नाशिक : मेट्रो फाउंडेशन आॅफ इंडिया आणि कलावैभव संस्था, नाशिक यांच्या संयुक्त विद्यमाने आणि सांस्कृतिक कला संचलनालय, महाराष्ट शासन यांच्या सहकार्याने आयोजित नाशिक इंटरनॅशनल फिल्म फेस्टिव्हल अर्थात ‘निफ २०१८’च्या दुसऱ्या दिवशी विविध विषयांवर आधारित चित्रपट, लघुपट, माहितीपटांची रेलचेल पहायला मिळाली. रावसाहेब थोरात सभागृह व सातपूरच्या बिएलव्हीडी हॉल येथे दिवसभरात शनिवारी (दि. २४) सकाळपासून ‘द इनर साउंड’, ‘गोवा द लॅँड आॅफ शिवा’,‘टॉम’, ‘शुक’, ‘जरुरी’,‘जरुरत है’, ‘तुझ बरयं बाबा’,‘चोरी’, ‘आशीर्वाद’, ‘लुकिंग द स्टार्ट आॅफ कोर्सिका’,‘लिबराट मी’,‘परसेप्ट अॅँड प्रॅक्टस’, ‘भूक’, ‘काळी’, ‘भेद’, ‘टर्निंग पॉईंट’, ‘गुणवत्ता’, ‘लव्हाळ’, ‘दृढ निश्चय’, ‘अमरप्रेम’, ‘माझा भिरभिरा’ आदी विविध चित्रपटांचा प्रेक्षकांनी आस्वाद घेतला. सातपूरच्या बीएलव्हीडी हॉल येथे पुणे येथील प्रसिद्ध समुपदेशक व स्त्रीरोगतज्ज्ञ डॉ. वैजयंती पटवर्धन यांनी सौंदर्य स्पर्धेत भाग घेऊ इच्छिणाºया युवांना मार्गदर्शन केले.बदलत्या जीवनशैलीत आरोग्यावर द्यावा भरपुण्याच्या प्रसिद्ध स्त्रीरोगतज्ज्ञ तथा लग्न सल्लागार डॉ. वैजयंती पटवर्धन यांनी शनिवारी (दि.२५) झालेल्या मार्गदर्शनसत्रात तरुणी व महिलांना मार्गदर्शन केले. त्यांनी सांगितले की, आजच्या काळात तरु ण मुली व महिलांच्या मानसिक व शारीरिक समस्या मोठ्या प्रमाणात वाढल्या असून, याचा विपरीत परिणाम त्यांच्या दैनंदिन जीवनावर होत आहे. शारीरिक आरोग्य उत्तम राहण्यासाठी आपला आत्मविश्वास वाढविला पाहिजे. बदलत्या जीवनशैलीत आरोग्यसंपन्न जीवन असण्यावर भर द्यावा, असा सल्लाही त्यांनी यावेळी दिला. ‘मिस आणि मिसेस महाराष्ट्र इंडिया-२०१८’ या स्पर्धेत सहभागी झालेल्या तरु णी आणि महिलांना त्यांनी मार्गदर्शन केले. यावेळी निफचे फेस्टिवल आयोजक मुकेश कणेरी, प्रिया कणेरी, फ्रेंच कलाकार मरियानी बोर्गो, इमेज कॅन्सल्टंट स्मिता गणेश, सौंदर्यवती नूतन मिस्त्री तसेच निफ मिस इंडियाच्या स्पर्धक उपस्थित होत्या. यावेळी इमेज कॅन्सल्टंट स्मिता गणेश, मिसेस २०१८ इंडिया इंटरनॅशनल क्लासिक ब्युटी क्वीन नूतन मिस्त्री यांनीही मार्गदर्शन केले. दरम्यान, निफ अंतर्गत होत असलेल्या निफ मिस आणि मिसेस महाराष्ट्र इंडिया-२०१८ ही स्पर्धा अंतिम टप्प्यात आली असून, रविवारी (दि.२५) अंतिम निकाल जाहीर करण्यात येणार आहेत.
‘निफ’ महोत्सवात वैविध्यपूर्ण चित्रपटांचे सादरीकरण
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 25, 2018 12:17 AM