--इन्फो--
मुंबईतून होतोय पुरवठा
नायलॉन मांजाचा शहरात मुंबईतून पुरवठा केला जात असल्याचे समोर आले आहे. या तिघांची कसून चौकशी केली असता त्यांनी मुंबई येथील एस.एस. पतंग व्यापाऱ्याकडून मागविल्याची कबुली दिली. तसेच लोंढे याने सिन्नर येथील त्याच्या घरातदेखील नायलॉन मांजा दडवून ठेवला होता. त्याच्या घराची झडती घेतली असता तेथून पोलिसांना नायलॉन मांजाच्या ६० गट्टूंचा खोका मिळून आला.
---इन्फो--
जुन्या नाशकात पुन्हा छापा
शनिवारी (दि.९) दुपारी जुने नाशिक परिसरातील वावरे गल्लीतील म्हसोबा मंदिराच्या बोळीत नायलॉन मांजाविक्रीच्या ठिकाणी गुन्हे शाखा युनिट-१च्या पथकाने छापा टाकला. तेथून ४० हजार रुपये किमतीचे सुमारे ८० गट्टू जप्त करण्यास पोलिसांना यश आले. पोलिसांनी संशयित विक्रेता मयूर किशोर पारचे (२३, रा. वावरे लेन, ठाकरे रोड), सचिन मनोहर कोडीलकर (३४, रा. कोळीवाडा) यांना ताब्यात घेतले आहे.
---
फोटो आर वर०९ नायलॉन मांजा नावाने सेव्ह आहे.