शहरं
Join us  
Trending Stories
1
Vinod Tawde : भाजप नेते विनोद तावडे यांच्यावर निवडणूक आयोगाची कारवाई, पैसे वाटल्याच्या आरोपावरून FIR दाखल
2
“भाजप अन् विनोद तावडेंवर निवडणूक आयोगाने कठोर कारवाई करावी”: बाळासाहेब थोरात
3
विनोद तावडेंच्या डायरीत १५ कोटी रुपयांची नोंद; क्षितीज ठाकूर यांचा खळबळजनक आरोप
4
संपूर्ण महाराष्ट्रात २० नोव्हेंबरला सरकारी सुट्टी; शेअर बाजार-बँका बंद, पण...
5
...अन् शेवटी तावडे आणि ठाकूर एकाच गाडीत बसून गेले; चार तासांत नेमकं काय-काय घडलं?
6
एवढा पैसा आला कुठून? विनोद तावडेंच्या आरोपावरून सुप्रिया सुळेंचा सवाल
7
‘एक है तो सेफ है’ घोषणेवरून लालूप्रसाद यादवांची भाजपासह साधूसंतांवर टीका, म्हणाले...  
8
Vinod Tawde: विनोद तावडे प्रकरणात ९,९३,५०० रुपये रक्कम सापडली; निवडणूक आयोगाची माहिती
9
IPL 2025: मेगा लिलावाआधी १९ वर्षीय मराठमोळ्या खेळाडूची रंगली चर्चा, कोण आहे तो?
10
“गृहखात्याने पाळत ठेवली अन् विनोद तावडे जाळ्यात अडकतील याचा बंदोबस्त केला”; राऊतांचा दावा
11
Vinod Tawde: विनोद तावडे प्रकरण मिटले? हितेंद्र ठाकुरांसोबत एकत्र पत्रकार परिषद होती, पोलिसांनी रोखली
12
"महाराष्ट्रातील स्वाभिमानी जनता मत विकणार नाही’’, जयंत पाटील यांचा भाजपाला टोला   
13
कर्तव्यनिष्ठेला सलाम! स्वतःच्या जीवाची पर्वा न करता नर्सने १५ बाळांचा आगीतून वाचवला जीव
14
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 :'अखेर भ्रष्टयुतीचा कारभार उघडा पडला, विनोद तावडेंवर कारवाई झाली पाहिजे'; नाना पटोलेंची मागणी
15
Vinod Tawde: बविआने पैसे वाटताना पकडले? विनोद तावडेंची पहिली प्रतिक्रिया...
16
आईवरील उपचार थांबवून त्यांनी...; श्रीनिवास पवारांचा अजित पवारांवर मोठा आरोप
17
घसरत्या बाजारात कुठे गुंतवणूक कराताहेत Mutual Fund हाऊस, कोणते आहेत ३ महिन्यांतील टॉप शेअर्स?
18
एक विवाह ऐसा भी! ११ रोपं आणि १ रुपया घेऊन नवरदेवाने बांधली लग्नगाठ; म्हणाला...
19
गौरी महालक्ष्मी योग: ७ राशींना भरपूर लाभ, शेअर बाजारातून नफा; उत्पन्न वाढेल, सुख-वैभव काळ!
20
अमेरिकेत संक्रमित गाजर खाल्ल्याने एका व्यक्तीचा मृत्यू, अनेक जण आजारी; १८ राज्यांमधून परत मागवले

नाशिकमध्ये आता प्रिपेड टॅक्सी सेवा सुरू होणार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 12, 2018 12:07 AM

पंचवटी : प्रिपेड रिक्षांपाठोपाठ आता नाशिक शहरात आता प्रिपेड टॅक्सीही सुरू होणार असून तसा निर्णय नुकत्यात झालेल्या प्रादोशिक परिवहन प्राधीकरणाच्या बैठकीत घेण्यात आला आहे.

पंचवटी : प्रिपेड रिक्षांपाठोपाठ आता नाशिक शहरात आता प्रिपेड टॅक्सीही सुरू होणार असून तसा निर्णय नुकत्यात झालेल्या प्रादोशिक परिवहन प्राधीकरणाच्या बैठकीत घेण्यात आला आहे. प्राधिकरणची बैठक जिल्हाधिकारी बी. राधाकृष्णन् यांच्या प्रमुख उपस्थितीत संपन्न होऊन विविध धोरणात्मक ठरावांना मंजुरी देण्यात आल्याची माहिती प्रादेशिक परिवहन अधिकारी भरत कळसकर यांनी पत्रकार परिषदेत दिली. परराज्यातून मोठ्या संख्येने भाविक नाशिकरोड रेल्वेस्थानकावर आल्यानंतर शहरात येतात. त्यांना ऐच्छिक स्थळी आरामदायी व कोणत्याही प्रकारची फसवणूक न होता सुरक्षित प्रवासासाठी प्रायोगित तत्त्वावर प्रि-पेड टॅक्सी सेवा सुरू करण्यात येणार असून सदर केंद्रातून नाशिक-शिर्डी, सापुतारा, पिंपळगाव, सप्तशृंग गड, मनमाड, सिन्नर, इगतपुरी, शनिशिंगणापूर व शहरांतर्गत या मार्गांवर ही सेवा सुरू करण्यात येणार आहे.शहरातील वाढती वाहनांची संख्या व प्रवाशांना देण्यात येणाºया सुखसुविधा, शहरातील वाढते प्रदूषण याबाबत सामाजिक जबाबदारी म्हणून प्राधिकरणाने जुन्या वाहनांच्या बाबतीतही निर्णय घेऊन राज्य परिवहन प्राधिकरणाने निर्देशित केल्यानुसार नाशिक प्राधिकरणाने सर्व मार्गावर चालणाºया कुलकॅब, रिक्षा, स्कूल बस व टुरिस्ट वाहनांची आर्युमर्यादा निश्चित केली आहे. यामुळे शहरातील प्रदूषण कमी होऊन स्मार्ट सिटी संकल्पनेस मदत होईल. यात रिक्षा २० वर्षे, कुलकॅब १२ वर्षे, स्कूलबस १५ तर टुरिस्ट ९ वर्षे अशी वाहनांची वयोमर्यादा निश्चित केली आहे. टुरिस्ट कॅब यांना परवाने देणे, नूतनीकरण करणे व न करण्याचे प्रादेशिक परिवहन अधिकारी यांना प्रदान केलेले अधिकार शिथिल करून ज्या कार्यालयात टुरिस्ट टॅक्सी नोंदणी करण्यात येईल त्या संबंधित कार्यालयाच्या कार्यालय प्रमुखांना अधिकार प्रदान करण्यात येणार आहे.नविन रिक्षांना मिळणार परवानेशहरात सध्या १९ हजार अधिकृत परवानाधारक रिक्षा संख्या आहेत. आता अ‍ॅटोरिक्षा, टॅक्सी नवीन परवाने जारी करण्यात येणार आहेत. मोटार वाहन कायद्यामधील तरतुदीनुसार रिक्षांच्या संख्येवर १९९७ पासून मर्यादा आणली होती, परंतु जुलै २०१७ च्या शासन निर्णयानुसार अ‍ॅटोरिक्षांच्या परवान्यावरील निर्बंध उठविले असून त्यामुळे शहरातील बेरोजगार युवकांना परवाने मिळणे सोपे झाले आहे. यासाठी १० हजार रुपये शुल्क आकारले जाणार आहेत.  कॅबधारकांना अतिरिक्त व्यवसाय व उत्पन्न प्राप्त व्हावे यासाठी महाराष्टÑ राज्यात मोटार कॅब संवर्गातील वाहनांवर जाहिराती प्रसिद्ध करता येणार आहे. सध्याचे शहरांचे होणारे प्रदूषण बघता वाहनांकडून सर्वाधिक प्रदूषण होते या कारणांमुळे बॅटरी संचलित वाहनांना सेवा म्हणून नोंदणी केली तर प्रदूषण कमी होईल व इंधन वापराच्या तुलनेत खर्चाचे व आर्थिकदृष्ट्या फायदेशीर ठरावे म्हणून बॅटरी संचलित वाहनांना सार्वजनिक सेवा म्हणून नोंदणी करता येईल. टुरिस्ट बस परवाने देणे, नाकारणे व नूतनीकरणाचे अधिकार प्रादेशिक परिवहन अधिकाºयांना प्रदान केल्याने या कामासाठी आता राज्यस्तरीय परिवहन कार्यालयात जाण्याची गरज पडणार नाही. सार्वजनिक वाहन चालविण्याचा बिल्ला नसताना चालकाकडे वाहन चालविण्यास देणाºया मालकावर कारवाई करण्याबाबतचा ठराव मंजूर करण्यात आला आहे. अ‍ॅटोरिक्षा परवानाधारक व परिवहन कार्यालयाच्या कार्यक्षेत्रात स्थलांतरित झालेल्या परवानाधारकांचे परवाने संबंधित प्रादेशिक व उपप्रादेशिक परिवहन कार्यालयात स्थलांतर करण्यात येणार आहे.विद्यार्थ्यांचा सुरक्षित व आरामदायी प्रवास व्हावा यासाठी इतर शहरातून वयोमर्यादा संपलेल्या वाहनांची नोंदणी आपल्या परिक्षेत्रात होणार नाही त्यामुळे जास्तीत जास्त नव्या वाहनांचे रूपांतर व नोंदणी होईल, या हेतूने स्कूल व्हॅन संवर्गात रूपांतर करण्यात आले आहे. कोणत्याही जुन्या गाड्या रूपांतरीत (कन्व्हर्ट) करता येणार नाहीत त्यामुळे नवीन वाहने घ्यावी लागतील तसेच एप्रिलपर्यंत सर्व स्कूलबस पिवळ्या रंगाच्या होतील,असे यावेळी सांगण्यात आले. शहरातून प्रवास करणाºया प्रवाशांना प्रवास करता यावा, यासाठी इलेक्ट्रॉनिक मीटरप्रमाणे प्रवास करता येणार आहे. नाशिकरोड, सीबीएस या भागात असे स्टॅण्ड करून प्रवाशांना सुविधा देणारे रिक्षाचालक मीटरप्रमाणेच पैसे आकारतील. मीटरप्रमाणे ज्या रिक्षा चालतील त्यांच्या वेगळ्या रांगा केल्या जाणार आहेत.

टॅग्स :Nashikनाशिक