शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी बातमी! राज ठाकरेंनी विश्वास टाकला, उमेदवारी दिली, पण त्यानेच ठाकरे गटात प्रवेश केला
2
अजित पवार, अशोक चव्हाणांचा 'बटेंगे ते कटेंगे'ला विरोध; फडणवीस म्हणाले, "त्यांना समजवून..."
3
विजय शिवतारेंच्या पराभवासाठी अनेकजण देव पाण्यात बुडवून बसलेत; एकनाथ शिंदेंची अजितदादांच्या उमेदवाराविरोधात सभा
4
महायुती सत्तेत आली, तर मुख्यमंत्री कोण होणार? एकनाथ शिंदे अन् अजित दादांचं नाव घेत जयंत पाटलांची भविष्यवाणी!
5
अजित पवारांविरोधात उमेदवार देण्याचं शरद पवारांनी सांगितलं वेगळंच कारण; काय बोलले?
6
माइक टायसनचे 19 वर्षांनंतर कमबॅक, एका फाइटसाठी मिळणार तब्बल 168 कोटी रुपये
7
आता महाराष्ट्राला महिला मुख्यमंत्री मिळालेली पाहण्याची माझी इच्छा; शरद पवारांचे पुण्यात मोठे वक्तव्य
8
देवेंद्र फडणवीसांची भर पावसात सभा; म्हणाले- "पावसात सभा घेतली की सीट निवडून येतेच..!"
9
रॅडिको कंपनीत स्टोरेज टाकीचा स्फोट; शेकडो टन मक्याखाली कामगार दबले, चौघांचा मृत्यू
10
पाकिस्तानला मोठा धक्का! चॅम्पियन्स ट्रॉफी घेऊन PoKमध्ये जायचं नाही, ICCने PCBला ठणकावलं!
11
देव तारी त्याला कोण मारी! चालत्या ट्रेनमधून पडलेल्या प्रवाशाचा आरपीएफ जवानाने वाचवला जीव
12
Raj Thackeray: राज ठाकरे भाषण न करताच भिवंडीतून परतले; प्रकृती अस्वास्थ्यामुळे घेतला निर्णय
13
ट्रम्प विजयाबरोबरच सोन्याचे 'अच्छे दिन' संपले, दिसून आली 3 वर्षातील सर्वात मोठी घसरण! आता खरेदी करायला हवं की नको?
14
'चूक झाली, यापुढे इकडे-तिकडे जाणार नाही', सीएम नितीश कुमारांचा पीएम मोदींना शब्द
15
शशांक केतकर आणि मृणाल दुसानिस तब्बल ४ वर्षांनंतर पुन्हा एकत्र, त्यांची गाजलेली ही मालिका पुन्हा भेटीला
16
Maharashtra Election 2024: राहुल गांधींच्या महाराष्ट्रातील शेतकऱ्यांसाठी तीन घोषणा!
17
जाना था जापान, पहुंच गए चीन...! पंकजा मुंडेंसोबत असेच घडले, हेलिकॉप्टर सिडकोऐवजी सायखेड्याला पोहोचले
18
दोन 'गुलाब'रावांच्या हायव्होल्टेज लढतीत विजयाचा 'गुलाल' कोण उडवणार?
19
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या प्लेनमध्ये तांत्रिक बिघाड, देवघर एअरपोर्टवर थांबलं विमान
20
हाय हाय मिर्ची, उफ़ उफ़ मिर्ची... चहल वहिनींचा वेगळाच तोरा, पाहा धनश्रीचे 'सुपरहॉट' Photos

साखरेपेक्षा गूळच खातोय भाव

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 28, 2021 4:11 AM

नाशिक : भारतात उसापासून गूळ तयार करण्याची परंपरा ही प्राचीन काळापासून प्रचलित आहे. साखरेपेक्षाही आधी गुळाचे उत्पादन होत असल्याचा ...

नाशिक : भारतात उसापासून गूळ तयार करण्याची परंपरा ही प्राचीन काळापासून प्रचलित आहे. साखरेपेक्षाही आधी गुळाचे उत्पादन होत असल्याचा उल्लेख प्राचीन ग्रंथांमध्ये आढळतो. अद्यापही देशातील एकूण ऊस उत्पादनापैकी सुमारे ४० ते ५० टक्के ऊस हा गूळ उत्पादनासाठी वापरला जातो. साखर कारखाने उभे राहिल्यानंतर उसापासून गूळ तयार करण्याचा व्यवसाय मंदावला. पूर्वी अनेक लोक वैयक्तिक स्तरावर गुऱ्हाळ चालवित असता त्यानंतर काही ठिकाणी सहकारी संस्थांमार्फत गुळाचे उत्पादन केले जाते. राज्यात कोपरगाव, श्रीरामपूर, बारामती व कोल्हापूर आदी ठिकाणी गूळ उत्पादनाची मोठी केंद्रे आहेत. सुरुवातीच्या काळात भारतात अनेक नागरिकांची गुळाला पसंती असे; पण ६०-७० च्या दशकानंतर गुळाची मागणी कमी होऊन साखरेला अधिक पसंती मिळू लागली. यामुळे गुळाच्या व्यवसायावर काहीसा परिणाम झाला. साखरेचे दुष्परिणाम लक्षात येऊ लागल्यानंतर आता अनेक नागरिक पुन्हा गुळाकडे वळू लागल्याने सध्या बाजारात गूळ साखरेपेक्षा अधिक भाव खाऊ लागला असल्याचे दिसते. त्या काळात गूळ म्हणजे गरिबांचे अन्न तर साखर वापरणे म्हणजे श्रीमंतीचे लक्षण मानले जात होते. बदलत्या काळानुसार परिस्थिती बदलली असून आता साखरेपेक्षाही गूळ महागला आहे. तरीही अनेक लोक गुळालाच अधिक पसंती देत असल्याचे दिसते.

चौकट-

गुळाचा चहा बनले स्टेटस

पूर्वीच्या काळात अनेक घरांमध्ये गुळाचेच पदार्थ अधिक बनविले जायचे. अगदी दिवाळीचा फराळही गुळापासूनच होत होता. त्यात पौष्टिकता अधिक होती. लग्नसमारंभ, साखरपुडा, दशक्रिया विधी आणि इतरही सार्वजनिक कार्यक्रमांमध्ये अनेक गरीब लोक गुळाच्या लापशीलाच अधिक प्राधान्य देत असत. इतकेच नव्हे ते अनेक जुन्या पहिलवानांचे गूळ आणि शेंगदाणे हे प्रमुख खाद्य होते. इतकेच काय सकाळी सकाळी कामाला निघणारे कामगारही खिशात गूळ आणि शेंगदाणे घेऊन घराबाहेर पडत असत. कामाच्या ठिकाणी पोहोचेपर्यंत तेवढे शेंगदाणे आणि गूळ संपवित असत. गुळाचा चहा दररोज व्हायचा. सणावाराला गुळाचे गुळवणी मंडळी पुरणपोळी कुस्करुन खात असत. साखर आल्यानंतर मात्र ती मजा गेली. गुळाची जागा साखरेने घेतली अन्‌ गुळाच्या लापशीची जागा साखर शिऱ्याने घेतली. आता पुन्हा दिवस पालटले आहेत. अनेक नागरिक आरोग्याबाबत विशेष जागरुक झाले असून गुळाच्या चहालाच अधिक पसंती देऊ लागले आहेत. अनेक ठिकाणी तर गुळाच्या चहाची हॉटेल्स सुरु झाली आहेत.

कोट-

प्रकृतीसाठी गूळ चांगला

साखर तयार करताना खूप प्रक्रिया केल्या जातात. त्या तुलनेत गुळावर कमी प्रक्रिया होत असल्याने गुळात मिनरल्स, खनिज लोह हे पदार्थ टिकून राहतात. गुळातून आपल्याला काही प्रमाणात आयर्नही मिळत असते त्यामुळे आरोग्यासाठी गूळ चांगला आहे. भारतीय संस्कृतीतही गुळाला महत्त्व आहे. पूर्वी कुणीही घरी आले तर त्यांना प्रथम गुळाचा खडा आणि पाणी देत असत ही आपली परंपरा आहे. - मीनल बाकरे- शिंपी, आहारतज्ज्ञ

शहरात साखरेपेक्षा गुळालाच मागणी

कोट-

अनेक लोक आता गुळाच्या चहाकडे वळाले आहेत. ऑरगॅनिक टी, ग्रीन टी यांनाही पसंती मिळू लागली आहे. सध्या लाेणचे बनविण्यासाठीही गुळाचा वापर होत असल्याने गुळाला चांगली मागणी वाढली आहे. कोरोनाच्या काळात तर नागरिकांना गुळाचे विशेष महत्त्व पटले असल्याचे दिसून येते. - शेखर दशपुते, किराणा व्यापारी

गावात मात्र साखरच !

कोट-

गुळापेक्षा साखर स्वस्त असल्याने ग्रामीण भागात गुळापेक्षा साखरेलाच अधिक पसंती दिली जाते. सध्या तर गूळ आणि साखरेच्या दरात सुमारे १५ रुपयांचा फरक आहे. सर्वसामान्य गोरगरिबांना ते परवडण्यासारखे असल्याने या भागात साखरेची अधिक विक्री होत असते. - विजय श्रीमाळी, किराणा व्यापारी