बोकटे : येथील यात्रोत्सव शुक्रवार (दि.२६) पासून सुरू होत असून व्यापाऱ्यांनी आपली दुकाने थाटली आहेत. मात्र पालखेडचे पाणी येथपर्यंत न पोहोचल्याने ग्रामस्थ संतप्त होऊन हतबल झाले आहेत. याकरीता प्रत्येकाने एक लिटर पाणी व एक रुपया देण्याचे बोकटे, देवळाने, दुगलगाव ग्रामस्थ हे पाण्यासाठी आवाहन केले आहे.शुक्रवार (दि.२६) ते मंगळवार (दि.३०) या दरम्यान बोकटे येथे यात्रेचे आयोजन केले आहे. या वर्षी पालखेडचे पाणी बोकट्यापर्यंत येऊ शकले नाही. त्यामुळे पाण्याची भीषण टंचाई आहे. आणि यात्रेसाठी लाखो भाविक येतात, शेकडो छोटी मोठी दुकाने थाटलेली असतात. मात्र गावातील तीव्र पाणी टंचाईमुळे पाण्याशिवाय यात्रा उत्सव पार पाडणे खूप अशक्य होत आहे. म्हणुन ज्याला ज्याला शक्य आणि इच्छा असेल त्यांनी यात्रेतील भाविकांची तहान भागवण्यासाठी शक्य होईल त्या मार्गाने पाणी टँकर किंवा पाण्याच्या नियोजनासाठी एक लिटर पाणी आणि एक एक रु पया द्यावा असे बोकटे, देवळाने, दुगळगाव ग्रामस्थांच्यावतीने उपसरपंच प्रताप दाभाडे, विनोद दाभाडे यांनी केले आहे.
बोकटे यात्रोत्सवाची तयारी पूर्णत्वाकडे
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 25, 2019 10:11 PM
बोकटे : येथील यात्रोत्सव शुक्रवार (दि.२६) पासून सुरू होत असून व्यापाऱ्यांनी आपली दुकाने थाटली आहेत. मात्र पालखेडचे पाणी येथपर्यंत न पोहोचल्याने ग्रामस्थ संतप्त होऊन हतबल झाले आहेत. याकरीता प्रत्येकाने एक लिटर पाणी व एक रुपया देण्याचे बोकटे, देवळाने, दुगलगाव ग्रामस्थ हे पाण्यासाठी आवाहन केले आहे.
ठळक मुद्देपाणी टंचाई : १ लिटर पाणी, १ रुपया लोकांना केले आवाहन