श्रीश्री रविशंकर यांच्या उपस्थितीत होणाऱ्या ‘भाऊबीज दीपावली मीलन’ कार्यक्रमासाठी तपोवन येथील जागेवर भूमिपूजन कार्यक्रमप्रसंगी समन्वयक विजय हाके, स्वामी वैशंपायन, स्वामी प्रणवानंदजी, विश्वास अक्कलकाजी, शेखर मुंदडा, प्रशांत कुलकर्णी, नीलिमा वंजारी आदी.नाशिक : दि आर्ट आॅफ लिव्हिंगच्या वतीने दिवाळीच्या मुहूर्तावर शहरात श्रीश्री रविशंकर यांच्या उपस्थितीत ‘भाऊबीज, दीपावली मीलन’ या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. कार्यक्रमासाठी तपोवन येथील २० एकर जागेत या कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले असून, यावेळी २० हजार बहिणी भाऊबीजनिमित्त आपल्या भावांचे औक्षण करणार असल्याची माहिती आयोजकांमार्फत देण्यात आली आहे.भाऊबीजचे औचित्य साधत दि आर्ट आॅफ लिव्हिंगच्या वतीने मंगळवारी (दि.२९) तपोवन येथे ‘भाऊबीज, दीपावली मीलन’ या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. श्रीश्री रविशंकरजी यांच्या उपस्थितीत हा कार्यक्रम संपन्न होणार आहे. नुकतेच प्रस्तापित जागेवर आयोजकांच्या वतीने भूमिपूजन करण्यात आले. भाऊबीजच्या दिवशी दुपारी रविशंकरजी नाशिकमध्ये दाखल होणार असून, सायंकाळी ६ वाजता त्यांच्या उपस्थितीत गणपती होम व अष्टलक्ष्मी होमहवन करण्यात येणार आहे. तसेच यानंतर कार्यक्रमात ‘महासत्संग’चे आयोजन करण्यात आले आहे. यात देवतापूजन, संगतीकरण, दाद पूजनाचा कार्यक्रम होणार आहे. कार्यक्रम सर्वांसाठी मोफत असून, दीड ते दोन लाख भाविकांना बसण्याची व्यवस्था करण्यात येणार आहे. तसेच दुसºया दिवशीही रविशंकरजी यांच्या उपस्थितीत याच ठिकाणी ‘अमृतवर्षा’ या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे.२० वर्षांत चौथ्यांदा रविशंकरजी नाशकातमागील २० वर्षांत श्री श्री रविशंकरजी हे चौथ्यांदा नाशिकमध्ये येत असून, प्रत्येक वेळी भाविकांचा मिळणारा अभूतपूर्ण प्रतिसादामुळे प्रथमच शहरात ‘भाऊबीज दीपावली मीलन’ हा कार्यक्रम संपन्न होणार आहे. याआधी ते २०१५ साली शहरात सत्संगासाठी आले होते. त्यावेळी एकाच वेळेस ५ हजार बासरी वादकांनी एकाचवेळी बासरीवादन केले होते. तेव्हाही तपोवन येथेच झालेल्या या कार्यक्रमाला भाविकांचा मोठा प्रतिसाद मिळाला होता. मात्र यावेळी रविशंकरजी यांच्या उपस्थित प्रथमच हा कार्यक्रम होणार आहे.
तपोवनात दीपावली मीलनाची तयारी सुरू
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 20, 2019 1:44 AM
दि आर्ट आॅफ लिव्हिंगच्या वतीने दिवाळीच्या मुहूर्तावर शहरात श्रीश्री रविशंकर यांच्या उपस्थितीत ‘भाऊबीज, दीपावली मीलन’ या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. कार्यक्रमासाठी तपोवन येथील २० एकर जागेत या कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले असून, यावेळी २० हजार बहिणी भाऊबीजनिमित्त आपल्या भावांचे औक्षण करणार असल्याची माहिती आयोजकांमार्फत देण्यात आली आहे.
ठळक मुद्देश्रीश्री रविशंकर यांची उपस्थिती , २० हजार भगिनी करणार औक्षण