ते’ दोघे झाले सैराट... अल्पवयीन मुलगी बेपत्ता झाल्याने पालकांनी पोलीस ठाण्यात तक्रार दिली. पालक हवालदिल झाल्याचे समजल्यानंतर ‘ते’ दोघे स्वत:हून म्हसरूळ पोलीस ठाण्यात हजर झाले. पोलिसांनी दोघांच्या पालकांसमोर समजूत काढण्याचा प्रयत्न केला. मात्र प्रेयसीला मला सोपवा, असा हट्ट प्रेमवीराने पोलिसांकडे धरला. पोलिसांनी कायद्याने ते शक्य नसल्याचे सांगितले. नैराश्याच्या गर्तेत बुडाल्याने प्रेमवीर चक्क पोलीस ठाण्याच्या इमारतीवर पोहचला व पहिल्या मजल्यावरून उडी घेतली. सुदैवाने त्याचे प्राण वाचले; मात्र गंभीर दुखापतीला सामोरे जावे लागल्याची घटना (दि.२९) गुरुवारी संध्याकाळी घडली.
याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी, एक अल्पवयीन मुलगी बेपत्ता झाल्याची तक्रार काही दिवसांपूर्वी म्हसरूळ पोलीस ठाण्यात मुलीच्या नातेवाइकांनी दिली होती. मुलगी अल्पवयीन असल्याने पोलिसांनी बेपत्ता व अपहरणाचा गुन्हा नोंदविला. याबाबत त्या युवकाला माहिती मिळाल्यानंतर गुरुवारी तो मुलीला घेऊन पोलीस ठाण्यात हजर झाला. यावेळी त्याने आमचे प्रेमसंबंध असून आम्हाला एकत्र राहायचे आहे. मी मुलीचे अपहरण केलेले नाही, असे पोलिसांना सांगितले. मुलगी अल्पवयीन असल्यामुळे कायद्याने मुलीला तुझ्याकडे सोपविता येणार नाही, असे सांगून पोलिसांनी सदर प्रेमवीराला समजाविण्याचा प्रयत्न केला; मात्र प्रेमवीर आपल्या हट्टावर ठाम राहिला. पोलिसांनी मुलीला तिच्या पालकांच्या स्वाधीन केले आणि त्यानंतर सर्व जण पोलीस ठाण्याबाहेर पडले. याचवेळी प्रेमवीराने सर्वांची नजर चुकवून पोलीस ठाण्याच्या इमारतीच्या गच्चीवर जाऊन खाली उडी मारली. सदर घटना घडल्यानंतर पोलीस अधिकारी व कर्मचाºयांनी प्रेमवीराला जखमी अवस्थेत जिल्हा शासकीय रुग्णालयात उपचारार्थ दाखल केले. या घटनेत प्रेमवीराच्या हाता-पायांसह कमरेला गंभीर दुखापत झाली असून, माझ्या प्रेयसीला मला सोपविले नाही म्हणून मी उडी मारली, असा जबाब जखमी प्रेमवीराने पोलिसांना