मागील आठवड्यात वादळी वाऱ्यांनी झटका दिला होता. गेल्या २ दिवसांपासून उन्हाचा तडाखा होता. त्यात अधून-मधून ढगाळ वातावरण तयार होत होते. दरम्यान, शुक्रवारी सकाळपासूनच वातावरणात प्रचंड उष्मा होता. दुपारी सव्वा चारच्या सुमारास ऊन पडलेले असताना अचानक पावसाने सुरुवात केली या पावसाने पाऊण तास हजेरी लावली.
चांदोरीत झाड कोसळले
चांदोरी : निफाड तालुक्यातील गोदाकाठ भागात जोरदार पावसाने हजेरी लावली.
सुमारे एक तास पावसाची रिपरिप सुरू होती. नाशिक-औरंगाबाद महामार्गावर चांदोरी येथील खरात पेट्रोलियमजवळ जोराच्या वाऱ्यामुळे झाड कोसळले. त्यामुळे वाहतूक कोंडी होऊन वाहनांच्या लांबलचक रांगा लागल्या होत्या. चांदोरी येथील आपत्ती व्यवस्थापन समितीची स्वयंसेवकांनी झाड बाजूला करून वाहतूक सुरळीत केली. यावेळी आपत्ती व्यवस्थापन समितीचे सागर गडाख, सोमनाथ कोटमे, मनोज महाजन व स्थानिक नागरिकांनी मदतकार्य केले.
पिंपळगाव वाखारीत पाऊस
पिंपळगाव वाखारी : पिंपळगाव वाखारी परिसरात रोहिणी नक्षत्राच्या प्रथम चरणात जोरदार पावसाने हजेरी लावली. पावसामुळे शेतात साठवलेला कांदा व चाऱ्याचे काही प्रमाणात नुकसान झाले असून शेतात पाणी साचल्याने शेतांना तळ्यांचे स्वरूप आले. त्याचा फायदा शेतकऱ्यांना पेरणीपूर्वी मशागतीसाठी होणार आहे. पावसामुळे परिसरात शेतकामांना वेग घेणार असून काही प्रमाणात नुकसान झाले आहे. वादळामुळे कांदा व आंबा उत्पादक शेतकऱ्याचे नुकसान झाले आहे.
फोटो- २८ चांदोरी ट्री
===Photopath===
280521\28nsk_50_28052021_13.jpg
===Caption===
फोटो- २८ चांदोरी ट्री