शहरं
Join us  
Trending Stories
1
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 :'दगडा पेक्षा वीट बरी' प्रमाणे महाविकास आघाडी पेक्षा महायुती बरी; लक्ष्मण हाकेंनी स्पष्टच सांगितलं
2
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : बारामतीमध्ये शरद पवारांच्या बॅगांची तपासणी; अधिकाऱ्यांनी हेलिकॉप्टरमधील साहित्याची केली तपासणी
3
अजित पवार प्रचंड जातीवादी माणूस, त्यांनी कायम...; जितेंद्र आव्हाडांचा गंभीर आरोप
4
मुंबईवरून आलेल्या ट्रॅव्हल्समध्ये सापडली कोट्यवधीची रक्कम, मोजदाद सुरू; पोलिसांनी ठेवला पहारा
5
"मणिपुर ना एक है, ना सेफ है", हिंसाचारावरून मल्लिकार्जुन खरगेंचा PM नरेंद्र मोदींवर निशाणा
6
Amit Shah : चार नियोजित सभा सोडून अमित शाह तातडीने दिल्लीकडे रवाना; नेमकं कारण काय?
7
"मला जेलमध्ये टाकण्याची भाषा करू नका"; एकनाथ शिंदेंनी थोपटले दंड
8
Chalisgaon Vidhan Sabha: जुन्या पक्क्या मित्रांमध्ये रंगली आहे कट्टर लढत!
9
निष्काळजीपणा की कट? रुग्णालयातील NICU वॉर्डमध्ये कशी लागली आग; समोर आला रिपोर्ट
10
देवेंद्र फडणवीस यांनी घेतलेले हे निर्णय विधानसभा निवडणुकीत ठरू शकतात गेमचेंजर
11
Indian Players Injured, IND vs AUS 1st Test: टीम इंडिया संकट में है! पहिल्या कसोटीआधी भारतीय संघातील ४ स्टार खेळाडू दुखापतग्रस्त
12
नाशिकमध्ये राज ठाकरेंचा विरोधकांवर घाव, तर अजित पवारांनी ताईंचा वाढवला भाव
13
Bachchu Kadu : "लोकसभेच्या निकालाची पुनरावृत्ती करा"; बच्चू कडू यांचं आवाहन
14
"आता मी थोड्याच दिवसांचा पाहुणा’’, मनोज जरांगे पाटील भावूक; समर्थकांना केलं असं आवाहन
15
शादी मुबारक! पापाराझींच्या कमेंटवर तमन्ना भाटियाची अशी रिॲक्शन; विजय वर्माला हसू आवरेना
16
Ashish Shelar : "स्टेज खचला! संकेत कळला?, भाषण संपताच खचते पायाखालची माती"; शेलारांचा ठाकरेंना टोला
17
"लष्कर-ए-तैयबाचा सीईओ बोलतोय...", रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाला धमकीचा फोन
18
मोठा हलगर्जीपणा! रुग्णालयात मृत्यूनंतर रुग्णाचा डोळाच गायब; डॉक्टर म्हणतात, उंदराने कुरतडला
19
Naga Chaitanya Wedding: नागा चैतन्य आणि शोभिताच्या लग्नाची पत्रिका व्हायरल, 'वेडिंग डेट' आली समोर
20
साहेबांच्या कारकिर्दीपेक्षा अधिक कामे माझ्या काळात; अजित पवारांचा दावा

चार अधिकाऱ्यांना राष्ट्रपती, पोलीसपदक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 15, 2020 1:09 AM

स्वातंत्र्य दिनानिमित्त केंद्रीय गृहमंत्रालयातर्फे शुक्रवारी (दि. १४) पोलीसपदकांची घोषणा करण्यात आली असून, महाराष्ट्रातील ५८ पोलिसांना हा पुरस्कार जाहीर झाला आहे. यातील ५ अधिकाऱ्यांना उत्कृष्ट सेवेकरिता राष्ट्रपती पोलीसपदक, १४ पोलीस शौर्यपदक व ३९ जणांना प्रशंसनीय सेवेकरिता पोलीसपदक जाहीर झाले आहे.

ठळक मुद्देस्वातंत्र्यदिन : केंद्रीय गृहमंत्रालयातर्फे नाशिकचा गौरव

नाशिक : स्वातंत्र्य दिनानिमित्त केंद्रीय गृहमंत्रालयातर्फे शुक्रवारी (दि. १४) पोलीसपदकांची घोषणा करण्यात आली असून, महाराष्ट्रातील ५८ पोलिसांना हा पुरस्कार जाहीर झाला आहे. यातील ५ अधिकाऱ्यांना उत्कृष्ट सेवेकरिता राष्ट्रपती पोलीसपदक, १४ पोलीस शौर्यपदक व ३९ जणांना प्रशंसनीय सेवेकरिता पोलीसपदक जाहीर झाले आहे.पोलीस आयुक्तालयातील वरिष्ठ निरीक्षक डॉ. सीताराम कोल्हे, गुन्हे शाखेचे उपनिरीक्षक विजय लोंढे व नागरी हक्क संरक्षण कार्यालय परिक्षेत्राचे सहायक उपनिरीक्षक श्याम वेताळ, सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक पांडुरंग कावळे यांना राष्ट्रपती पोलीसपदक जाहीर झाले आहे. शहर मध्यवर्ती गुन्हे शाखेचे वरिष्ठ निरीक्षक डॉ. सीताराम कोल्हे मूळचे लोणी हवेली (ता. पारनेर, जि. अहमदनगर) येथील आहेत. डॉ. कोल्हे यांना २८ वर्षांच्या नोकरीच्या कालावधीत सुमारे ६०० बक्षिसे ८५ प्रशंसापत्रे मिळाली असून, महासंचालकांचे सन्मानचिन्ह प्राप्त झाले आहे.नागरी हक्क संरक्षण कार्यालय नाशिक परिक्षेत्र येथील सहायक पोलीस उपनिरीक्षक श्याम गणपत वेताळ यांना केंद्रीय गृहमंत्रालयातर्फे दिले जाणारे राष्ट्रपती पोलीसपदक जाहीर झाले आहे. ते मूळचे पाटणे (ता.मालेगाव, जि. नाशिक) येथील आहेत. यापूर्वी ते नाशिक ग्रामीण पोलीस दलातील वाचक शाखेत कार्यरत होते.

टॅग्स :NashikनाशिकPoliceपोलिस