शहरं
Join us  
Trending Stories
1
"कार्यकर्ता लढला, भल्याभल्यांना नडला, पण...", राम सातपुतेंचा रणजितसिंह मोहिते पाटलांवर मोठा आरोप
2
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 Results Highlights: अवघ्या १६२ मतांनी विजयी होऊन आमदार बनले; AIMIM पक्षानं त्यांची एकमेव जागा राखली
3
जिथे BJP विरोधात थेट लढाई, तिथे काँग्रेसला बसला मोठा फटका; 75 पैकी 65 जागा गमावल्या...
4
Narhari Zirwal : "उपाध्यक्ष पदाचा अनुभव घेतला, आता...."; नरहरी झिरवाळांनी सांगितलं 'मन की बात'
5
"बसपा कोणतीही पोटनिवडणूक लढवणार नाही", मायावतींची मोठी घोषणा; कारणही सांगितलं  
6
यशस्वी-KL राहुलच्या हिट शोनंतर कोहलीची फिफ्टी! टीम इंडियाची आघाडी ४०० पार...
7
 विधानसभा निवडणुकीत जरांगे फॅक्टर फेल?, महायुतीच्या विजयावर जरांगे पाटलांची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले...
8
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 Results Highlights: शिवसेना-मनसेच्या विसंवादामुळे उद्धव ठाकरेंचा फायदा; राज ठाकरेंनाही बसला फटका
9
आलिशान घर खरेदी केल्यानंतर विवेक ओबेरॉयने घेतली महागडी कार, झलक दाखवत म्हणाला...
10
देशसेवेचं स्वप्न! लंडनमधली नोकरी सोडली अन् IAS झाली; ७५ वर्षांनंतर गावाला केला पाणीपुरवठा
11
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 Results Highlights: एकनाथ शिंदे ठरले वरचढ, उद्धव ठाकरेंना मोठा फटका; ५१ पैकी केवळ १४ जागाच जिंकल्या
12
"कठोर परिश्रम अन् समर्पणामुळे ही विजयाची गाथा.."; मराठी कलाकारांकडून 'महायुती'चं अभिनंदन
13
कोण १६२ मतांनी तर कोण २०८ मतांनी विजयी; 'या' जागांवर पाहायला मिळाली चुरशीची लढत!
14
"मनोज जरांगे पाटलांचाच सुफडा साफ झाला", विजयानंतर छगन भुजबळ यांचा टोला
15
एकनाथ शिंदेंना साथ देणारे हे आमदार झाले पराभूत, शहाजीबापूंसह या नेत्यांना बसला धक्का
16
Video - "हा सर्व खेळ..."; लाजिरवाण्या पराभवाचं अभिनेता एजाज खानने EVM वर फोडलं खापर
17
महाराष्ट्रातील निकालांचा देशाच्या राजकारणावर किती परिणाम होईल? ६ मुद्द्यांमध्ये समजून घ्या
18
"मी १० वी नापास झालो तेव्हा वडिलांनी केलेलं सेलिब्रेशन", अनुपम खेर यांनी सांगितला किस्सा
19
Maharashtra Assembly Election 2024 Results Highlights : "सर्व दिग्गज नेते एकाच वेळी पराभूत होतील असं होऊ शकत नाही, आम्हाला संशय..."
20
'या' दोन नेत्यांनी भाजपच्या विजयात निभावली महत्त्वाची भूमिका, मध्य प्रदेशातही केली होती कमाल!

राष्ट्रपतींनी निमंत्रण स्वीकारले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 09, 2018 12:06 AM

सटाणा : जैन तीर्थक्षेत्र मांगीतुंगी येथील भगवान ऋषभदेव १०८ फूट मूर्ती निर्माण समितीतर्फे आयोजित करण्यात आलेल्या विश्वशांती अहिंसा संमेलनाचे निमंत्रण राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांनी स्वीकारले असून, येत्या २२ आॅक्टोबरला या संमेलनाचे उद्घाटन राष्ट्रपती कोविंद यांच्या हस्ते होणार आहे.

ठळक मुद्देविश्वशांती अहिंसा संमेलन : मांगीतुंगीत २२ आॅक्टोबरला उद्घाटन

सटाणा : जैन तीर्थक्षेत्र मांगीतुंगी येथील भगवान ऋषभदेव १०८ फूट मूर्ती निर्माण समितीतर्फे आयोजित करण्यात आलेल्या विश्वशांती अहिंसा संमेलनाचे निमंत्रण राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांनी स्वीकारले असून, येत्या २२ आॅक्टोबरला या संमेलनाचे उद्घाटन राष्ट्रपती कोविंद यांच्या हस्ते होणार आहे.यावेळी कोविंद यांनी मांगीतुंगीविषयी सखोल माहिती जाणून घेतली. मांगीतुंगी येथे येत्या २२ आॅक्टोबरपासून सुरू होणाऱ्या विश्वशांती अहिंसा संमेलनाचे निमंत्रण त्यांनी स्वीकारले. राष्ट्रपती कोविंद यांच्या हस्ते २२ तारखेला या संमेलनाचे उद्घाटन होणार आहे.या कार्यक्रमाला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, राज्यपाल विद्यासागर राव, पालकमंत्री गिरीश महाजन, महसूलमंत्री चंद्रकांत पाटील, ग्रामविकास राज्यमंत्री दादा भुसे, पर्यटन विकासमंत्री जयकुमार रावल, सांस्कृतिकमंत्री विनोद तावडेआदी मंत्रिगण उपस्थित राहणार आहेत.दरम्यान, सुरक्षेच्या दृष्टीने मालेगावचे अपर पोलीस अधीक्षक निलोत्पल, सहायक पोलीस अधीक्षक शशिकांत शिंदे, सहायक पोलीस निरीक्षक गणेश गुरव यांनी मांगीतुंगीला भेट देऊन पाहणी केली.याबाबतचा अहवाल तत्काळ गृह खात्याला पाठविण्यात आला. प्रांत प्रवीण महाजन, तहसीलदार प्रमोद हिले, बांधकाम विभागाचे उपअभियंता राहुल भुसारे, सहायक अभियंता दिलीप घाडगे यांनी शासकीय विश्रामगृह, रस्ते दुरुस्ती याबाबत पाहणी करून आढावा घेतला. रस्ते व विश्रामगृह दुरुस्तीचे अंदाजपत्रक तयार करण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत.मूर्ती निर्माण समितीने घेतली भेटसंरक्षण राज्यमंत्री तथा धुळ्याचे खासदार डॉ. सुभाष भामरे, मूर्ती निर्माण समितीचे अध्यक्ष पीठाधीश रवींद्रकीर्ती स्वामी, अनिल जैन, महामंत्री संजय पापडीवाल, प्रमोद कासलीवाल, भूषण कासलीवाल, विजय जैन यांनी दिल्ली येथे राष्ट्रपती भवनात राष्ट्रपती कोविंद यांची भेट घेतली.