नाशिक : मुंबई-आग्रा या राष्टÑीय महामार्गाचा गेल्या सात दशकांचा साक्षीदार असलेला गोदावरी नदीवरील कन्नमवार पूल त्याच्या कालौघातातील कमकुवतपणामुळे चालू महिन्यात जमीनदोस्त करण्यात येणार असून, त्यासाठीची तयारी राष्टÑीय महामार्ग प्राधिकरणाने पूर्ण केली आहे. कन्नमवार पुलाच्या जागी दीड वर्षांत नवीन पुलाची उभारणी करण्याच्या कामाचा शुभारंभ याच महिन्यात होण्याची शक्यता आहे.राष्ट्रीय महामार्गाचे चौपदरीकरण व बळकटीकरणांतर्गत सदरचे काम करण्यात येणार असून, गेल्या वर्षी केंद्रीय रस्ते वाहतूकमंत्री नितीन गडकरी यांच्या उपस्थितीत या कामांचे भूमिपूजन करण्यात आले होते. नाशिक शहरातून जाणाºया राष्ट्रीय महामार्गावर नाशिक व पंचवटी या दोन्ही भागांना जोडण्यासाठी १९६०च्या आसपास गोदावरी नदीवर कन्नमवार पुलाची उभारणी करण्यात आली होती. त्याकाळी यामार्गावर असलेली वाहनांची वर्दळ लक्षात घेऊन पूर्णत: दगडांच्या उभारणीतून हा पूल तयार करण्यात आला. तत्कालीन महाराष्टचे मुख्यमंत्री मारोतराव कन्नमवार यांच्या आठवणीतून या पुलाचे कन्नमवार पूल म्हणून नामकरण करण्यात आले. अनेक बºया-वाईट घटनांचा साक्षीदार असलेल्या या पुलावरून राष्ट्रीय महामार्गावरील कोट्यवधी हलक्या, जड वाहनांनी आजवर वर्दळ केली. कालांतराने महामार्गावरील वाहनांची संख्या वाढल्याने नाशिक महापालिकेने कन्नमवार पुलाला समांतर पुलाची उभारणी केली, परिणामी कन्नमवार पुलावरून एकेरी वाहतूक सुरू झाल्याने या पुलावरील वाहनांचा ताण कमी झालाच शिवाय एकेरी वाहतुकीमुळे सुरुळीतपणाही आला. परंतु कालौघात या पुलाचे आयुष्यमान कमी झाल्याने तो धोकादायक ठरू शकण्याची भीती व्यक्त करण्यात आली त्यामुळे राष्टÑीय महामार्गाच्या बळकटीकरणांतर्गत या पुलाची पुनर्उभारणी करण्याचा निर्णय घेण्यात आला व त्यासाठी कोट्यवधी रुपयांची तरतूदही केंद्रीय रस्ते विकास महामंडळाने केली. राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाने या पुलाच्या उभारणीसाठी तांत्रिक सल्लागाराची निवड करून पूल उभारणीचे नकाशे तयार केले, त्याला काही महिन्यांपूर्वीच मान्यता देण्यात आल्याने पूल उभारणीसाठी निविदा मागविण्यात आली व नाशिकच्याच सांगळे कंट्रक्शनला कंपनीला त्याचे काम देण्यात आले आहे.
तयारी पूर्ण : नवीन पुलाच्या उभारणीचा याच महिन्यात करणार शुभारंभ कन्नमवार पूल होणार जमीनदोस्त!
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 10, 2017 12:20 AM
मुंबई-आग्रा या राष्टÑीय महामार्गाचा गेल्या सात दशकांचा साक्षीदार असलेला गोदावरी नदीवरील कन्नमवार पूल त्याच्या कालौघातातील कमकुवतपणामुळे चालू महिन्यात जमीनदोस्त करण्यात येणार असून, त्यासाठीची तयारी राष्टÑीय महामार्ग प्राधिकरणाने पूर्ण केली आहे. कन्नमवार पुलाच्या जागी दीड वर्षांत नवीन पुलाची उभारणी करण्याच्या कामाचा शुभारंभ याच महिन्यात होण्याची शक्यता आहे.
ठळक मुद्देराष्ट्रीय महामार्गाचे चौपदरीकरण१९६०च्या आसपास पुलाची उभारणीपुलाला समांतर पुलाची उभारणी