नाशिक : कोरोनाच्या तिस-या टप्प्याचा सामना करताना शासन-प्रशासन, जिल्ह्यातील सर्वच नागरिक अत्यंत प्रतिकूल स्थितीतून जात असल्याने वेळीच प्रतिबंधात्मक उपाययोजना करण्यासाठी प्रशासनाकडून आपत्कालीन कृती आराखडा तयार करण्याबाबत जिल्ह्यातील सर्व वरिष्ठ अधिकाऱ्यांची बैठक झाली.त्याचबरोबर स्वयंस्फूर्तीने कोरोनाच्या प्रतिबंधासाठी जनसहभाग कसा वाढेल, यावर प्रशासकीय पातळींवर प्रयत्न करायला हवेत. कोरोनाचा लढा अधिक परिणामकारक करण्यासाठी जिल्ह्यातील सर्व आपत्कालीन यंत्रणा सज्ज आहेत. परंतु येत्या काळात अधिक सचोटीने काम करण्यासाठी कृती आराखडा तयार करण्याबाबत जिल्ह्यातील प्रमुख अधिकाºयांनी जिल्हाधिकारी कार्यालयात चर्चा केली.कोरोनाच्या पार्श्वभूमीवर जिल्ह्यातील प्रमुख यंत्रणांच्या अधिका-यांनी आज सकाळी एक अॅक्शन प्लान तयार करण्यासाठी जिल्हाधिकारी कार्यालयात चर्चा केली. त्यात भविष्यात करावयाच्या उपाययोजना व त्यांची परिणामकारकता यावर समन्वयाने चर्चा केली. त्यात प्रामुख्याने पुढील मोहिमांवर भर देण्याचे निश्चित करण्यात आले. जिल्ह्यात १४४ कलम लागू करण्यात आलेले आहे. अत्यावश्यक सेवा वगळता कुठल्याही सेवा सद्यस्थितीत चालू ठेवता येणार नाहीत.सर्व यंत्रणांचे योगदान महत्त्वाचे : सूरज मांढरेजिल्ह्यातील कोरोना साथरोगाच्या आपत्तीशी सामना करताना जिल्ह्यातील सर्व प्रमुख यंत्रणांचा समन्वय व भूमिका अत्यंत सकारात्मक आहे. आजपर्यंत जिल्ह्यात एकही कोरोनाबाधित रु ग्ण सापडला नसून त्यात जिल्ह्यातील सर्व आपत्कालीन यंत्रणांनी वेळोवेळी दाखविलेल्या सतर्कतेमुळे ते शक्य झाले आहे. लोकांनी कुठल्याही प्रकारे गर्दी न करता, घाबरून न जाता प्रशासनास सहकार्य कायम ठेवावे, असे आवाहन यानिमित्ताने जिल्हाधिकारी सूरज मांढरे यांनी केले आहे.
तिसऱ्या टप्प्यासाठी कृती आराखडा तयार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 24, 2020 10:58 PM