इमारत पाडल्यानंतर नियोजित मार्ग भोंगळे रस्त्याला संलग्न होऊन पुढे सरळ समता मार्गाने ढवळे बिल्डींगपर्यंत नेल्यास शहरास बाजारपेठेसाठी नवीन जागा मिळणार असल्याने कोंडलेल्या बाजारपेठेचा विस्तार होणे अपेक्षित आहे. तसेच शहरातील रहदारीची कोंडी काही प्रमाणात कमी होणार असल्याने नागरिक प्रशासनाच्या पुढच्या पावलाच्या प्रतीक्षेत आहे. इमारत पाडल्यानंतर प्रशासनाने पुढचे काम त्वरित हाती घ्यावे अशी अपेक्षा नागरिक व्यक्त करीत आहेत. सबवेच्या कामात अगोदर आराखडा चुकल्याचा मुद्दा पुढे आणला गेला. त्यानंतर आता संलग्नतेच्या प्रश्नावरून वातावरण ढवळून निघाले आहे. ह्यविकास हवा. मात्र सोयीचाह्ण अशी विकासमार्गाची धारणा असल्याने एकूणच जे रेल्वे फाटकाचे झाले तसे सबवेच्या बाबतीत घडायला नको याबाबतीत पालिकेच्या मुख्याधिकाऱ्यांवर मोठी जबाबदारी येऊन ठेपली आहे.नगरपरिषदेच्या कोर्टात चेंडूआमदार सुहास कांदे यांच्या निवासस्थानी दोन महिने आधी झालेल्या बैठकीनंतर मुख्याधिकाऱ्यांनी कार्यवाही बाबतीत जाहीर केलेल्या भूमिकेला अनुसरून कृती केली नसल्याचा आक्षेप घेण्यात येत होता. आता न्यायालयाने कार्यवाही करण्याची मुभा पालिकेला दिल्याने पालिकेच्या कोर्टात आलेला चेंडू कसा टोलवायचा हे सर्वस्वी मुख्याधिकाऱ्यांवर विसंबून राहणार आहे.सबवेचे काम पूर्ण केल्याचा दावा रेल्वे प्रशासनाने न्यायालयात लिखित स्वरुपात केल्यामुळे पुढील कार्यवाहीची जबाबदारी आपोआपच पालिका प्रशासनावर येऊन पडली आहे. छोट्या छोट्या व्यावसायिकांच्या पुनर्वसनाचा मुद्दाही त्यामुळे ऐरणीवर आला आहे.
मटण मार्केटची इमारत पाडण्याची तयारी सुरू
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 02, 2021 8:43 PM
नांदगाव : गेले चार महिने नगरपरिषद व मटण मार्केटची इमारत या वादात अडकलेला रस्ता मोकळा होण्याची चिन्हे दिसून येत असली तरी नगर परिषदेच्या हद्दीतून जाणारा रस्ता आगामी काळात कशी वळणे घेणार याची प्रचंड उत्सुकता नागरिकांच्या मनात निर्माण झाली आहे. दरम्यान, उच्च न्यायालयाने दिलेल्या निर्देशानुसार मटण मार्केटची इमारत पाडण्याची तयारी प्रशासनाने सुरू केली असून गाळा धारकांना जागा खाली करण्याचे आदेश देण्यात आले आहेत. त्यासाठी पोलीस बंदोबस्ताची मागणी करण्यात आली आहे.
ठळक मुद्दे नांदगाव : नगरपरिषदेच्या नियोजनाकडे लक्ष, पोलीस बंदोबस्त मागविला