नाशिक : दोन दिवसांवर येवून ठेपलेल्या जिल्हा परिषदेच्या अध्यक्ष व उपाध्यक्ष निवडणुकीसाठी शिवसेना व राष्टÑवादी कॉँग्रेसचे सदस्य एकत्रित सहलीवर रवाना झाले असून, बुधवारी सायंकाळपर्यंत महाविकास आघाडीचा अध्यक्ष व उपाध्यक्षपदाचा उमेदवार ठरण्याची शक्यता आहे. दरम्यान, मंगळवारी झालेल्या पंचायत समिती सभापतिपदाच्या निवडणुकीत महाविकास आघाडीत अनेक ठिकाणी बेबनाव झाल्यामुळे या निवडणुकीचा जिल्हा परिषदेच्या निवडीवर काय परिणाम होतो त्यावर भाजप लक्ष ठेवून आहे.गुरुवारी सकाळी अकरा वाजेपासून जिल्हा परिषद अध्यक्ष निवडणुकीची प्रक्रिया सुरू केली जाणार असून, त्यासाठी विशेष सर्वसाधारण सभेचे आयोजन करण्यात आले आहे. राज्यात सत्तेवर आलेल्या महाविकास आघाडीने या निवडणुकीला एकत्रित सामोरे जाण्याचा निर्णय घेतला असल्याने शिवसेना, राष्टÑवादीचे सदस्य एकत्रित सहलीसाठी रवाना झाले आहेत. तर कॉँग्रेसचे सदस्य मात्र स्वतंत्रपणे दुसऱ्या ठिकाणी रवाना झाले आहेत. गेल्या निवडणुकीत शिवसेना, भाजप, राष्टÑवादी, कॉँग्रेस या चारही पक्षांनी सोयीसोयीने एकमेकांशी जुळवून घेत जिल्हा परिषदेत सत्तेची पदे अडीच वर्षे भोगली. आता मात्र महाविकास आघाडी झाल्याने भाजपला दूर ठेवण्यावर उर्वरित तिन्ही पक्षांचा भर असला तरी, अध्यक्षपदाचा उमेदवार व सत्तेतील वाटा अधिक मिळावा, असा प्रयत्न शिवसेनेसह राष्टÑवादीचा आहे.त्यामुळे दोन्ही पक्षांचे सदस्य एकत्रित सहलीसाठी रवाना झाले असले तरी, त्यांच्यात मनसुबे वेगवेगळे आहेत. शिवाय दोन्ही पक्षांतर्गत अध्यक्ष, उपाध्यक्षपदासाठी इच्छुकांची संख्या अधिक आहे. प्रत्येकाने आपापल्यापरिने पक्षश्रेष्ठींकडे फिल्डिंग लावली आहे. या सर्व पार्श्वभूमीवर राष्ट्रवादीचे नेते ग्रामविकास मंत्री छगन भुजबळ यांचे मंगळवारी सायंकाळी नाशकात आगमन झाले असून, बुधवारी शिवसेनेच्या नेत्यांशी बोलून महाविकास आघाडीचा फार्म्युला ठरण्याची त्याचबरोबर सेनेकडूनही अध्यक्षपदाचा उमेदवार घोषित होण्याची शक्यता आहे.महाविकास आघाडीत काहीशी नाराजीसत्ताधारी महाविकास आघाडीत या सर्व घडामोडी घडत असताना भारतीय जनता पक्षात मात्र तूर्त शांतता दिसत आहे. मंगळवारी झालेल्या पंचायत समितीच्या सभापती निवडणुकीत एका तालुक्यात सेनेने भाजपला सोबत घेऊन सभापतिपद पटकाविले आहे. मात्र अन्य ठिकाणी भाजपला दूर ठेवण्यात आले असले तरी, सेना व राष्टÑवादीने संख्याबळाचा विचार करून अनेक ठिकाणी आपापल्या बळावर सभापतिपद ताब्यात ठेवून मित्रपक्षाला बाजूला ठेवले आहे. त्यामुळे महाविकास आघाडीत काहीशी नाराजी व्यक्त केली जात आहे. भाजप नेमके याच नाराजीवर लक्ष ठेवून असून, अंतिम क्षणी हालचाली होतील, असे सूत्रांचे म्हणणे आहे.
अध्यक्षपदाचा उमेदवार आज ठरण्याची शक्यता
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 01, 2020 1:56 AM
दोन दिवसांवर येवून ठेपलेल्या जिल्हा परिषदेच्या अध्यक्ष व उपाध्यक्ष निवडणुकीसाठी शिवसेना व राष्टÑवादी कॉँग्रेसचे सदस्य एकत्रित सहलीवर रवाना झाले असून, बुधवारी सायंकाळपर्यंत महाविकास आघाडीचा अध्यक्ष व उपाध्यक्षपदाचा उमेदवार ठरण्याची शक्यता आहे. दरम्यान, मंगळवारी झालेल्या पंचायत समिती सभापतिपदाच्या निवडणुकीत महाविकास आघाडीत अनेक ठिकाणी बेबनाव झाल्यामुळे या निवडणुकीचा जिल्हा परिषदेच्या निवडीवर काय परिणाम होतो त्यावर भाजप लक्ष ठेवून आहे.
ठळक मुद्देजिल्हा परिषद : महाविकास आघाडीकडे भाजपचे लक्ष