नाशिक : भारतीय संस्कृतीत सणांना अनन्यसाधारण महत्त्व असून, प्रत्येक सणामागे काही ना काही उद्देश आहे. मकरसंक्रांत हा तीळ आणि गुळाच्या स्नेहगुणांचा सण भारतीय परंपरेतील अनमोल ठेवा आहे. आपल्या स्नेहींना या दिवशी तिळगूळ देऊन तिळगूळ घ्या, गोडगोड बोला असे म्हणून एकमेकांशी प्रेमाचे संबंध कायम ठेवण्याचे आवाहन केले जाते. हा दिवस अवघ्या आठवडाभरावर येऊन ठेपला असताना शहरात तिळगूळ बनविण्याच्या प्रक्रियेला वेग आला आहे. जीवनातील कडवटपणा नष्ट करण्याच्या उद्देशाने एकमेकांना तिळगूळ दिले जातात. दिवाळी संपल्यानंतरचा व नवीन वर्षाच्या सुरुवातीलाच येणारा पहिला महत्त्वाचा सण म्हणजे मकरसंक्र ांती असून, हा सण हिवाळ्यात येत असल्याने आरोग्याच्या दृष्टीनेही या सणाला खूप महत्त्व प्राप्त झाले आहे. थंडीमुळे त्वचेमधील स्निग्धता कमी होऊन त्वचा कोरडी होते. तसेच शरीरातील उष्णताही कमी होत असते. तीळ ही स्निग्धता कायम ठेवण्याचे तर गूळ हा उष्ण असल्याने शरीरात उष्णता निर्माण करण्याचे काम करत असतो. तसेच या दिवसापासून दिवस हा तिळातिळाने मोठा होत जातो, अशी आख्यायिका आहे. अशा तिळापासून बनलेल्या पदार्थाना मकरसंक्रांती सणाच्या पाश्र्वभूमीवर मोठी मागणी असते. त्यामुळे तिळगूळ तयार करण्याच्या प्रक्रियेला वेग आला आहे. या साणासाठी गावरान तिळांना अधिक मागणी असल्याने त्यापासून लाडू, साखर व गुळाच्या वडी, रेवडी, तिळाचे पापड आदि पदार्थ तयार करण्यात येत असून, हे पदार्थ वजनानुसार 10 रुपयांपासून ते 100रुपयांर्पयतच्या वेगवेगळ्या पाकिटांमध्ये उपलब्ध आहेत. दरम्यान, अनेक कुटुंबांमध्ये सुटे तीळ खरेदी करून तीळ व गुळाचे पदार्थ तयार करण्याची प्रथा आहे. त्यामुळे सुटय़ा तिळांना होणारी मागणी लक्षात घेऊन आठवडे बाजारातील विक्रेते असे तीळ विक्रीसाठी ठेवत असतात. ज्या विक्रेत्यांनी तिळाची खरेदी करून ठेवली आहे, त्यांनी तिळांना बुरशी अथवा किटकांचा प्रादुर्भाव होऊ नये यासाठी गोदावरीच्या घाटावर तिळांचे वाळवण घातले आहे.
नाशकात तिळगुळ बनविण्याच्या प्रक्रियेला वेग, गोड स्नेहगुणांच्या मकर संक्रांतीची तयारी सुरू
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 08, 2018 2:08 PM
मकरसंक्रांत हा तीळ आणि गुळाच्या स्नेहगुणांचा सण भारतीय परंपरेतील अनमोल ठेवा आहे. आपल्या स्नेहींना या दिवशी तिळगूळ देऊन तिळगूळ घ्या, गोडगोड बोला असे म्हणून एकमेकांशी प्रेमाचे संबंध कायम ठेवण्याचे आवाहन केले जाते. हा दिवस अवघ्या आठवडाभरावर येऊन ठेपला असताना शहरात तिळगूळ बनविण्याच्या प्रक्रियेला वेग आला आहे.
ठळक मुद्देमकरसंक्रांतीसाठी तीळगुळ बनविण्याच्या प्रक्रीयेला वेगशहर परिसरातील वातावरणात सणाचा गोडव्याची चाहूलतीळगुळांचे लाडू, रेवडी तयार करण्यात व्यवसायिक व्यस्त