नाशिक : बहुप्रतिक्षित शहर बससेवा वर्षभरात सुरू करणे, पायी चालणे व सायकलींचा वापर वाढविण्याकरिता अडथळामुक्त रस्ते व पदपथ तयार करणे, उद्याने थीमपार्क म्हणून विकसित करणे, थीमबेस क्रीडांगणे तयार करणे, शहरात स्मार्ट स्ट्रिट लाईट यंत्रणा राबविणे, पेलिकन पार्क आणि फाळके स्मारकाचा पीपीपी तत्त्वावर विकास करणे, ६० पेक्षा जास्त नागरी सेवा आॅनलाइन करणे, मनपा व खासगी शाळांमध्ये क्लिनलीलेस सोल्जर्स उपक्रम राबविणे याबाबतचा संकल्प करत पाणीपुरवठा, मलनिस्सारण, रस्ते, पथदीप या पायाभूत सोयीसुविधांना प्राथमिकता देणारे सन २०१८-१९ या आर्थिक वर्षाचे महापालिकेचे अंदाजपत्रक आयुक्त तुकाराम मुंढे यांनी गुरुवारी (दि.२२) स्थायी समितीला सादर केले. मात्र, महापालिकेमार्फत या सेवा-सुविधा पुरविताना वापरानुसार सेवा दर आकारला जाणार असल्याने नाशिककरांच्या खिशाला झळ पोहोचणार आहे. आयुक्त तुकाराम मुंढे यांनी स्थायी समिती सभापती हिमगौरी अहेर-आडके यांच्याकडे सन २०१८-१९ या आर्थिक वर्षासाठीचे १७८५.१४ कोटी रुपयांचे अंदाजपत्रक सादर केले. आपल्या दीड तासांच्या भाषणात तुकाराम मुंढे यांनी महापालिकेमार्फत राबविण्यात येणाऱ्या विविध प्रकल्पांचा तसेच उपाययोजनांचा ऊहापोह केला. वर्षभरात शहर बससेवा महापालिकेच्या ताब्यात घेऊन ती सुरळीत चालू केली जाणार असून, त्यासाठी अंदाजपत्रकात ३० कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली आहे. सदर तरतूद आवश्यकतेनुसार वाढविण्यातही येणार आहे.नगरसेवक निधी नाहीदिनकर पाटील यांनी प्रत्येक प्रभागासाठी तीन कोटींची सूचना केली. मात्र, आयुक्तांनी १७८५ कोटी रुपयांचे हे अंदाजपत्रक सर्व प्रभागांच्या परिणामी, शहराच्या विकासासाठीच ठेवण्यात आल्याचे सांगितले. प्रत्येक नगरसेवकाला ७५ लाखांचा निधी द्यायचा तर पैसा आणायचा कुठून, असा सवालही आयुक्तांनी केला. नियमानुसार नगरसेवकांचा २ टक्के निधी आहे. त्यात लुडबूड केली जाणार नसल्याचेही आयुक्तांनी स्पष्ट केलेसत्ताधाºयांकडून अंदाजपत्रकाचे स्वागतस्थायी समितीवर अंदाजपत्रक सादर केल्यानंतर सत्ताधारी भाजपाच्या सदस्यांनी आयुक्तांच्या अंदाजपत्रकाचे स्वागत केले. उद्धव निमसे यांनी वास्तववादी अंदाजपत्रक असल्याचे सांगत त्यात दुरुस्तीला काहीही वाव नसल्याचे स्पष्ट केले. दिनकर पाटील यांनीही आपल्या चार पंचवार्षिक कारकिर्दीत पहिल्यांदाच असे चांगले अंदाजपत्रक पाहिल्याचे सांगत मागील मंजूर कामांचाही त्यात समावेश करण्याची सूचना केली. मुशीर सय्यद यांनी बांधकाम व्यवसायाला ऊर्जितावस्था आणण्यासाठी हार्डशिप प्रीमिअमबाबतही विचार करण्याची मागणी केली तर संगीता जाधव यांनी पाणीपुरवठ्यात सुधारणा होण्याची अपेक्षा व्यक्त केली. समीर कांबळे यांनी जुन्या कामांसाठी निधी देण्याची सूचना केली. कोमल मेहेरोलिया यांनी बिटको हॉस्पिटलचा प्रश्न उपस्थित केला. या साºया प्रश्नांची उत्तरे आयुक्तांनी दिली. सभापतींनी शहर बससेवा व एलइडीबाबतचा प्रस्ताव लवकरात लवकर ठेवण्याचे आदेशित केले.ना हरकत दाखले नगरचनातचनगररचना विभागाकडे बांधकाम परवानगीचे प्रकरण दाखल केल्यानंतर यापूर्वी अग्निशमन, पर्यावरण आदींसह विविध प्रकारचे ना हरकत दाखले त्या-त्या विभागाकडून मिळवावे लागत होते. परंतु, आता नगररचना विभागाकडे आॅनलाइन प्रकरण दाखल केल्यानंतर नगररचना विभागाकडूनच ना हरकत दाखल्यांसाठी अन्य विभागाकडे आॅनलाइनद्वारे मागणी केली जाईल आणि अन्य विभागाकडून नगररचनाकडे नियमात असेल तर ना हरकत दाखले दिले जातील. त्यासाठी अर्जदाराला कुठेही चकरा मारण्याची गरज पडणार नाही. सदर प्रणाली लगेच कार्यरत करण्यात आल्याचीही माहिती आयुक्तांनी दिली.महापालिकेचा स्पिलओव्हर ८०० कोटी रुपयांवरून ५५० कोटी रुपयांवर आल्याचे यावेळी सांगण्यात आले. अंदाजपत्रकात चालू आर्थिक वर्षासाठी आस्थापना खर्च ६३८.१९ कोटी रुपये अपेक्षित धरण्यात आला आहे. त्यात कर्मचारी वेतनासाठी ३२४.४१ कोटी रुपये प्रस्तावित आहेत. त्यामुळे आस्थापना खर्च ३८ टक्क्यांच्या आसपास आहे. शासनाच्या विविध अनुदानातील मनपाचा हिस्सा म्हणून १३० कोटी रुपये अपेक्षित धरण्यात आले आहे तर भूसंपादनाकरिता १०० कोटी रुपयांची तरतूद करण्यात आलेली आहे.महापालिका कायद्यातील तरतुदीनुसार स्थायी समितीचे सदस्य दिनकर पाटील, उद्धव निमसे, पुष्पा आव्हाड व शांता हिरे या चार सदस्यांनी विशेष महासभा घेण्यासाठी नगरसचिवांना पत्र दिले आहे. त्यानुसार, येत्या २८ मार्च रोजी सकाळी ११ वाजता विशेष अंदाजपत्रकीय महासभा बोलाविण्यात आली आहे. यावेळी स्थायी समिती सभापती हिमगौरी अहेर-आडके या महासभेला अंदाजपत्रक सादर करणार आहेत. याबाबत सर्वांनाच उत्सुकता लागली आहे.
महापालिकेचे अंदाजपत्रक सादर : स्मार्ट स्ट्रीट लाइट, थीमपार्कसह पायाभूत सुविधांना प्र्राथमिकताअडथळामुक्त शहराचा संकल्प
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 23, 2018 1:07 AM
नाशिक : बससेवा सुरू करणे, पायी व सायकलींचा वापर वाढविण्याकरिता अडथळामुक्त रस्ते व पदपथ तयार करणे, या पायाभूत सोयीसुविधांना प्राथमिकता देणारे सन २०१८-१९ या आर्थिक वर्षाचे महापालिकेचे अंदाजपत्रक आयुक्त तुकाराम मुंढे यांनी गुरुवारी स्थायी समितीला सादर केले.
ठळक मुद्दे६० पेक्षा जास्त नागरी सेवा आॅनलाइन करणे१७८५.१४ कोटी रुपयांचे अंदाजपत्रक सादर