पंचवटी : सोमवारी होणाऱ्या नाशिक पूर्व विधानसभा मतदारसंघात मतदानासाठी निवडणूक यंत्रणा सज्ज झाली असून, त्यासाठी रविवारी पंचवटीतील विभागीय क्रीडा संकुल येथे मतदान अधिकारी व कर्मचाऱ्यांना निवडणूक साहित्याचे वाटप करण्यात आले.भर पावसातही मोठ्या उत्साहाने निवडणूक कर्मचाºयांनी आपल्या पथक प्रमुखासह हजर राहून निवडणुकीसाठी लागणारे साहित्य काळजीपूर्वक ताब्यात घेतले. मतदान साहित्यानिशी अधिकारी, कर्मचारी दुपारनंतर मतदान केंद्रावर रवाना झाले असून, त्यानंतर मतदान कक्षाची सज्जता पूर्ण करण्यात आली आहे.मतदानासाठी प्रत्येक केंद्रावर पाच कर्मचाºयांची नेमणूक करण्यात आली असून, रविवारी सकाळी आठ वाजेपासून पंचवटीतील विभागीय क्रीडा संकुल येथे मतदान अधिकारी व कर्मचाºयांना साहित्याचे वाटप करण्यात आले. त्यासाठी हजारो कर्मचाºयांनी याठिकाणी हजेरी लावली. मतदान प्रक्रियेकरिता आवश्यक असलेले कंट्रोल युनिट, बॅलेट युनिट, शाई, व्हीव्हीपॅट, ईव्हीएम मशीन, मतदान कक्ष, पांढरी पावडर, टाचण्या, सुतळी, मेणबत्ती आदींसह अन्य निवडणूक साहित्याचे मतदान केंद्रनिहाय वाटप करण्यात आले. गेल्या दोन दिवसांपासून अवकाळी पावसाने हजेरी लावल्यामुळे मतदान साहित्य वाटपात अडथळा नको म्हणून क्रीडा संकुलात दोन ठिकाणी मंडप उभारणी करण्यात येऊन जमिनीवर चटई टाकण्यात आली होती. तर मुख्य संकुलाच्या आवारात निवडणूक साहित्य ताब्यात घेण्यासाठी आलेल्या कर्मचाºयांना बसण्यासाठी चटई तसेच खुर्च्यांची व्यवस्था केली होती. साहित्य घेण्यासाठी आलेल्या कर्मचाºयांसाठी पिण्याच्या पाण्याची व्यवस्थाही करण्यात आली होती. मतदान साहित्य वाटप करण्यात येणार असल्यामुळे सकाळपासून क्रीडा संकुलात पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला होता. मतदान साहित्य घेण्यासाठी शेकडोंच्या संख्येने कर्मचारी क्रीडा संकुलात रांगेने दुपारपर्यंत उभे होते.मतदान साहित्य व कर्मचाºयांना वाहून घेण्यासाठी एस.टी. बस व खासगी वाहनांची सोय करण्यात आली होती. दरम्यान मास्टर ट्रेनर उद्या सोमवारी पहाटेपासून पूर्ण पंचवटी विधानसभा मतदारसंघात फिरून मशीनमध्ये अडचण निर्माण झाली तर ती सोडवण्यासाठी मदत करणार आहे. या पथकात बारा कर्मचाºयांचा समावेश आहे.
पूर्व मतदारसंघात यंत्रणेची सज्जता
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 21, 2019 12:56 AM
सोमवारी होणाऱ्या नाशिक पूर्व विधानसभा मतदारसंघात मतदानासाठी निवडणूक यंत्रणा सज्ज झाली असून, त्यासाठी रविवारी पंचवटीतील विभागीय क्रीडा संकुल येथे मतदान अधिकारी व कर्मचाऱ्यांना निवडणूक साहित्याचे वाटप करण्यात आले.
ठळक मुद्देपावसात साहित्याचे वाटप : मतदान केंद्रे तयार