नाशिक : पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्यासह शिवसेनेचे प्रमुख पदाधिकारी रविवारी नाशकात येत असून, त्यांच्या उपस्थितीत विधान परिषदेच्या नाशिक स्थानिक स्वराज्य संस्था मतदारसंघाच्या निवडणुकीची व्यूहरचना ठरण्याबरोबरच आगामी लोकसभा निवडणुकीच्या रणनीतीसाठी उत्तर महाराष्टÑातील प्रमुख पदाधिकाºयांच्या बैठकीचे आयोजन करण्यात आले आहे. नाशिक स्थानिक स्वराज्य संस्था मतदारसंघाच्या निवडणुकीसाठी नरेंद्र दराडे यांना शिवसेनेने उमेदवारी देऊन पक्षांतर्गत निर्माण झालेली नाराजी दूर करण्याचे सर्वतोपरी प्रयत्न केले असले तरी, सहाणे यांची पक्षाने केलेली हकालपट्टी व स्थानिक पातळीवर पक्षांतर्गत खांदेपालटामुळे व्यक्त होणारी खदखद अद्यापही शमलेली नाही. आठवडाभरापूर्वी नाशिकमध्ये उत्तर महाराष्टÑाचे संपर्क प्रमुख खासदार संजय राऊत यांनी भेट घेऊन पदाधिकारी, लोकप्रतिनिधी व नगरसेवकांच्या बोलविलेल्या बैठकीकडे बहुतांशी पदाधिकारी, नगरसेवकांनी पाठ फिरविल्याची बाब त्याचेच द्योतक असल्याचे सांगितले जात आहे. या बैठकीसाठी नगरसेवकांना बोलविलेच नसल्याची सारवासारव नंतर करण्यात आली असली तरी, या बैठकीला मिळालेला अल्प प्रतिसाद पाहूनच खुद्द पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांना सर्व पदाधिकारी, लोकप्रतिनिधींना ‘मातोश्री’वर पाचारण करावे लागले, हेदेखील नाकारून चालणार नाही. या सर्व पार्श्वभूमीवर स्थानिक स्वराज्य संस्था मतदारसंघाच्या निवडणुकीसाठी नरेंद्र दराडे यांना फारसे अनुकूल वातावरण दिसत नसल्याची भावना पक्ष कार्यकर्ते व्यक्त करू लागले आहेत. या सर्व बाबींचा विचार करून उद्धव ठाकरे, खासदार संजय राऊत, भाऊ चौधरी हे रविवारी नाशकात येत असून, दिवसभर वेगवेगळ्या पातळीवर पक्षाच्या पदाधिकाºयांच्या बैठकांचे आयोजन करण्यात आले आहे. सकाळी १० वाजता उत्तर महाराष्टÑातील लोकप्रतिनिधी व प्रमुख पदाधिकाºयांची बैठक जिल्हानिहाय घेण्यात येणार आहे त्यानंतर साडेबारा वाजता जिल्ह्णातील सर्व नगरसेवकांची बैठक होईल व त्यानंतर दुपारी तीन वाजता सर्व जिल्हाप्रमुख, उपजिल्हा प्रमुख, तालुका प्रमुख व महिला आघाडीची बैठक घेण्यात येणार आहे. या बैठकीत विधान परिषदेतील दगाफटका टाळण्यासाठी पदाधिकाºयांना जबाबदारीचे वाटप करण्यात येणार असून, त्यानंतर लोकसभा निवडणुकीच्या तयारीचा आढावा घेण्यात येणार आहे. या बैठकीतच बहुधा लोकसभेसाठी संभाव्य उमेदवाराच्या नावाची चचापणी केली जाण्याची शक्यता नाकारता येत नाही. याशिवाय नरेंद्र दराडे यांच्या प्रचाराला प्रतिसाद न देणाºयांचा समाचार घेतला जाण्याचीही शक्यता सूत्रांनी व्यक्त केली आहे.
उद्धव ठाकरेंच्या उपस्थितीत व्यूहरचना निवडणूक तयारी : उत्तर महाराष्टÑाच्या पदाधिकाऱ्यांची बैठक
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 06, 2018 12:42 AM
नाशिक : पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्यासह पदाधिकारी रविवारी नाशकात येत असून, त्यांच्या उपस्थितीत विधान परिषदेच्या निवडणुकीची व्यूहरचना ठरण्याबरोबरच आगामी लोकसभा निवडणुकीच्या रणनीतीसाठी उत्तर महाराष्टÑातील प्रमुख पदाधिकाºयांच्या बैठकीचे आयोजन करण्यात आले आहे.
ठळक मुद्देपक्षांतर्गत निर्माण झालेली नाराजी दूर करण्याचे सर्वतोपरी प्रयत्ननगरसेवकांनी पाठ फिरविल्याची बाब त्याचेच द्योतक