नाशिक : भारतीय जनता पक्षाच्या वतीने मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी काढलेल्या महाजनादेश यात्रेच्या स्वागताची तयारी पुर्ण झाली असून, सर्वत्र फलक, स्वागत कमानी, झेंडे बॅनर लावून शहरसज्ज झाले आहे. बुधवारीदुपारी तीन वाजता महाजनादेश यात्रेचे नााशकात आगमनहोणार असून, मुख्यमंत्र्यांसह राज्यातील अन्य मंत्रीही या यात्रेत सहभागी होणार असल्याने पोलीस महासंचालकांनी सुरक्षा व्यवस्थेचा आढावा घेवून पोलिस अधिकाऱ्यांना महत्वाच्या सुचना केल्या आहेत.महाजनादेश यात्रेचे मुंबई-आग्रा महामार्गावरील पाथर्डी फाटा येथे आगमन होईल यावेळी ढोल, ताशाव फटाक्याच्या आतषबाजीतयात्रेचे स्वागत केले जाणार आहे. पाथर्डी फाटा येथील शिव छत्रपतींच्या पुतळ्यास मुख्यमंत्री पुष्पहार अर्पण करतील वयात्रा सिडको मार्गे शहरातमार्गस्थ होणार आहे. तत्पुर्वीपाथर्डी फाटा येथून भाजपाचीबाईक रॅली काढण्यात येणारआहे.अशी निघणार बाइक रॅलीमहाजनादेश यात्रा पाथर्डी फाटा येथे दाखल झाल्यानंतर तिथून यात्रेच्या रथापुढे बाइक रॅली काढण्यात येणार आहे. या बाइक रॅलीत नाशिकमधील हजारो कार्यकर्ते सहभागी होणार आहेत. ही रॅली पाथर्डी फाटा येथून उत्तमनगररोड, पवननगर, सावतानगर, दिव्या अॅडलॅब चौक, त्रिमूर्ती चौक, सिटी सेंटर मॉल सिग्नल, संभाजी चौक, दक्षिणमुखी हनुमान मंदिरमार्गे मायको सर्कल, स्वातंत्र्यवीर सावरकर तरणतलाव, गोल्फ क्लब येथे येऊन रॅलीचा समारोप केला जाणार आहे.
महाजनादेश यात्रेची तयारी पूर्ण
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 18, 2019 1:17 AM
भारतीय जनता पक्षाच्या वतीने मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी काढलेल्या महाजनादेश यात्रेच्या स्वागताची तयारी पुर्ण झाली असून, सर्वत्र फलक, स्वागत कमानी, झेंडे बॅनर लावून शहर सज्ज झाले आहे.
ठळक मुद्देपोलिसांकडून मार्गाची पाहणी : सुरक्षिततेच्या कडक उपाययोजना