शहरं
Join us  
Trending Stories
1
मतदानाच्या एक दिवस आधीच ठाकरे गटाला धक्का; डोंबिवलीतील नाराजीचा शिंदे गटाला फायदा
2
Maharashtra Election 2024: ‘या’ मतदारसंघांमध्ये विद्यमान आमदार लढवत नाहीये निवडणूक! काय आहेत कारणे?
3
अक्षय शिंदे चकमक: दंडाधिकाऱ्यांपुढे पुरावे ठेवण्यास उशीर का?; हायकोर्टाचे सीआयडीवर ताशेरे
4
Baba Siddique : ऑपरेशन बाबा सिद्दिकी डिकोड: App ने कॉन्टॅक्ट, जेलमधून शूटर्सचा इंटरव्ह्यू...; 'असा' रचला कट
5
T20I Record : टीम इंडियानं वर्ष गाजवलं अन् पाकिस्तानच्या संघानं 'लाजवलं'
6
पाकिस्तानात हाहा:कार! नऊ दहशतवाद्यांचा खात्मा, सात सुरक्षारक्षक ठार, सात पोलीस 'किडनॅप'
7
वंचितचे कळमनुरी मतदारसंघातील उमेदवार डॉ. दिलीप मस्के यांच्यावर हल्ला
8
सत्ताधारी सत्तेसाठी खालच्या थराला जात आहेत; देशमुखांवरील हल्ल्यानंतर शरद पवारांचा संताप
9
"...अन्यथा माझा बाबा सिद्दिकी व्हायला वेळ लागणार नाही", शरद पवार गटाच्या रमेश कदमांना जीवे मारण्याची धमकी 
10
नीरव मोदी-विजय माल्ल्यावर कारवाई होणार! PM मोदींनी ब्रिटनसमोर उपस्थित केला मुद्दा
11
ऐन निवडणुकीत पक्षाकडून निलंबन; सांगता सभेत शरद पवारांबद्दल काय म्हणाले राहुल जगताप?
12
"...तर उद्धव ठाकरे यांच्यावर FIR का दाखल होत नाही? त्यांना आत का टाकत नाही?"; रामदास कदम यांचा सवाल
13
मराठी-हिंदी गाणी गाणाऱ्या प्रसिद्ध गायकाने गमावलेला आवाज, २ वर्षांनी केला खुलासा
14
या सगळ्या अफवा! असित मोदींसोबतच्या भांडणावर जेठालालचं स्पष्टीकरण, म्हणाले- "मी हा शो सोडत नाहीये..."
15
कश्मिरा शाहचा अपघात नक्की कसा झाला? नणंद आरती सिंहने दिली माहिती; म्हणाली, "मॉलमध्ये..."
16
Mohammed Shami च्या फिटनेस टेस्टसाठी BCCI नं सेट केला नवा पेपर
17
'हे' ७ फॉर्म्युले डोक्यात फिट करा, कमाईसोबतच तुमचा पैसाही वाढेल; लोकही विचारतील, "हे कसं केलं?"
18
मोदी-ठाकरे-पवार-शिंदेंनी मैदान गाजवलं; सोलापुरात कुठे कोणत्या नेत्याच्या सभा झाल्या? जाणून घ्या
19
27000 सैनिक तैनात, अनेक जिल्ह्यात कर्फ्यू, इंटरनेट बंद; मणिपूरमध्ये नेमकं काय घडतंय?
20
भयानक! समुद्रकिनारी बसलेल्या माय-लेकी, अचानक लाट आली अन्...; थरकाप उडवणारा Video

जिल्हाधिकारी कार्यालयात टेम्परेचर गनसह आरोग्य उपकरणांची सज्जता

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 17, 2020 6:45 PM

नाशिक : महानगरासह जिल्ह्यातील कोरोनाचा वाढता प्रसार तसेच कार्यालयातील कर्मचारी आणि बाहेरून येणाऱ्या नागरिकांची सुरक्षितता लक्षात घेऊन जिल्हाधिकारी कार्यालयात टेम्परेचर गनसह सर्व अत्यावश्यक उपकरणांची सज्जता करण्यात आली आहे. थर्मल स्क्रीनिंगद्वारे प्रत्येक व्यक्तीच्या शरीरातील तापमानाची खात्री करूनच एकेकाला आत जाऊ देण्याचा पर्याय स्वीकारण्यात आला आहे.

ठळक मुद्देथर्मल स्क्रीनिंगनागरिकांची सुरक्षितता

नाशिक : महानगरासह जिल्ह्यातील कोरोनाचा वाढता प्रसार तसेच कार्यालयातील कर्मचारी आणि बाहेरून येणाऱ्या नागरिकांची सुरक्षितता लक्षात घेऊन जिल्हाधिकारी कार्यालयात टेम्परेचर गनसह सर्व अत्यावश्यक उपकरणांची सज्जता करण्यात आली आहे. थर्मल स्क्रीनिंगद्वारे प्रत्येक व्यक्तीच्या शरीरातील तापमानाची खात्री करूनच एकेकाला आत जाऊ देण्याचा पर्याय स्वीकारण्यात आला आहे.कोरोनाच्या वाढत्या प्रसारासह अत्यावश्यक आरोग्य उपकरणांची अपरिहार्यता लक्षात घेऊन जिल्हाधिकारी कार्यालयात ही सर्व यंत्रणा कार्यान्वित करण्यात आली आहे. प्रत्येक व्यक्तीला आता कोरोनासोबत राहून स्वत:ला वाचवत जगणे अपरिहार्य झाले आहे. त्यामुळे आता लॉकडाऊनपेक्षा नागरिकांना स्वयंशिस्त पाळावी लागणार आहे. अडीच महिन्यांनतर शासकीय कार्यालयातील कामकाजही हळूहळू सुरू होत असून, त्या पार्श्वभूमीवर जिल्हाधिकारी सूरज मांढरे यांनी कार्यालय परिसराची पाहणी करून परिस्थितीचा आढावा घेतला. यावेळी कोरोनाचा संसर्ग होऊ नये याकरिता करावयाच्या उपाययोजनांबाबत त्यांनी विशेष सूचना दिल्या. तसेच जिल्हाधिकारी कार्यालयात येणाºया प्रत्येकाची थर्मल स्क्रीनिंग, नावनोंदणी करण्यात येऊ लागली आहे.जिल्ह्यात कोरोनाबाधितांची संख्या बावीसशेहून अधिक झाली आहे. मालेगावात कोरोना आटोक्यात येत असताना नाशिक शहरासह जिल्ह्याच्या इतर भागात कोरोनाचा संसर्ग वाढतो आहे; परंतु आता पुन्हा लॉकडाऊन होणार नाही, असे सांगत नागरिकांनी स्वयंशिस्त पाळा, असे आवाहन शासन, प्रशासनाकडून करण्यात येत आहे. कोरोनाच्या वाढत्या संसर्गामुळे सर्व यंत्रणा कोरोनाशी लढा देण्यासाठी विविध कामांत गुंतल्याने शासकीय कामकाज ठप्प झाले आहे. एकमेकांच्या संपर्कातून कोरोनाचा संसर्ग होण्याचा धोका असल्याने शासकीय कार्यालयांतील उपस्थितीबाबतही शासनाने निर्देश दिले आहेत. त्यामुळे कार्यालयात केवळ पंधरा टक्केच उपस्थिती ठेवण्यात आली आहे; परंतु आता हळूहळू शासकीय कार्यालयातील कामकाजही पूर्वपदावर येत आहे. कामकाज सुरू झाले असले तरी कोरोनाचा धोका मात्र टळलेला नाही. त्या पाशर््वभूमीवर जिल्हाधिकारी मांढरे यांनी जिल्हाधिकारी कार्यालय परिसराची पाहणी केली. यावेळी त्यांनी सर्व विभागांना भेटी देत संबंधित विभागप्रमुखांशी चर्चा करून स्वच्छता आणि कार्यालयात काम करताना कर्मचाऱ्यांमध्येही सामाजिक अंतर ठेवावे. प्रवेशासाठी एकच मार्ग असावा, कार्यालय परिसरात स्वच्छता असावी, कार्यालयाच्या प्रवेशद्वारावर सॅनिटायझर ठेवावे, तसेच येणाºया प्रत्येकाची थर्मल स्क्रीनिंग करण्यात यावी, अशा सूचनादेखील जिल्हाधिकाºयांनी केल्या.

 

टॅग्स :Nashikनाशिकcollectorजिल्हाधिकारी