भगूर, जि. नाशिक (विलास भालेराव) : उद्या, सोमवारच्या मतदानासाठी निवडणुकीची शासकीय प्रक्रिया भगूर शहरात पूर्ण झाली असून, मतदान केंद्रावर मंडप उभारणी, खुर्च्या व टेबलसह साहित्य टाकण्याचे काम पूर्ण झाले आहे. शहरातील ति. झ. विद्यामंदिर शाळेत - ५ बुथ, बाल अभिनव शाळेत -४, जि. प. शाळेत -२ व तलाठी कार्यालयात - २ बुथ अशा एकुण १३ बूथ खोलीत मतदान होणार आहे.
याकरिता चार मुख्य केंद्रावर प्रत्येकी एक असे ४ पाळणाघर चार दिव्यांगांसाठी खुर्च्या ठेवल्या असून, येथे २८ मतदान निवडणूक कामगार नियुक्त केले आहे. आरामकक्ष तयार करण्यात आला आहे. सर्व सोयीसुविधांचे नियोजन भगुर मुख्याधिकारी सुवर्णा दखणे यांच्या मार्गदर्शनाखाली नगर अभियंता सिद्देश मुळे, पाणीपुरवठा अभियंता सचिन चावके, शहर अभियंता गोरख भालके यांनी केले आहे.