शहरं
Join us  
Trending Stories
1
शिंदेंनी बंडखोरी केली नसती तर भाजपा सत्तेत आली नसती; महायुतीच्या जुन्या सहकाऱ्याचे वक्तव्य
2
“मी मोदींना फोन केला, म्हटलं माझा कुठलाही अडसर नसेल!”; एकनाथ शिंदेंनी CM पदावरचा दावा सोडला
3
“नापी है मुठ्ठी भर जमीन, अभी सारा आसमान बाकी है”; एकनाथ शिंदेंनी शायरीतून सांगितला 'फ्युचर प्लॅन'
4
“देवेंद्र फडणवीसांना मुख्यमंत्री म्हणून एकनाथ शिंदेंचा पाठिंबा आहे का?”; भाजपाने केले स्पष्ट
5
Maharashtra Politics : मोदी-शाह म्हणतील तसं! जो मुख्यमंत्री ठरवाल, त्याला आमचा पाठिंबा; एकनाथ शिंदेंनी जाहीरच करून टाकलं
6
"...अन्यथा तुम्हाला सरकारी नोकरी गमवावी लागेल", मुख्यमंत्र्यांनी घेतला मोठा निर्णय
7
'लव्ह अँड वॉर'च्या सेटवरुन Photos लीक, रेट्रो लूकमध्ये दिसली आलिया तर रणबीरचा डॅशिंग अवतार
8
Baba Siddique : "मारेकऱ्यांच्या खात्यावर पैसे पाठवण्यासाठी मिळाले ५० हजार"; आरोपीने दिली महत्त्वाची माहिती
9
शिंदे उद्या दिल्लीला जाणार! भाजपच्या वरिष्ठ नेत्यांसोबत देवेंद्र फडणवीस, अजित पवारांचीही बैठक होणार
10
"सगळ्या पदांपेक्षा लाडका भाऊ ही ओळख मोठी"; एकनाथ शिंदेंचं CM पदाबाबत सूचक विधान
11
"नाराज होऊन आम्ही रडणारे नाही", एकनाथ शिंदेंकडून मुख्यमंत्रीपदावरील दावा सोडण्याचे संकेत 
12
एकनाथ शिंदेंनंतर लगेचच भाजपही पत्रकार परिषद घेणार; काय घडतेय...
13
अमित शाह यांच्या दालनात शिवसेनेच्या खासदारांना जमण्याच्या सूचना; श्रीकांत शिंदे अनुपस्थित राहणार?
14
मुख्यमंत्रिपदाची शर्यत! अजित पवार निघाले शरद पवारांनीच मळलेल्या वाटेवर; दिल्लीत गाठीभेटी
15
Defence Stock: डिफेन्स स्टॉक्स पुन्हा एकदा सुस्साट, एक्सपर्ट बुलिश; पाहा काय आहेत नवी टार्गेट प्राईज
16
सत्तेत असावे की, सत्तेबाहेर? बच्चू कडूंनी जनतेलाच विचारला सवाल
17
ICC Test Rankings: जसप्रीत बुमराह पुन्हा 'नंबर १'! यशस्वी जैस्वाल, विराट कोहलीचीही कसोटी यादीत मोठी झेप
18
शेजाऱ्याने मुलाला केलं किडनॅप, नंतर शोधण्याचं नाटक; खंडणी न मिळताच भयंकर कृत्य अन्...
19
विरोधकांना EVMवर संशय, कोर्टात जायची तयारी; भाजपा नेतृत्वाचे भाष्य, म्हणाले, “लोकसभेवेळी...”
20
भाजपच्या मंत्र्यानं अजान ऐकून थांबवलं भाषण; मंचावरूनच पठण केलं, ‘ला इलाहा इल्लल्लाह…’ 

अध्यक्ष पदासाठी रस्सीखेच सुरूच

By admin | Published: May 26, 2015 1:30 AM

अध्यक्ष पदासाठी रस्सीखेच सुरूच

नाशिक : जिल्हा मध्यवर्ती सहकारी बॅँकेच्या अध्यक्ष व उपाध्यक्ष पदाची निवडणूक ६ जूनला होण्याची शक्यता असून, त्या अनुषंगाने उद्या (दि.२६) विशेष बैठकीची अधिसूचना निघण्याची चिन्हे आहेत. या आठवड्यातच बैठकीबाबत अधिसूचना निघणार असल्याची माहिती जिल्हा बॅँकेच्या सूत्रांनी दिली.दरम्यान, अध्यक्ष पदासाठी आवश्यक असलेले ११ संचालकांचे संख्याबळ हिरे आणि कोकाटे-पिंगळे गटाकडे कालपर्यंत (दि.२५) जमले नसल्याची चर्चा असून, पाच संचालकांचा दबावगट तयार होण्याची चिन्हे आहेत. या सर्व घडामोडीत जिल्हा परिषदेतून निवडून गेलेल्या दोन संचालकांची भूमिकाही महत्त्वपूर्ण ठरण्याची शक्यता आहे.सोमवारी याबाबतची अधिसूचना निघण्याची शक्यता होती. मात्र निवडणूक निर्णय अधिकारी तथा विभागीय उप सहनिबंधक सतीश खरे यांची काल तब्येत बिघडल्याने त्याबाबत अधिसूचना निघू शकली नसल्याचे समजते. जिल्हा बॅँकेच्या संचालक मंडळाची संख्या २१ असून, अध्यक्ष व उपाध्यक्ष पदाच्या निवडणुकीत विजयासाठी ११ संचालकांची मॅजिक फिगर गाठणे आवश्यक आहे. हिरे गटाने त्यांच्याकडे १३ ते १४ संचालक असल्याचा दावा केला असला तरी या संचालकांची नावे अद्याप जाहीर केलेली नाहीत. त्यामुळे हिरे गटाकडे नेमके किती संचालकांचे ‘पाठबळ’ आहे, याची माहिती उपलब्ध झालेली नाही. त्यातच कोकाटे-पिंगळे गटाकडून कालही संचालकांची जमवा जमव सुरूच असल्याचे चित्र होते. अपक्ष म्हणून निवडून आलेले जि. प. सभापती केदा अहेर, सदस्य अ‍ॅड. संदीप गुळवे यांच्यासह नामेदव हलकंदर, सचिन सावंत व धनंजय पवार यांचा एक दबावगट तयार होेण्याची शक्यता आहे, तर शिवसेनेचे आमदार अनिल कदम व सुहास कांदे या संचालक जोडीने अद्यापही ‘वेट अ‍ॅन्ड वॉच’ची भूमिका घेतल्याने अध्यक्षपदाची चुरस वाढली आहे. (प्रतिनिधी)