शहरं
Join us  
Trending Stories
1
शरद पवारांच्या उमेदवारांना धाकधूक; आधीच ‘ट्रम्पेट’ची धास्ती, त्यात १६ ठिकाणी नामसाधर्म्य अपक्षांची भर!
2
राज ठाकरेंची शिवाजी पार्कवरील सभा अचानक रद्द; उद्धव ठाकरेंना मैदान मिळण्याची शक्यता
3
आजचे राशीभविष्य, १६ नोव्हेंबर २०२४ : कर्कसाठी आनंदाचा अन् कुंभसाठी काळजीचा दिवस
4
प्रवाशांनो लक्ष द्या, रविवारी तिन्ही मार्गांवर मेगाब्लॉक; असे असेल वेळापत्रक
5
महत्त्वाची बातमी: 'ते' २ दिवस शाळांना सुट्टी नाही; शिक्षण आयुक्तांनी दिलं स्पष्टीकरण
6
आजचा अग्रलेख: प्रचारातील काय चालेल हो?
7
मलिकांच्या जामीन रद्दच्या त्वरित सुनावणीस नकार
8
मतदारांच्या सोयीसाठी आयोगाचे रंगीत कार्पेट; कशी असेल व्यवस्था? जाणून घ्या...
9
ढगाळ हवामानामुळे मुंबईत थंडी पळाली; बदलत्या हवामानाचा परिणाम
10
संघ मुख्यालयाच्या अवतीभोवती घरोघरी प्रचारावर भर; मध्य नागपूर मतदारसंघात दटके-शेळके लढतीत पुणेकरांमुळे रंगत
11
लॉटरी किंगकडून आठ कोटींची रक्कम जप्त
12
विक्रमी वर्ष! दक्षिण आफ्रिके विरुद्ध मालिका जिंकत टीम इंडियानं रचला इतिहास
13
रितिका-रोहित दुसऱ्यांदा झाले आई-बाबा! बेबी बॉयच्या स्वागतासाठी Junior Hit-Man चा ट्रेंड
14
आरे देवा! संजूनं चौकार-षटाकारानं डोळ्याचं पारणं फेडलं, पण तिच्यावर आली रडण्याची वेळ!
15
पॉवर प्लेमध्ये Sanju Samson अन् Abhishek Sharma नं दाखवली 'पॉवर'; पण...
16
मोठी बातमी! राज ठाकरेंनी विश्वास टाकला, उमेदवारी दिली, पण त्यानेच ठाकरे गटात प्रवेश केला
17
IND vs SA 4th T20I : अखेर सूर्यकुमार यादवनं टॉस जिंकला, मालिका जिंकण्यासाठी सेट करणार टार्गेट
18
"घुसखोरांसह काँग्रेसलाही बांगलादेशात पाठवायला हवे..."; असं का म्हणाले हिमंता बिस्वा सरमा?
19
अजित पवार, अशोक चव्हाणांचा 'बटेंगे तो कटेंगे'ला विरोध; फडणवीस म्हणाले, "त्यांना समजवून..."
20
विजय शिवतारेंच्या पराभवासाठी अनेकजण देव पाण्यात बुडवून बसलेत; एकनाथ शिंदेंची अजितदादांच्या उमेदवाराविरोधात सभा

कांदा भावात ५०० रूपयांनी घसरण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 31, 2018 2:35 PM

लासलगाव (नाशिक) : सोमवारपेक्षा आज बुधवारी लासलगाव येथील कांदा लिलावात कमाल भाव पाचशे तर सरासरी भावात ३०० रूपयांनी घसरण झाली. सकाळी लाल कांदा आवक ६०० वाहनातून झाली.परंतु बाजारभाव प्रती क्विंटल किमान ९५० रूपये कमाल भाव १९०५ तर सरासरी भावाची पातळी १६५० रूपये इतकी होती.

लासलगाव (नाशिक) : सोमवारपेक्षा आज बुधवारी लासलगाव येथील कांदा लिलावात कमाल भाव पाचशे तर सरासरी भावात ३०० रूपयांनी घसरण झाली. सकाळी लाल कांदा आवक ६०० वाहनातून झाली.परंतु बाजारभाव प्रती क्विंटल किमान ९५० रूपये कमाल भाव १९०५ तर सरासरी भावाची पातळी १६५० रूपये इतकी होती.सोमवारच्या तुलनेत कांद्याच्या भावात ३०० रु पयांची तर गेल्या आठवड्याच्या तुलनेत १२०० रु पयांची मोठी घसरण होत कांदा दोन हजार रु पयांच्या आत आल्याने उत्पादकांच्या चिंतेत वाढ झाली आहे.मागील सप्ताहात ८५,५४४ क्विंटल झाली होती तर किमान भाव १,००० तर कमाल भाव ३१५८ व सरासरी भाव २८५३ रूपये होते.कोलंबो वगळता थंडावलेली कांदा निर्यात तसेच लाल कांद्याबरोबरच रांगडा कांद्याची राज्य भरातील सर्वच बाजारपेठेत नेहमीपेक्षा दुप्पट तिप्पट वाढती आवक व गुजरातसह मध्यप्रदेश व इतर राज्यांत झालेली कांदा आवक याचा एकूणच परिणाम महाराष्ट्रातील विशेषत: नाशिक जिल्ह्यात लासलगाव सह विविध बाजारपेठेत वेगाने कांदा भावात वेगाने घसरण होत झाला. मागील सप्ताहात मंगळवारच्या तुलनेत सोमवारी किमान भावात ६०० कमाल भावात ७५२ तर सरासरी भावात नऊशे रूपये प्रतिक्विंटल घसरण झाली. मागील सप्ताहात दि.२३ जानेवारी रोजी १७,१६८ क्विंटल कांदा लिलावात किमान १५०० , कमाल ३१५२ तर सरासरी भाव २८५१ रूपये होते.या सप्ताहात सोमवारी लिलावात किमान , कमाल व सरासरी भावात.या वर्षी विक्र मी वेगाने घसरण होत १९१५६ क्विंटल कांदा लिलावात किमान ९००, कमाल भाव २४०० तर सरासरी १९५१ रूपये भाव जाहीर झाला.-------------------------गुजरातबरोबरच मध्यप्रदेश सह इतर राज्यांत नवीन कांदा मोठ्या प्रमाणात बाजारपेठेत दाखल झाल्याने महाराष्ट्रातील तेजीत असलेल्या कांद्याची मागणी कमी झाल्याने सोमवारपासनु कांदा भावात कमालीची घसरण झाली. कांदा उत्पादकांच्या चिंतेत भर पडली आहे. जोरदार थंडी आणि पोषक हवामान यामुळे कांदा एकरी उत्पादन चांगले हाती येत आहे. तसेच पुणे, लोणंद व अहमदनगर भागातील कांदा बाजारपेठेत दुप्पट तिप्पट आवक आली . कांदा मोठ्या प्रमाणावर बाजारपेठेत दाखल झाला आहे.कांदा आवक वाढलेली असताना कांदा किमान निर्यात मुल्य १५० डॉलर कमी करून ७००डॉलर प्रतिटन झाले आहे, परंतु कोलंबो वगळता कुठेही निर्यात नाही.

टॅग्स :Nashikनाशिक