लोकमत न्यूज नेटवर्कनाशिक : शिक्षण विभागाच्या आदेशानुसार चालू वित्तीय वर्षात कोणत्याही संवर्गातील अधिकारी अथवा कर्मचारी यांच्या बदल्या करण्यास प्रतिबंध करण्यात आलेला आहे.गेल्या मार्च महिन्यापासून राज्यभरात कोरोनाचा संसर्ग वाढत असल्याने शाळा, महाविद्यालयेदेखील बंद होते. तसेच नवीन शैक्षणिक वर्षातील कामकाज अद्याप सुरू झालेले नाही. त्यामुळे बदल्यांचा विषयदेखील प्रलंबीत आहे. त्याप्रमाणे सर्व संस्थांनी कार्यवाही करण्याचे आवाहन जिल्हा परिषदेचे माध्यमिक शिक्षणाधिकारी तथा वेतन व भविष्य निर्वाह निधी पथकाचे अधीक्षक यांनी सर्व शाळांच्या मुख्याध्यापकांना केले आहे. त्याप्रमाणे त्याचप्रमाणे सध्या कोरोनामुळे शाळा सुरू नसल्याने बदल्या करून त्यांचे रुजू करण्याचे व मुक्त करण्याचे प्रस्ताव स्वीकारले जाणार नसल्याचेही या अधिकाऱ्यांनी स्पष्ट केले आहे. अशाप्रकारे जिल्ह्यातून विविध संस्थांचे प्रस्ताव कार्यालयात येत असल्याने असाप्रकार धोकादायक असल्याचेही संबंधित अधिकाऱ्यांनी सूचनापत्रात नमूद केले आहे.
शिक्षकांच्या बदल्यांना प्रतिबंध
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 24, 2020 10:00 PM
नाशिक : शिक्षण विभागाच्या आदेशानुसार चालू वित्तीय वर्षात कोणत्याही संवर्गातील अधिकारी अथवा कर्मचारी यांच्या बदल्या करण्यास प्रतिबंध करण्यात आलेला आहे.
ठळक मुद्दे नवीन शैक्षणिक वर्षातील कामकाज अद्याप सुरू झालेले नाही