नाशिक : दक्षिण युरोपसह मध्य आशिया खंडात दलदलयुक्त पाणथळ जागेत अधिवास करणाऱ्या स्थलांतरित पक्ष्यांमध्ये समाविष्ट असलेल्या लालशिरी बदकचा (रेड क्रेस्टेड पोचार्ड) मोठा थवा नांदूरमधमेश्वरच्या जलाशयात नुकताच स्थिरावल्याने पक्षिप्रेमींमध्ये आनंंदाचे वातावरण आहे. लालशिरी बदकाचे नर-मादी मिळून संख्या २३पर्यंत पोहोचली आहे. चालू महिन्याच्या प्रगणनेत १८ हजारांनी पक्षी वाढल्याचे निरीक्षण नाशिक वन्यजीव विभागाकडून नोंदविले गेले.नोव्हेंबरच्या तुलनेत चालू महिन्यात शहरासह निफाड तालुक्यातही थंडीची तीव्रता वाढली. पारा थेट १० अंशांपर्यंत खाली घसरल्याचीही नोंद काही दिवसांपूर्वी निफाडमध्ये झाली.यामुळे येथील नांदूरमधमेश्वर वन्यजीव अभयारण्यातील जलाशयावर भरलेल्या देशी-विदेशी पक्ष्यांच्या संमेलनाने उंची गाठली आहे. दिवसेंदिवस येथील पक्ष्यांची संख्या वाढताना दिसून येत आहे. पाणथळ जागेवरील पक्ष्यांसह गवताळ भागातील पक्षीदेखील येथे यजमानाची भूमिका बजावतांना दिसून येत आहेत.लालशिरी बदकाचे मुख्य वैशिष्ट म्हणजे नर दलदलयुक्त पाणथळ जागेतून खाद्य शोधून मादीला भरवितो. अन्य पक्ष्यांच्या प्रजातींमध्ये मादी ही नरापेक्षा अधिक सुंदर व आकर्षक दिसते. या पक्ष्याच्या बाबतीत मात्र हे लागू होत नाही. मादीपेक्षा नर हा जास्त सुंदर दिसतो. नराची चोच गडद लाल व शीर हलके तपकिरी रंगाचे असल्यामुळे तो अधिक लक्ष वेधून घेतो. मागील वर्षाच्या तुलनेत यंदा लालशिरीची संख्या जास्त आहे.—इन्फो—३० हजार पक्ष्यांची मोजदादवन्यजीव विभागाचे वनसंरक्षक तथा प्रभारी मुख्य वनसंरक्षक अनिल अंजनकर सहायक वनसंरक्षक भरत शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली सोमवारी (दि.२३) वनक्षेत्रपाल भगवान ढाकरे, वनपाल अशोक काळे, वनरक्षक, आश्विनी पाटील, चंद्रमणी तांबे, पक्षिमित्र दत्ता उगावकर, डॉ. उत्तम डेर्ले, किरण बेलेकर, गंगाधर आघाव, अमोल दराडे आदींनी अभयारण्याच्या निरीक्षण मनोऱ्यांवरून पक्ष्यांची गणना केली. या गणनेत अंदाजे पाणथळ जागेत २७ हजार २१, तर गवताळ भागात ३ हजार ४८१ पक्षी आढळून आले. एकूण ३० हजार ५०२ पक्ष्यांची मोजदाद करण्यात आली.या पक्ष्यांचा मुक्कामअभयारण्यातील सहा ठिकाणी करण्यात आलेल्या पक्षीनिरीक्षणात शिकारी पक्षी आॅस्प्रेसह बदकांमध्ये वारकरी, गढवाल, ब्राह्मणी बदक, कॉमन पोचार्ड, विजन, नकटा, स्पॉट बिल डक, टफ्टेड यांसह जांभळा बगळा, राखी बगळा, स्पूनबिल (चमचा), फ्लेमिंगो (मोठा रोहित), कमळपक्षी आदी प्रजातींचा मुक्काम वाढला आहे.
युरोप खंडातून ‘लालशिरी’ची हजेरी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 25, 2019 12:07 AM
नाशिक : दक्षिण युरोपसह मध्य आशिया खंडात दलदलयुक्त पाणथळ जागेत अधिवास करणाऱ्या स्थलांतरित पक्ष्यांमध्ये समाविष्ट असलेल्या लालशिरी बदकचा (रेड क्रेस्टेड पोचार्ड) मोठा थवा नांदूरमधमेश्वरच्या जलाशयात नुकताच स्थिरावल्याने पक्षिप्रेमींमध्ये आनंंदाचे वातावरण आहे.
ठळक मुद्देचालू महिन्याच्या प्रगणनेत १८ हजारांनी पक्षी वाढल्याचे निरीक्षण