लोकमत न्युज नेटवर्कत्र्यंबकेश्वर : तालुक्यात सध्या 20 पॉझिटिव्ह रुग्ण असुन तालुक्याची कोव्हीड-19 ची शृंखला तुटण्या ऐवजी वाढतच आहे. मार्चमध्ये महाराष्ट्रात कोव्हीडने प्रवेश केला असला तरी त्र्यंबकेश्वर तालुक्यात जूनमध्ये हरसुल पासुन कोव्हीड ने शिरकाव केला. हरसुल कोरोना मुक्त झाले असले तरी त्र्यंबकेश्वर व घाटाच्यावर तालुक्यात कोरोनाने थैमान घातले आहे.आतापर्यंत त्र्यंबकेश्वर तालुक्यात कोरोना कोव्हीड-19 चे 112 रुग्ण होते. त्यापैकी आता पर्यंत 91 रुग्ण कोरोनावर मात करुन घरी गेले आहेत. ते पुनश्च आपल्या कामालाही लागले आहेत.या 112 रुग्णांपैकी जि.प.हद्द 61 तर नगरपरिषद हद्द 51 रुग्ण होते. या पैकी त्र्यंबकेश्वर येथील नाशिक रुग्णालयात एक वृध्दा मयत झाली आहे. कोव्हीड केअर सेंटर मध्ये 12 रुग्ण, कोव्हीड हेल्थ सेंटरमध्ये 2 रुग्ण नाशिक येथील रुग्णालयात 3 तर 3 रुग्ण आयसोलेटेड मध्ये होम क्वारंटाईन आहेत. असे 20 रुग्ण उपचार घेत आहेत. अद्याप 14 रुग्णांचे स्वॅब प्रलंबित आहेत. सध्या त्र्यंबकेश्वर मध्ये 25 कन्टेन्मेन्ट झोन करुन तेथील रहिवासीयांना बाहेर जाण्यास अगर बाहेरच्या लोकांना प्रतिबंधीत क्षेत्रात मनाई करण्यात आली आहे. सध्या जे 20 पॉझिटिव्ह रुग्ण आहेत ते व्यवस्थित असुन लवकरच बरे होउन घरी परत येतील अशी तेथील परिस्थिती आहे.
त्र्यंबकेश्वर तालुक्यात सध्या 20 कोव्हीड बाधा झालेले रुग्ण !
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 17, 2020 7:02 PM
त्र्यंबकेश्वर : तालुक्यात सध्या 20 पॉझिटिव्ह रुग्ण असुन तालुक्याची कोव्हीड-19 ची शृंखला तुटण्या ऐवजी वाढतच आहे. मार्चमध्ये महाराष्ट्रात कोव्हीडने प्रवेश केला असला तरी त्र्यंबकेश्वर तालुक्यात जूनमध्ये हरसुल पासुन कोव्हीड ने शिरकाव केला. हरसुल कोरोना मुक्त झाले असले तरी त्र्यंबकेश्वर व घाटाच्यावर तालुक्यात कोरोनाने थैमान घातले आहे.
ठळक मुद्देत्र्यंबकेश्वर तालुक्यात कोरोना कोव्हीड-19 चे 112 रुग्ण होते. त्यापैकी आता पर्यंत 91 रुग्ण कोरोनावर मात करुन घरी गेले