कळवण : आनंदाची पर्वणी व सामाजिक एकोप्याचा संदेश घेऊन येणाऱ्या गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर गणेश मंडळांच्या आरासाची तयारी अंतिम टप्प्यात आली असून, बाप्पाच्या स्वागतासाठी गणेश मंडळे सज्ज झाली असून, बाजारपेठेतही चैतन्याचे वातावरण आहे. विक्र ीसाठी बाजारात उपलब्ध असलेल्या गणेशमूर्तींनी भक्तांना भुरळ घातली असून, अतिशय सुबक व मनोवेधक मूर्ती बाजारात विक्रीला आल्या आहेत.गणेशमूर्ती व पूजेचे साहित्य विक्रीचे स्टॉल्स शहरातील मेनरोड, बसस्थानक परिसर, महाराजा चौक, सुभाषपेठ आदी ठिकठिकाणी थाटण्यात आले असून, त्याठिकाणी खरेदीसाठी नागरिकांची गर्दी केली आहे. दुसरीकडे शहरातील गणेश मंडळांकडूनही सभामंडपाची सजावट व आरास उभारणीचे काम अंतिम टप्प्यात आले आहे.बाप्पाचे उत्साहात व जल्लोषात स्वागत करण्यात येणार असल्याने स्वागतासाठी गणेश मंडळांचे पदाधिकारी व कार्यकर्ते सज्ज झाले आहेत. घरोघरी बाप्पाची स्थापना केली जात असल्याने घरोघरी स्वागताची तयारी सुरू असून, बालगोपाळांची गल्लीबोळात, कॉलनी व आपल्या परिसरात बाप्पाची स्थापना करण्यासाठी बालगोपाळांमध्ये उत्साहाचे व चैतन्याचे वातावरण आहे.बाजारपेठेत चैतन्यबाप्पाच्या आगमनाच्यापार्श्वभूमीवर घरातील सजावटीसाठी नवीन फॅन्सी वस्तू घेण्याकडे कळवणकरांचा कल असून, अलीकडे कमी किमतीत फॅन्सी वस्तू मिळत असल्यामुळे एका वर्षी वापरून पुन्हा पुढील वर्षी नवीन वस्तू घेण्याकडे ग्राहकांचा कल वाढला आहे. वस्तूंच्या कमी किमतीमुळे अनेकांना ते परवडणारे असते. इलेक्ट्रॉनिक वस्तू, विविध भजने, आरती कॅसेट व विविध सजावटीची दुकाने, थर्माकोल दुकाने सजली आहेत. बाप्पाच्या आगमनामुळे बाजारपेठेत भक्तिमय वातावरण निर्माण झाले आहे. पोलिसांची करडी नजरगणेशोत्सव, सणांच्या पार्श्वभूमीवर कायदा व सुव्यवस्था अबाधित ठेवण्यासाठी कळवण पोलीस ठाणे हद्दीतील उपद्रवींवर पोलिसांची करडी नजर असून, प्रतिबंधात्मक कारवाई केली जाणार आहे. याबाबत संबंधिताना नोटिसा बजावण्यात आल्याची माहिती पोलीस सूत्रांनी दिली. सण, उत्सवाच्या काळात कायदा व सुव्यवस्थेचा भंग करून गोंधळ घालणाºया उपद्रवींवर पोलिसांनी कडक कारवाईचे हत्यार उपसल्याने विविध कलमांनुसार कारवाई केली जाणार आहे.गणेशोत्सवात कायदा व सुव्यवस्था कायम ठेवण्यासाठी पोलीस प्रशासनाला कळवण पोलीस ठाणे हद्दीतील सर्व राजकीय पक्षांचे पदाधिकारी व कार्यकर्ते, सामाजिक कार्यकर्ते व विविध संस्था, संघटना, व्यापारी, व्यावसायिक यांनी सहकार्य करावे व गणेश मंडळांनी नियमांचे पालन करावे, असे आवाहन पोलीस निरीक्षक सुधाकर मांडळकर यांनी केले आहे.पर्यावरणपूरक गणेशमूर्ती पर्यावरणपूरक असणाºया शाडूमातीच्या गणेशमूर्तींना ग्राहकांकडून कमी मागणी असते.शाडूमाती सहज उपलब्ध होत नसल्याने तिच्या गणेशमूर्ती प्रचंड महाग असतात. याशिवाय या मूर्तींवर केलेली रंगांची कलाकुसर पीओपीच्या मूर्तींसारखी मोहक नसते, म्हणूनच ग्राहक त्यांना पसंती देत नाहीत. पर्यावरणाच्या दृष्टीने शाडूमातीचे महत्त्व पटवून दिल्यानंतर दहा जणांपैकी एक ग्राहक ही मूर्ती घेण्यास राजी होतो, अशी माहिती मूर्ती विक्रेत्यांनी दिली.
बाप्पांच्या स्वागतासाठी सज्जता
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 13, 2018 1:09 AM
कळवण : आनंदाची पर्वणी व सामाजिक एकोप्याचा संदेश घेऊन येणाऱ्या गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर गणेश मंडळांच्या आरासाची तयारी अंतिम टप्प्यात आली असून, बाप्पाच्या स्वागतासाठी गणेश मंडळे सज्ज झाली असून, बाजारपेठेतही चैतन्याचे वातावरण आहे. विक्र ीसाठी बाजारात उपलब्ध असलेल्या गणेशमूर्तींनी भक्तांना भुरळ घातली असून, अतिशय सुबक व मनोवेधक मूर्ती बाजारात विक्रीला आल्या आहेत.गणेशमूर्ती ...
ठळक मुद्देकळवण : आनंदाची पर्वणी व सामाजिक एकोप्याचा संदेश घेऊन येणाऱ्या गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर गणेश मंडळांच्या आरासाची तयारी अंतिम टप्प्यात आली असून, बाप्पाच्या स्वागतासाठी गणेश मंडळे सज्ज झाली असून, बाजारपेठेतही चैतन्याचे वातावरण आहे. विक्र ीसाठी बाजारात उपल