नाशिक : शासकिय विश्रामगृह तिडके कॉलनी ते थेट द्वारकामार्गे गांधीनगरच्या कॉम्बॅट आर्मी एव्हिएशन ट्रेनिंग स्कूलपर्यंतच्या मार्गाची पोलिसांकडून पाहणी करण्यात आली. मंगळवारी (दि.८) सकाळी या मार्गावर व्हीव्हीआयपी कॅन्वॉयची रंगीत तालीमदेखील घेण्यात आली. या संपुर्ण मार्गावर बॉम्ब शोधक-नाशक व विशेष गुन्हे श्वान पथकाकडून कसून तपासणीदेखील करण्यात आली.
राष्ट्रपती दौरा : ‘व्हीव्हीआयपी कॅन्वॉय’ मार्गावर ‘बीडीडीएस’कडून कसून तपासणी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 8, 2019 14:28 IST
एव्हिएशनच्या लष्करी बॅन्ड पथकाच्या धूनवर वैमानिकांची तुकडी संचलन करत तीनही सेनादलांचे प्रमुख राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांना मानवंदना देणार आहेत.
राष्ट्रपती दौरा : ‘व्हीव्हीआयपी कॅन्वॉय’ मार्गावर ‘बीडीडीएस’कडून कसून तपासणी
ठळक मुद्देराष्ट्रपती रामनाथ कोविंद यांना मानवंदना देणार व्हीव्हीआयपी कॅन्वॉयची रंगीत तालीमबॉम्ब शोधक-नाशक, विशेष गुन्हे श्वान पथकाकडून तपासणी