नाशिक : येथील श्री काळाराम मंदिरात पूजेसाठी आलेल्या कोल्हापूर येथील संयोगिताराजे यांच्या पूजा विधि वरून वाद निर्माण झाला आहे. आपल्याला बळजबरीने पुराणोक्त मंत्र म्हणून वेदोक्त्याचा अधिकार कसा नाही, असे येथील पुजाऱ्यांनी सांगितल्याचा दावा त्यांनी सोशल मीडिया द्वारे केला आहे. त्यामुळे नाव वाद निर्माण झाला आहे.
या मंदिराचे पुजारी महंत सुधीरदास पुजारी यांनी त्याचे खंडन केले असून उद्या याबाबत सखोल स्पष्टीकरण देणार असल्याचे सांगितले. नाशिक येथील श्री काळाराम मंदिर अत्यंत पुरातन असून डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या नेतृत्वाखाली श्री काळाराम मंदिर प्रवेश सत्याग्रहही झाला आहे. देशभरातील लाखो भाविक या मंदिरात भेट देत असतात या मंदिरात संयोगिता राजे यांनी भेट दिली. त्यावेळी तेथील पुजाऱ्यांनी पुराणोक्त मंत्र म्हटला, त्यास आपण हरकत घेतली. त्यावेळी पुजाऱ्यांनी आपल्याला वेदोक्त मंत्राचा अधिकार कसा नाही, हे सांगण्यास सुरुवात केली असा आक्षेप संयोगिता राजे यांनी आपल्या सोशल मीडियाच्या पोस्टमध्ये केला आहे.
शंभर वर्षे झाली मात्र अजूनही मानसिकता का बदलली नाही असा प्रश्न त्यांनी केला आहे. हे पुजारी च्या मंदिरांमध्ये काम करतात ती मंदिरे छत्रपती शाहू महाराजांनीच वाचवली आहेत, असे आपण पुजार्यांना सुनावले असेही त्यांनी नमूद केले आहे. दरम्यान त्यांच्या या पोस्टवरून चर्चा सुरू झाली असली तरी नाशिक मधील श्रीराम मंदिराचे पुजारी तथा महंत सुधीरदास पुजारी यांनी या सर्व प्रकाराचे खंडन केले आहे. मुळात राणीसाहेब संयोगिता राजे या सुमारे दीड महिन्यापूर्वी काळाराम मंदिरात आल्या होत्या. त्यावेळी त्यांनी अभिषेक संकल्प करण्यास सांगितले. हा संकल्प वेदोक्त असला पाहिजे असे त्या म्हणाल्या.
त्यानुसार आपण रामाला श्री रामचंद्रांना वेदोक्तच पूजा अभिषेक केला जातो असे स्पष्ट केले. संकल्प करताना त्यात वेदोक्त आणि पुराणोक्त असे काही नसते असेही सांगितले. त्यानंतर संकल्प सांगताना श्रुती, स्मृती, पुराणोक्त असे म्हटल्यानंतर राणी साहेबांनी पुन्हा पुराणोक्त शब्दाला आक्षेप घेतला. त्यावेळी त्यांना श्रुती स्मृती याचाही अगोदरच उल्लेख केलेला आहे, असे स्पष्ट केले. त्यानंतर त्यांचे समाधान झाले. त्यांनी त्यांनी दक्षिणाही दिली, असे असताना अचानक त्यांनी अशी भूमिका कशी घेतली, असा प्रश्न महंत सुधीर दास पुजारी यांनी केला आणि आश्चर्य व्यक्त केले आहे.