शहरं
Join us  
Trending Stories
1
माझ्या वडिलांचा फोटो लावणं सोडा, हिंमत असेल तर...; उद्धव ठाकरेंचा पुन्हा घणाघात
2
नागपूरमध्ये प्रियंका गांधींचा रोड शो; भाजप कार्यकर्त्यांनी दाखवले कमळ, परिसरात प्रचंड तणाव
3
विदर्भात ५४ टक्के जागांवर कुणबी, मराठा उमेदवार; भाजपानं काँग्रेसची केली कोंडी
4
प्रियंका गांधींचे पंतप्रधान मोदींना खुले आव्हान; म्हणाल्या, “एकदा जाहीर करून दाखवा की...”
5
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : उद्धव ठाकरे यांच्यासोबत पुन्हा जाणार का?; एकनाथ शिंदेंनी एका वाक्यात सांगितलं
6
सुपर-डुबर HOT!! भारतीय क्रिकेटपटूच्या बहिणीचा बोल्डनेस, घायाळ करणारा लूक Viral (Photos)
7
माहिमच्या सर्व समाजासह मला मुस्लिमांचाही पाठिंबा; महेश सावंतांना विजयाचा विश्वास 
8
दुगलाईच्या जंगलात पोलिस आणि नक्षलवाद्यांमध्ये चकमक, एक जवान जखमी
9
'मी मुख्यमंत्रीपदाच्या शर्यतीत नाही, पण...', सीएम एकनाथ शिंदेंचं मोठं वक्तव्य
10
पाकिस्तानी लष्कराच्या चेक पोस्टवर दहशतवादी हल्ला, सात सुरक्षा जवान शहीद; १८ जखमी
11
“माझा नाद करायचा नाही, जोरात पाडायचे, संपूर्ण महाराष्ट्रात संदेश गेला पाहिजे”: शरद पवार
12
सतत निष्ठा बदलणारा हा व्यक्ती...; अजित पवारांनी अमोल कोल्हेंचा इतिहासच काढला
13
PM मोदींचे आव्हान राहुल गांधींनी स्वीकारले; बाळासाहेब ठाकरेंबाबत बोलले, पोस्ट करत म्हणाले...
14
हृदयद्रावक! साता जन्माची साथ अवघ्या ७ महिन्यांत सुटली; आक्रित घडलं अन् सारचं संपलं
15
Pushpa 2 Trailer: "पुष्पा नाम नही ब्रँड है", अल्लू अर्जुनचा रुद्रावतार आणि धमाकेदार ॲक्शन, 'पुष्पा २'चा ट्रेलर प्रदर्शित
16
"ऑस्ट्रेलियातच थांबा, तुमची गरज लागू शकते"; दोन IPL स्टार्स ना BCCIचा महत्त्वाचा निरोप
17
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : प्रतिभा पवारांना बारामतीमधील टेक्सटाईल पार्कमध्ये अडवले; राजकीय चर्चांना उधाण
18
“भाजपा राजवटीत फक्त उद्योगपतीच सेफ, काँग्रेसने सर्व राज्यांचा विकास केला”: प्रियंका गांधी
19
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : "मी शरद पवारांना सोडलं नाही, सगळ्या आमदारांना..." अजित पवारांचं बारामतीत मोठं विधान
20
'सत्य बाहेर येत आहे...', PM नरेंद्र मोदींनी केले 'द साबरमती रिपोर्ट' चित्रपटाचे कौतुक

विश्वशांती अहिंसा संमेलनाची तयारी अंतिम टप्प्यात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 19, 2018 1:37 AM

प्रसिद्ध जैन तीर्थक्षेत्र मांगीतुंगी येथील ऋषभदेवपूरम येथे येत्या २२ आॅक्टोबरपासून देशाचे राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांच्या उपस्थितीत प्रारंभ होणाºया विश्वशांती अहिंसा संमेलनाची प्रशासनातर्फे जोरदार तयारी सुरू असून, भव्य सभामंडपाचे काम अंतिम टप्प्यात आले आहे.

ठळक मुद्देभव्य सभामंडप : सहा सेक्टरमध्ये आसनव्यवस्था

सटाणा : प्रसिद्ध जैन तीर्थक्षेत्र मांगीतुंगी येथील ऋषभदेवपूरम येथे येत्या २२ आॅक्टोबरपासून देशाचे राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांच्या उपस्थितीत प्रारंभ होणाºया विश्वशांती अहिंसा संमेलनाची प्रशासनातर्फे जोरदार तयारी सुरू असून, भव्य सभामंडपाचे काम अंतिम टप्प्यात आले आहे.दि. २२ ते २४ आॅक्टोबर या कालावधीत तीन दिवसांचे विश्वशांती अहिंसा संमेलन आयोजित करण्यात आले आहे. या संमेलनासाठी दहा हजार भाविकांसाठी भव्य सभामंडप उभारण्याचे काम सुरू आहे. २३० बाय २६० चौरसफुटाचा पेंडॉल उभारण्यात आला आहे. संमेलन स्थळाला भरत चक्र वर्ती उद्यान असे नाव देण्यात आले आहे. या उद्यानातील पेंडॉल मध्ये ५२ बाय २० चौरस फुटाचे व्यासपीठ तयार करण्यात आले आहे. व्यासपीठासमोरील जागेत भाविकांसाठी सहा सेक्टर तयार करून आसनव्यवस्था करण्यात आली आहे. सुरक्षेच्या दृष्टीने हा संपूर्ण पेंडॉल अग्नी व पाणीरोधक तयार करण्यात आला आहे. या कार्यक्र मासाठी विशेष पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला आहे. येत्या २२ आॅक्टोबरला देशाचे राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांच्या हस्ते संमेलनाचे उद्घाटन करण्यात येणार आहे. त्यांच्या सोबत अनेक व्हीआयपी कार्यक्र मासाठी हजेरी लावणार आहेत. यामुळे हेलिकॉप्टर उतरविण्यासाठी बारा एकर जागेवर पाच हेलिपॅड तयार करण्यात आले आहेत. मुख्यमंत्री, राज्यपाल यांच्यासोबत डझनभर मंत्री उपस्थित राहण्याची शक्यता असल्यामुळे हेलिपॅडसाठी अतिरिक्त पर्यायी जागा उपलब्ध करण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. या संमेलनासाठी पंचवीस हजार भाविक उपस्थित राहण्याची शक्यता आहे.

टॅग्स :Religious programmeधार्मिक कार्यक्रमJain Tirthkshetraजैन तीर्थक्षेत्र