प्रवीण आडके । लोकमत न्यूज नेटवर्कदेवळाली कॅम्प : कॅन्टोन्मेंट बोर्डाच्या निवडणुकीच्या तयारीसाठी प्रशासनाकडून मतदार यादीला अंतिम स्वरूप देण्याचे काम केले जात असून, घरपट्टी लागू नसलेल्या घरातील सभासदांचे मतदार यादीतील नाव वगळण्यात आल्याने अनेकांना मतदानापासून वंचित राहावे लागणार आहे. कॅन्टोन्मेंट निवडणुकीच्या मतदानाचा हक्क पाच हजार नागरिकांना बजावता येणार नाही.ब्रिटिशांनी स्थापन केलेल्या कॅन्टोन्मेंट प्रशासनाला कायद्याने स्वतंत्र अस्तित्व देताना राज्य व केंद्र सरकारचे नियम न पाळण्याची मुभा देण्यात आलेली आहे. सुप्रीम कोर्टाने दिलेल्या निकालावर कोणतेही सरकारी अधिसूचना जारी न करता लागू करणे म्हणजे नागरिकांना मूलभूत मतदानाच्या हक्कापासून वंचित ठेवावे लागणार आहे. लोकसभा, विधानसभा निवडणुकीत ज्यांनी मतदान केले, अशा सुमारे पाच हजार नागरिकांना कॅन्टोन्मेंटच्या निवडणुकीत मतदान करता येणार नाही. मतदार यादीतून वगळण्यात आलेल्या नावांमध्ये तर अनेक इच्छुक उमेदारांचा समावेश आहे.निवडणूक आयोगाने लोकसभेच्या निवडणुकीपूर्वी जे नागरिक सहा महिन्यांपेक्षा जास्त कालावधीत वास्तव्यास आहेत त्यांना मतदानाचा हक्क देण्यासाठी स्वतंत्रपणे उपक्रम राबविला होता. त्याच निवडणूक प्रकियेसाठी संरक्षण विभागाच्या अंतर्गत असणाऱ्या कॅन्टोन्मेंट परिषदेला मात्र निवडणूक आयोगाचे कोणतेही नियम लागू नाहीत. २०१६ सुप्रीम कोर्टाच्या निकालानुसार संरक्षण विभागाच्या जागेवर अतिक्रमण व ज्या घरांना घरपट्टी लागू करण्यात आलेली नाही अशा घरातील सभासदांना स्थानिक स्वराज्य संस्थेच्या मतदार यादीतून वगळण्यात आल्याने देवळाली कॅम्पमधील अंदाजे पाच हजार मतदारांना मतदानाच्या हक्कापासून वंचित राहावे लागणार आहे.दर वर्षीप्रमाणे जून महिन्यात कॅन्टोन्मेंटच्या प्रशासनाने मतदार नोंदणी राबवून आगामी निवडणुका लक्षात घेत मतदार यादीला अंतिम स्वरूप देण्याचे काम सुरू केले आहे. मात्र घरपट्टी लागू नसलेल्या मतदारांना मतदानापासून दूर ठेवण्याच्या निर्णयामुळे लगतच्या मळे भागातील नागरिकांना मोठा फटका बसणार आहे. संजय गांधी झोपडपट्टी व जुनी स्टेशनवाडी येथील २५००पेक्षा जास्त नागरिकांचे नावे वगळण्यात आली आहे. देवळाली कॅम्प परिसरात पाचशे ते सातशेहून अधिक घरांना घरपट्टी लावण्याची प्रक्रिया राहून गेल्याने २५०० पेक्षा नागरिकांना मतदान करता येणार नाही.अतिक्रमितांना अभयघरपट्टी लागू नये अशांची मतदार यादीतून गच्छंती करण्याची तरतूद असली तरी, ज्या लोकप्रतिनिधींनी अतिक्रमित बांधकाम केले त्यांची नावे मात्र मतदार म्हणून घेण्यात आले आहेत. त्यामुळे कॅन्टोन्मेंट कायद्यात विरोधाभास आढळून येतो.
कॅन्टोन्मेंट निवडणुकीची तयारी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 17, 2019 1:00 AM
देवळाली कॅम्प कॅन्टोन्मेंट बोर्डाच्या निवडणुकीच्या तयारीसाठी प्रशासनाकडून मतदार यादीला अंतिम स्वरूप देण्याचे काम केले जात असून, घरपट्टी लागू नसलेल्या घरातील सभासदांचे मतदार यादीतील नाव वगळण्यात आल्याने अनेकांना मतदानापासून वंचित राहावे लागणार आहे.
ठळक मुद्देयाद्यांचे काम सुरू : घरपट्टी नसलेल्यांना मतदानाचा हक्क नाही