नाशिक : जिल्हा परिषदेच्या प्राथमिक शिक्षण विभागाच्या वतीने छत्रपती शिवाजी स्टेडियम येथे आयोजित जिल्हा परिषद अध्यक्ष चषक कला, क्रीडा व सांस्कृतिक स्पर्धेत निफाड तालुक्याने ७२ गुण प्राप्त करून जिल्हा परिषद अध्यक्ष चषक पटकावला. जिल्हा परिषदेच्या अध्यक्ष शीतल सांगळे यांच्या हस्ते या स्पर्धेतील विजयी स्पर्धकांना बक्षिसांचे वाटप करण्यात आले. यावेळी बोलताना सांगळे यांनी सांगितले की, ग्रामीण भागातील विद्यार्थी हा कोणत्याही क्र ीडा प्रकारात मागे नसून फक्त त्यांना प्रोत्साहन देण्याची गरज आहे. कविता राऊत, मोनिका आथरे यांसारख्या गुणी खेळाडूदेखील ग्रामीण भागातूनच पुढे आल्या आहेत. ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना हक्काची जागा मिळावी म्हणून छत्रपती शिवाजी स्टेडियमचे नूतनीकरण करण्यासाठी पाठपुरावा करण्यात येत असून हे काम आपल्या कार्यकाळात पूर्ण करणार असल्याचे त्यांनी सांगितले. कार्यक्रमाचे अध्यक्ष धनराज महाले यांनी ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांच्या कलागुणांना वाव देण्यासाठी अशा स्पर्धा महत्त्वाच्या असून यातूनच भावी खेळाडू तयार होणार असल्याचे मत व्यक्त केले. यावेळी मान्यवरांच्या हस्ते सन २०१६-१७ मधील तसेच २०१७-१८ मधील विजयी स्पर्धकांना बक्षिसांचे वाटप करण्यात आले. प्रास्ताविक शिक्षण अधिकारी वैशाली झनकार यांनी, तर सूत्रसंचालन विस्तार अधिकारी गरड व चिंचोले यांनी केले. यावेळी जिल्हा क्र ीडा अधिकारी रवींद्र नाईक यांच्यासह शिक्षण विभागाचे अधिकारी व शिक्षक उपस्थित होते.
निफाड तालुक्याने पटकाविला जिल्हा परिषद अध्यक्ष चषक
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 28, 2018 2:07 AM
नाशिक : जिल्हा परिषदेच्या प्राथमिक शिक्षण विभागाच्या वतीने छत्रपती शिवाजी स्टेडियम येथे आयोजित जिल्हा परिषद अध्यक्ष चषक कला, क्रीडा व सांस्कृतिक स्पर्धेत निफाड तालुक्याने ७२ गुण प्राप्त करून जिल्हा परिषद अध्यक्ष चषक पटकावला.
ठळक मुद्देगुणी खेळाडूदेखील ग्रामीण भागातूनच पुढे भावी खेळाडू तयार होणार असल्याचे मत