ग्रामस्थांच्या वतीने प्रसिद्ध महादेव मंदिरातील मूर्तीची प्राणप्रतिष्ठा सोहळ्यासाठी महिलांनी आपल्या घरासमोर सडा टाकून रेखीव रांगोळी काढल्या होत्या. मंदिरातील सर्वच मूर्तींची हारफुलांनी सजवलेल्या रथातून पारंपरिक पद्धतीने वाद्यांच्या गजरात मिरवणूक काढण्यात आली. मिरवणुकीदरम्यान रथातील महादेवाची पिंड तसेच इतर मूर्तीचे महिलांकडून पूजन तसेच औक्षण करण्यात येत होते. या मिरवणुकीत महिलांनी डोक्यावर सजवलेले कलश घेत सहभाग नोंदवला. यानंतर मिरवणूक मुख्य मंदिराजवळ आल्यानंतर साधू-महंतांच्या हस्ते मूर्तीला दुग्धाभिषेक करण्यात आला. या ठिकाणी दोन दिवसांपासून मूर्तीचे पूजन तसेच कीर्तन, संगीत, भजन आदी कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले असल्याने परिसरातील नागरिकदेखील सहभागी झाले होते. नाशिक तसेच स्थानिक पुजारी व साधू-महंतांच्या प्रमुख उपस्थितीत मूर्तींचे विधिवत पूजन करून प्राणप्रतिष्ठा करण्यात आली.
बेलगाव तऱ्हाळेत महादेव मूर्तीची प्राणप्रतिष्ठा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 10, 2021 5:09 PM
नांदूरवैद्य : इगतपुरी तालुक्यातील बेलगाव तऱ्हाळे येथे साधू-महंतांच्या प्रमुख उपस्थितीत महादेवाची पिंड तसेच इतर मूर्तीच्या प्राणप्रतिष्ठा व कलशारोहन सोहळा पार पडला. त्यामुळे पाच दिवसांपासून भक्तिमय वातावरण निर्माण झाले आहे.
ठळक मुद्दे पाच दिवसांपासून गावात भक्तिमय वातावरण