लोकमत न्यूज नेटवर्कघोटी : येथील टोलनाक्यावर स्थानिक वाहनांना आधीप्रमाणे फास्टटॅगमधून टोलमाफी देणे हा स्थानिकांचा हक्क आहे. स्थानिक वाहनांकडून फास्टटॅगच्या नावाखाली टोल घेण्याचा प्रयत्न हाणून पाडला जाईल, यासाठी वेळ पडल्यास आंदोलन करण्याची तयारी स्थानिक रहिवाश्यांनी केली आहे.इगतपुरी येथील तहसीलदार कार्यालयात सोमवारी (दि.२) सर्वपक्षीय पदाधिकारी, कार्यकर्ते आणि स्थानिक नागरिकांच्या उपस्थितीत झालेल्या बैठकीत आमदार हिरामण खोसकर यांनी फास्टर्टग मधून स्त्रानिक नागरीकांना वगळे जावे अशी मागणी केली. त्यांनी याप्रश्नी कठोर भूमिका घेतली. लोकमतमध्ये २३ नोव्हेंबरला ‘स्थानिकांची टोलमाफी बंद होणार!’ या शीर्षकाखाली वृत्त प्रसिद्ध झाले होते. त्यानुसार आमदार खोसकर यांनी टोल प्रशासन, पोलीस आणि तहसीलदार यांच्यासह बैठकीचे आयोजन केले होते.टोलनाक्यावर स्थानिक बेरोजगार युवकांना कामाची संधी द्यावी. इतर जिल्ह्यातील कामगार काम करीत असतील तर हा अन्याय सहन करणार नसल्याचे त्यांनी ठणकावले.इगतपुरी तालुक्याने विकासासाठी कवडीमोल भावाने शासनाला जमिनी दिल्या आहेत. ५६ हजार हेक्टर जमीनीचे विकासाला योगदान दिलेले आहे. असे असतांना टोल नाक्यावर फास्टटॅगमुळे स्थानिक वाहनधशरकांना त्रास होणार आहे. स्थानिक वाहनांना तातडीने टोलमाफी करावी अन्यथा जनआंदोलन करण्याचे बैठकीत सांगितले.टोल प्लाझाचे प्रमुख अधिकारी उपस्थित नसल्याने प्रोजेक्ट इंजिनिअर राकेश ठाकुर, सिनिअर जनरल मॅनेजर आनंद सिंग उपस्थित होते. यामुळे कोणताही ठोस निर्णय घेता येत नसलेल्या अधिकाऱ्यांशी बोलण्यात अर्थ नाही असे सांगून बैठक गुंडाळण्यात आली.यावेळी प्रशासन नायब तहसीलदार राजेंद्र कांबळे, घोटीचे सहाय्यक पोलीस निरीक्षक जालींदर पळे यांच्यासह सर्व राजकीय पक्षाचे पदाधिकारी, कार्यकर्ते व ग्रामस्थ उपस्थित होते.याबाबत मंगळवारी (दि.३) नाशिकला गोल्फ क्लब येथे शासकीय विश्रामगृहात बैठक आयोजित करण्यात आली आहे.(फोटो ०२ घोटी टोल, ०२ लोकमत न्युज)टोलप्लाझावर स्थानिक वाहन धारकांना फास्टटॅग मधुन टोलमाफी देण्यात यावी यासाठी तहसील कार्यालयात आयोजित करण्यात आलेल्या बैठकीत मार्गदर्शन करतांना हिरामण खोसकर.
घोटी टोलनाक्यावर स्थानिक वाहनांना टोलमाफी न दिल्यास आंदोलनाची तयारी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 02, 2019 7:14 PM
घोटी : येथील टोलनाक्यावर स्थानिक वाहनांना आधीप्रमाणे फास्टटॅगमधून टोलमाफी देणे हा स्थानिकांचा हक्क आहे. स्थानिक वाहनांकडून फास्टटॅगच्या नावाखाली टोल घेण्याचा प्रयत्न हाणून पाडला जाईल, यासाठी वेळ पडल्यास आंदोलन करण्याची तयारी स्थानिक रहिवाश्यांनी केली आहे.
ठळक मुद्देजनआंदोलन करण्याचे बैठकीत सांगितले.