शहरं
Join us  
Trending Stories
1
‘धर्मयुद्ध’, ‘व्होट जिहाद’वर स्वामी गोविंददेव गिरी स्पष्टच बोलले; म्हणाले, “हिंदू समाजाने...”
2
राज ठाकरेंशी चांगले संबंध होते, अचानक मिठाचा खडा पडून काय बिनसले? CM शिंदेंनी सगळेच सांगितले
3
“महाराष्ट्रद्रोही जिंकणार की महाराष्ट्रप्रेमी जनता हे ठरवणारी निवडणूक आहे”: उद्धव ठाकरे
4
मणिपूरमध्ये सत्ताधारी भाजपला धक्का; NPP ने पाठिंबा काढून घेतला, सरकार कोसळणार?
5
प्रियंका गांधींचे पंतप्रधान मोदींना खुले आव्हान; म्हणाल्या, “एकदा जाहीर करून दाखवा की...”
6
रेवंथ रेड्डींचे अजब आवाहन; म्हणाले, “त्यांच्याकडून भरपूर पैसे घ्या, पण मत काँग्रेसला द्या”
7
माझ्या वडिलांचा फोटो लावणं सोडा, हिंमत असेल तर...; उद्धव ठाकरेंचा पुन्हा घणाघात
8
ठाकरे सेनेच्या मुस्लिम उमेदवाराची मंदिरात पूजा, शिवलिंगाचा अभिषेक अन् आरती केली...
9
नागपूरमध्ये प्रियंका गांधींचा रोड शो; भाजप कार्यकर्त्यांनी दाखवले कमळ, परिसरात प्रचंड तणाव
10
विदर्भात ५४ टक्के जागांवर कुणबी, मराठा उमेदवार; भाजपानं काँग्रेसची केली कोंडी
11
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : उद्धव ठाकरे यांच्यासोबत पुन्हा जाणार का?; एकनाथ शिंदेंनी एका वाक्यात सांगितलं
12
सुपर-डुबर HOT!! भारतीय क्रिकेटपटूच्या बहिणीचा बोल्डनेस, घायाळ करणारा लूक Viral (Photos)
13
माहिमच्या सर्व समाजासह मला मुस्लिमांचाही पाठिंबा; महेश सावंतांना विजयाचा विश्वास 
14
दुगलाईच्या जंगलात पोलिस आणि नक्षलवाद्यांमध्ये चकमक, एक जवान जखमी
15
'मी मुख्यमंत्रीपदाच्या शर्यतीत नाही, पण...', सीएम एकनाथ शिंदेंचं मोठं वक्तव्य
16
पाकिस्तानी लष्कराच्या चेक पोस्टवर दहशतवादी हल्ला, सात सुरक्षा जवान शहीद; १८ जखमी
17
“माझा नाद करायचा नाही, जोरात पाडायचे, संपूर्ण महाराष्ट्रात संदेश गेला पाहिजे”: शरद पवार
18
सतत निष्ठा बदलणारा हा व्यक्ती...; अजित पवारांनी अमोल कोल्हेंचा इतिहासच काढला
19
PM मोदींचे आव्हान राहुल गांधींनी स्वीकारले; बाळासाहेब ठाकरेंबाबत बोलले, पोस्ट करत म्हणाले...
20
हृदयद्रावक! साता जन्माची साथ अवघ्या ७ महिन्यांत सुटली; आक्रित घडलं अन् सारचं संपलं

गावगुंडांची ब्ल्यू प्रिंट तयार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 11, 2020 12:09 AM

महिला सुरक्षा, शेतकरी सुरक्षा याकडे विशेष लक्ष दिले जात आहे. तालुका पातळीवर गावगुंडगिरी फोडून काढण्यासाठी समाजकंटकांची ब्ल्यु प्रिंट तयार ...

ठळक मुद्देकायदा हातात घेणाऱ्यांची गय नाही : सचिन पाटील

महिला सुरक्षा, शेतकरी सुरक्षा याकडे विशेष लक्ष दिले जात आहे. तालुका पातळीवर गावगुंडगिरी फोडून काढण्यासाठी समाजकंटकांची ब्ल्यु प्रिंट तयार करण्यात येत आहे. अवैधरित्या गुटख्याची तस्करी, शस्त्र तस्करी रोखण्यासाठी सीमावर्ती नाके अधिक सक्षम करत आहोत.- जिल्हा पोलीस अधीक्षक, नाशिकअझहर शेखप्रश्न : जिल्ह्यातील ग्रामीण भागातील गुन्हेगारीबाबत नेमकी भूमिका काय असणार?- भूमिका स्पष्ट आहे, सद्रक्षणाय खलनिग्रहनाय ..! कायद्याची अंमलबजावणी प्रभावीपणे करत गुन्हेगारीचा बिमोड करायचा हाच प्रथम प्रयत्न राहणार आहे. कायदा हातात घेणाऱ्यांची कुठलीही गय केली जाणार नाही, अशावेळी व्यक्ती कोण आहे ते बघितले जाणार नाही तर केवळ कायद्याच्या प्रभावी अंमलबजावणीकडे लक्ष दिले जाईल. जिल्ह्याच्या सर्वच पोलीस ठाणेप्रमुखांची बैठक घेत याबाबत स्पष्टपणे त्यांनाही आदेश दिले आहेत. कुठल्याही प्रकारचे कोणाचेही गैरकृत्य, अवैध धंदे खपवून घेतले जाणार नाही.प्रश्न : जिल्हा पोलीस दलाला कोरोनापासून सुरक्षित ठेवण्यासाठी कसे प्रयत्न करणार?- ग्रामीण पोलीस दलाने अद्याप आपले ७ योद्धे गमावले आहेत. कोरोनाच्या काळात पोलीस दलाची ही मोठी हानी आहे. यामुळे येथून पुढे अशी दुर्घटना घडू नये, यासाठी पोलीस अधीक्षक कार्यालय प्रशासन खबरदारी म्हणून सर्व उपाययोजना करत आहे. सर्व कर्मचारी-अधिकारी यांना मास्क, सॅनिटायझरचा पुरवठा नियमितपणे वेळोवेळी करण्यावर भर दिला जात आहे. कर्मचाºयांना कर्तव्य बजावताना शक्यतो सुरक्षित अंतर राखण्याचा प्रयत्न करण्याच्या सूचना दिल्या आहेत. आॅक्सिजनची गरज भासणाºया बाधित पोलिसांसाठी आडगाव येथे किमान १५० खाटांचे ग्रामीण पोलीस कोविड केअर सेंटर सुरु करण्याच्या हालचाली गतिमान करण्यात आल्या आहेत. ग्रामिण पोलीस कर्मचारी-अधिकारी हे माझे कुटुंब असून त्यांची सुरक्षा ही माझी जबाबदारी आहे आणि ती पार पाडण्यासाठी मी निश्चितच कटिबद्ध आहे.प्रश्न जिल्ह्यात नव्याने कोणत्या संकल्पना राबविण्याचा मानस आहे?- नाशिक जिल्ह्यातील ग्रामीण भागातील बहुतांश तालुक्यात गड, किल्ले, धरणे, प्रसिध्द तीर्थक्षेत्र, अभयारण्य आहेत. यामुळे जिल्ह्यात नेहमीच पर्यटकांचा राबता असतो. गिरिभ्रमण, धरण पर्यटन, निसर्ग पर्यटन, धार्मिक पर्यटन अधिकाधिक सुरक्षित व्हावे, यासाठी टुरिस्ट पोलिसिंग ही संकल्पना लवकरच येत्या नवीन वर्षांत अंमलात आणली जाईल. तसेच जिल्ह्यातील दामिनी पथक अधिक सक्षम करत महिलांवरील अत्याचार रोखण्याचा प्रयत्न असेल.शेतकरी, सुशिक्षित बेरोजगार यांची आर्थिक फसवणूक सहन केली जाणार नाही. परराज्यातील लबाड व्यापाºयांवर कारवाईसाठी विशेष तपास पथके तयार करण्यात आली आहेत. नाशिक जिल्ह्याचे भौगोलिक क्षेत्र हे मोठे असले तरी तालुका पातळीवरील सर्वच पोलिस ठाण्यांना सतर्कतेच्या सूचना देत गुन्हेगारी प्रवृत्ती ठेचून काढण्याचे आदेश दिले आहेत. नागरिकांनी सभोवताली घडणाºया गुन्हेगारी घटनांची निसंकोचपणे माहिती थेट पोलिस अधीक्षक कार्यालयाला कळवावी, असे आवाहन पाटील यांनी केले आहे.सोशल मीडियावर आक्षेपार्ह विधान टाळाजिल्हावासीयांना कळकळीचे आवाहन आहे, कोणत्याही प्रकारे जातीय व सामाजिक, धार्मिक तेढ निर्माण होईल अशा पोस्ट नजरचुकीनेसुद्धा सोशल मीडियावर व्हायरल करू नये. कुठल्याही पोस्टविषयी काही आक्षेप वाटल्यास थेट पोलिसांशी संपर्क साधावा, ग्रामीण सायबर पोलीस तात्काळ संबंधितांवर कारवाई करतील.फोटो- १० सचिन पाटील

 

टॅग्स :PoliceपोलिसNashikनाशिक