पेठ - गत तीन वर्षापूर्वी राज्यातील मोठ्या ग्रामपंचायतीचे रूपांतर नगरपंचायत मध्ये करण्यात आले. मात्र पुर्वीच्या ग्रामपंचायत प्रशासनात सेवेत असलेल्या कर्मचार्यांना अद्यापही नगररचना विभागाने सेवेत कायम न केल्याने या कर्मचार्यांची ना घरका ना घाटका अशी गत झाली असून राज्यातील हजारो नगरपंचायत कर्मचाऱ्यांनी आंदोलनाचा पवित्रा घेतला आहे. नाशिक जिल्हयातील पेठ, सुरगाणा, दिंडोरी, कळवण, चांदवड, निफाड, आदी मोठ्या ग्रामपंचायती बरखास्त करून त्याचे नगरपंचायत मध्ये रूपांतर करण्यात आले. सरपंचाची कारकिर्द संपवून नगराध्यक्ष विराजमान झाले. मात्र कर्मचाºयांचा प्रश्न तसाच प्रलंबित राहीला. अनेक पुर्विच्या लिपिकांना शिपायाची नोकरी करावी लागत असून रोजंदारी व मयत कर्मचार्यांच्या वारसांना शासनाने वाºयावर सोडले आहे. त्यामुळे संतप्त झालेल्या राज्यातील नगरपंचायत कर्मचारी समन्वय समतिी स्थापन करून शासनाविरोधात आंदोलन छेडण्याचा पवित्रा घेतला आहे. १८ डिसेंबर रोजी एकदिवशीय धरणे आंदोलन छेडून मंत्रालयावर मोर्चा काढण्यात येणार असून १ जानेवारीपासून कामबंद आंदोलनाचे हत्यार उपसण्यात येणार असल्याचे पेठ नगरपंचायत समन्वय समितीच्यावतीने कळविण्यात आले आहे. तशा आशयाचे निवेदन नगराध्यक्ष, पोलीस निरिक्षक पेठ यांना देण्यात आले आहे. याप्रसंगी समन्वय समतिी अध्यक्ष गोविंद गाढवे, सचिव भारत चव्हाण, उपाध्यक्ष सकीब राजे, जनार्दन गायकवाड यांचेसह कर्मचारी उपस्थित होते.
नगरपंचायत कर्मचारी आंदोलनाच्या पावित्र्यात
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 13, 2018 2:18 PM