एकलहरे : तीनही वीज कंपन्यातून सेवानिवृत्त झालेल्या कर्मचाऱ्यांना मिळत असलेल्या नाममात्र पेंशनमध्ये केंद्र शासनाने वाढ करावी यासाठी गेल्या पाच वर्षांपासून आंदोलने करुन, निवेदने देऊनदेखील केंद्र शासन दखल घेत नसल्याच्या निषेधार्थ येत्या ७ मार्चला जेलभरो आंदोलन करण्याचा निर्णय सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांच्या मेळाव्यात घेण्यात आला.मेळाव्याच्या अध्यक्षस्थानी वर्कर्स फेडरेशनचे ज्येष्ठ नेते व्ही. डी. धनवटे होते. प्रमुख पाहुणे म्हणून पेन्शनर फेडरेशनचे संस्थापक राजू देसले, जिल्हा कार्याध्यक्ष सुभाष काकड, अरुण म्हस्के, नामदेव बोराडे, प्रकाश नाईक, चेतन पणेर, पंडितराव पगार आदी उपस्थित होते. या मेळाव्यात सर्वानुमते ठराव मंजूर करण्यात आले.यावेळी अध्यक्ष व्ही.डी. धनवटे यांनी सांगितले की, वीज मंडळात कामावर असताना जो लढाऊ बाणा होता त़ोच सेवानिवृत्तीनंतरही कायम ठेवा व आंदोलनाच्या माध्यमातून सरकारला पेन्शनबाबत निर्णय घेण्यास भाग पाडा. त्यासाठी जेलभरो आंदोलनात मोठ्या संख्येने सामील होण्याचे आवाहन करण्यात आले. एन. एम. लासूरकर यांनी प्रास्ताविक, एस. आर. खतीब यांनी सूत्रसंचालन, तर पंडितराव कुमावत यांनी आभार मानले.सरकारने स्वीकारली शिफारसपीएस ९५ पेन्शनचा अभ्यास करणाºया कोशियारी समितीने शिफारस केलेल्या रकमेप्रमाने किमान तीन हजार पेन्शन व त्यावर महागाई भत्ता देण्यात यावा ही शिफारस सरकारने स्वीकारली, तर नऊ हजारांपर्यंत पेंशन मिळू शकेल़ सरकारने वाढीव पेन्शन तातडीने सुरू करावी, या मागणीसाठी नाशिक जिल्ह्यातील सर्व पेंशनधारक ७ मार्च रोजी जेलभरो आंदोलन करतील. या आंदोलनात सेवानिवृत्त वीज कर्मचारी मोठ्या प्रमाणात सहभाग नोंदवतील.
सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांचा ‘जेलभरो’ आंदोलनाची तयारी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 27, 2019 12:27 AM