नाशिक : मराठा क्रांती मोर्चाच्या नाशिक जिल्हा समन्वयकांनी वसतिगृहाच्या जागेला होणाºया विरोधाविषयी जिल्हाधिकाºयांना सोमवारी (दि. २०) निवेदन दिले. वसतिगृहाला विरोध करून मराठा समाजाला डिवचून कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण करणाºया प्रवृत्तींवर प्रतिबंधात्मक कारवाई करण्याची मागणी मराठा क्रांती मोर्चाने या निवेदनाच्या माध्यमातून केली आहे. तसेच जिल्हाभरासह संपूर्ण शहरात मराठा क्रांती मोर्चाच्या ठोक आंदोलनादरम्यान आंदोलकांवर दाखल करण्यात आलेले गुन्हेही मागे घेण्याच्या मागणीसाठी मराठा क्रांती मोर्चाने उपजिल्हाधिकारी रामदास खेडकर यांना निवेदन दिले. गेल्या चाळीस वर्षांपासून सुरू असलेल्या मराठा समाजाच्या आंदोलनाला यश येत असताना काही समाजविघातक प्रवृत्ती विरोधाची भूमिका घेऊन शांततेच्या मानसिकतेत असलेल्या मराठा समाजाच्या सहनशक्तीला आव्हान देत सामाजिक शांतता भंग करण्याचा प्रयत्न करीत असल्याचा आरोप मराठा क्रांती मोर्चा समन्वयकांनी केला आहे. अशा नाठाळ प्रवत्ती जाणीवपूर्वक मराठा समाजाच्या अस्मितेला डिवचून कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण करण्याचा कुटिलपणा करीत असल्याचेही या निवेदनात नमूद करण्यात आले आहे. मराठा समाजाला अथक प्रयत्नानंतर मिळालेले वसतिगृह हिरावून घेण्याचा यामागे डाव खेळला जात असल्याचे वसतिगृहाच्या जागेला होत असल्याच्या विरोधातून समोर येत आहे. सरकारने मराठा समाजाच्या विद्यार्थ्यांसाठी गंगापूररोडवरील भूखंड मंजूर केला आहे. ही बाब सहन न झालेल्या काही प्रवृत्तींनी या जागेवर वसतिगृह बांधण्यास विरोध दर्शविला आहे. त्यापार्श्वभूमीवर मराठा क्रांती मोर्चाने जिल्हाधिकाºयांना निवेदन देऊन या समाज विघातक प्रवृत्तींचा कायदेशीर मार्गाने बंदोबस्त करून वसतिगृह बांधकामाला गती द्यावी, अशी मागणी केली आहे. यावेळी मराठा क्रांती मोर्चातर्फे करण गायकर, तुषार जगताप, गणेश कदम,विलास जाधव, संदीप लभडे, मदन गाडे, माधवी पाटील, पूजा धुमाळ, अनुपमा पाटील, ज्ञानेश्वर जाधव, ज्ञानेश्वर भोसले, अॅड. नीलेश संधान, विकास काळे, आप्पासाहेब गाडे, नीलेश पाटील आदी उपस्थित होते.
वसतिगृहास विरोध करणाऱ्यांना प्रतिबंध करा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 21, 2018 12:46 AM