शनिवारी सकाळपासूनच वातावरणात मोठ्या प्रमाणात उकाडा असल्याने पावसाची शक्यता व्यक्त केली जात होती. सायंकाळी पाच वाजेच्या सुमारास ढगाळ वातावरण निर्माण होऊन वादळी वारे वाहू लागले होते. सोसाट्याच्या वाऱ्यासह पावसाचे वातावरण दिसत होते. साडेपाच वाजेच्या सुमारास विजांच्या कडकडाटसह तासाभराहून अधिक काळ पावसाने हजेरी लावली. दिवसभर असलेल्या उष्म्यामुळे हैराण झालेल्या नागरिकांना पावसाने दिलासा दिला. तसेच या पावसामुळे आगामी खरीप हंगामाच्या तयारीला वेग येणार आहे. दापूर, सोनेवाडी, चापडगाव व धुळवड परिसरात पावसाने जोरदार हजेरी लावली. सुमारे एक तासाहून अधिक पाऊस या भागात पडला. तसेच दापूर परिसरात विजांच्या तारांवर झाड पडल्याने काही काळ वीजपुरवठा खंडित झाला होता. सोनेवाडी येथे विजेचे चार पोल पडल्याने तेथील वीजपुरवठा खंडित झाला आहे. भोजापूर खोऱ्यात मात्र दुपारी चारच्या सुमारास मुसळधार पावसाने हजेरी लावली. चास, नळवाडी, कासारवाडी परिसराला मुसळधार पावसाने झोडपले. अचानक आलेल्या पावसाने शेतकऱ्यांची चांगलीच धावपळ उडाली.
फोटो: २९ सिन्नर रेन
सिन्नर तालुक्यातील दापूर व सोनेवाडी परिसरात वादळी वाऱ्यासह पावसाने हजेरी लावल्याने विजेचे पोल उन्मळून पडले आहे.
===Photopath===
290521\29nsk_31_29052021_13.jpg
===Caption===
फोटो: २९ सिन्नर रेन सिन्नर तालुक्यातील दापूर व सोनेवाडी परिसरात वादळी वाऱ्यासह पावसाने हजेरी लावल्याने वीजेचे पोल उन्मळून पडले आहे.