ठळक मुद्देकांदा उत्पादक मोठया प्रमाणावर माल विकण्यासाठी आवारात आणत आहेत.
अभोणा : कळवण बाजार समितीच्या येथील उपबाजार आवारात शनिवारी (दि. २९) ३६१ ट्रॅक्टर्सद्वारे साडेआठ हजार क्टिंटल कांद्याची आवक होऊन कमाल १९०५ रु पये, किमान ३०० रु पये तर सरासरी १४०० रु पये प्रति क्टिंटल भाव मिळाला. गेल्या दहा दिवसापासून भावात सुधारणा होत असल्याने कांदा उत्पादक मोठया प्रमाणावर माल विकण्यासाठी आवारात आणत आहेत. तर गुजराथ, कर्नाटक तामिळनाडू सह उत्तरेकडील राज्यांमध्ये संततधार पावसाने तेथील कांदा पिक धोक्यात आल्याने मागणीत वाढ झाली आहे. काही दिवस तरी भाव टिकून राहतील असे व्यापार्यांकडून बोलले जात आहे.