त्र्यंबकेश्वर : सिंहस्थ कुंभमेळा उंबरठ्यावर येऊन ठेपला आहे. येत्या पावसाळ्यात सिंहस्थ पर्वकालास (१५ जुलै) प्रारंभ होईल व लगेच आॅगस्टमध्ये शाही पर्व आहे. या पार्श्वभूमीवर त्र्यंबक व त्र्यंबकबाहेर सुरू असलेली सर्व कामे यंत्रणा पूर्ण करण्यासाठी युद्ध पातळीवर कार्य करीत आहेत. त्यातच निवृत्तीनाथ यात्रेच्या सज्जतेची पालिकेची जोरदारपणे तयारी सुरू झाली आहे. या पार्श्वभूमीवर प्रशासनाची बैठक बोलविण्यात आली असल्याचे मुख्याधिकाऱ्यांनी सांगितले. सिंहस्थाची तयारी येथील साधू आखाड्यापासून ते शासकीय यंत्रणेपर्यंत जोरदाररीत्या सुरू आहे. प्रत्येक आठवड्याला कामे करणाऱ्या यंत्रणेच्या अधिकाऱ्यांच्या बैठका घेऊन आढावा घेण्यात येत आहे. काही अतिक्रमणे उठविली आहेत, तर काही अतिक्रमणांना सध्या तरी जीवदान मिळाले असल्याचे दिसते. तथापि निवृत्तीनाथ यात्रा झाल्यावर अतिक्रमणे काढण्यास सुरुवात करणार असल्याचे सूत्रांनी सांगितले. सर्व खड्डे बुजवून रस्ते पूर्ववत करावेत जेणेकरून निवृत्तीनाथ यात्रा सुरळीत होईल. यावेळी दुकानदारांना कडक नियमांचे पालन करावे लागणार आहे. उद्याच्या यात्रा बैठकीत होण्याची शक्यता आहे. यासर्व तयारीला नगराध्यक्ष अलका शिरसाट, मुख्याधिकारी एन. एम. नागरे सर्व नगरसेवक कामाला लागले आहे. (वार्ताहर)
त्र्यंबकेश्वर येथे निवृत्तीनाथ यात्रेची तयारी पूर्ण
By admin | Published: January 07, 2015 1:24 AM